Jitendra Awhad Controversy : ‘देवाची निंदा’ कायदा करण्याची मागणी; आव्हाडांविरुद्ध नाशिकमध्ये साधू, महंत आक्रमक

Jitendra Awhad Statement On Ram Sadhu Mahant Protest In Nashik : जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात आता साधू, महंत आक्रमक झाले आहेत...
Jitendra Awhad
Jitendra AwhadSarkarnama
Published on
Updated on

अरविंद जाधव-

Maharashtra Politics Latest News : राम मांसाहारी होता, असे वादग्रस्त विधान केल्याप्रकरणी राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात तक्रार दाखल करून घेण्याबाबत पोलिसांनी सबुरीचा मार्ग स्वीकारला आहे. पण पोलिस ठाण्यात पोहोचलेले साधू, महंत आणि हिंदुत्ववादी संघटनेचे पदाधिकारी आक्रमक झाले आहेत. गुन्हा दाखल करणार नाही, तोपर्यंत हटणार नाही, अशी भूमिका तक्रारदारांनी घेतली आहे.

Jitendra Awhad
Jitendra Awhad on Lord Ram : राम मांसाहारी असल्याबाबत माझ्याकडे पुरावे; आव्हाडांनी दिला रामायणाचा दाखला..

शिर्डी येथील राष्ट्रवादीच्या शिबिरात मार्गदर्शन करताना जितेंद्र आव्हाड यांनी आपली भूमिका मांडली. याचे तीव्र पडसाद नाशिकमध्ये उमटत आहेत. काळाराम मंदिराचे महंत सुधीर पुजारी, भाजप आध्यात्मिक आघाडीचे तुषार भोसले यांच्यासह वेगवेगळ्या आखाड्यांचे साधू आणि हिंदुत्ववादी संघटनेचे पदाधिकारी सकाळीच पंचवटी पोलिस ठाण्यात हजर झाले आहेत.

धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची मागणी त्यांनी केली. तुम्ही तक्रार द्या, मी वरिष्ठांशी बोलतो, असे पंचवटी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक अनिल शिंदे यांनी सांगितले. यावर समाधान न झाल्याने साधू, महंत आक्रमक झाले. गुन्हा दाखल होत नाही, तोपर्यंत हटणार नाही, अशी भूमिका घेतली. याप्रकरणी चर्चा सुरू आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

दरम्यान, राम मंदिराचे निर्माण होत असताना आणि त्यामुळे निर्माण झालेले राममय वातावरण गढूळ करण्यासाठी जितेंद्र आव्हाड जाणिवपूर्वक बोलल्याचा आरोप या साधू महंतांनी केला आहे. आव्हाड नेहमीच अशा पद्धतीने हिंदू धर्म आणि देवी-देवतांना लक्ष्य करतात. त्यामुळे देवांची निंदा करणाऱ्यांविरोधात कडक कारवाई करावी आणि त्यासाठी विधानसभेत आणि संसदेत कायदा पारित करावा, अशी मागणी सुधीर महंत यांनी केली.

edited by sachin fulpagare

Jitendra Awhad
Jitendra Awhad Vs Rohit Pawar : ‘ते अजून लहान, पहिलीच टर्म’! आव्हाडांनी रोहित पवारांनाच सुनावलं

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com