JP Gavit Politics: निवडणूक इफेक्ट; सत्तेत भाजप, मोर्चातही भाजप, प्रश्न सोडवणार कोण?

JP Gavit politics, Even in the BJP march in power, who will solve the problems of the tribals?-गेले दोन आठवडे १७ संवर्गातील नियुक्त्यांसाठी आदिवासी उमेदवार आणि कार्यकर्ते आंदोलन करीत आहेत.
Dr Vijaykumar Gavit & J P Gavit
Dr Vijaykumar Gavit & J P GavitSarkarnama
Published on
Updated on

Tribal News: निवडणूक म्हटली की, भल्याभल्यांना घाम फुटतो. त्याची प्रचिती नाशिक मध्ये भारतीय जनता पक्षाला आली आहे. राज्य सरकार विरोधात निघणाऱ्या मोर्चात चक्क भाजप सहभागी होणार आहे.

राज्यात आदिवासींचा 'पेसा' कायदा असलेल्या १३ जिल्ह्यांमध्ये आदिवासी उमेदवारांच्या नियुक्तीला राज्य शासनाने स्थगिती दिली आहे. विशेष म्हणजे हे खाते भारतीय जनता पक्षाकडे आहे.

डॉ विजयकुमार गावित या खात्याचे मंत्री आहेत. त्यांनी यावर शब्दही उच्चारला नाही. गेल्या आठवड्यात नाशिकमध्ये लाडकी बहीण योजनेचा मोठा मेळावा झाला. त्याला मुख्यमंत्री आणि आदिवासी विकास मंत्री दोघेही उपस्थित होते.

यावेळी आदिवासी उपोषण करीत होते. मात्र हे मंत्री तिकडे फिरकले देखील नाही. त्याचा आंदोलकांनी तीव्र निषेध केला होता. या आंदोलनात आदिवासींच्या विविध सामाजिक संघटना देखील उतरल्या आहेत. आदिवासी विरुद्ध भाजप असे चित्र निर्माण झाले आहे.

Dr Vijaykumar Gavit & J P Gavit
Ahmednagar Municipal Corporation : ...तर नगरमधील साफसफाई आणि आरोग्य सेवा बंद; कर्मचारी 'या' मागणीवर ठाम

मंगळवारी मात्र अचानक चित्र बदलले. भाजपला उपरती झाली की काय अशी स्थिती निर्माण झाली. माजी आमदार जे पी गावित, भास्कर गावित आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे चिंतामण गावित उपोषण करीत आहेत.

या उपोषणाला भाजप नेत्यांनी भेट दिली. माजी आमदार गावित यांच्याशी चर्चा केली. आदिवासींच्या मागण्यांना पाठिंबा व्यक्त केला. यावेळी भाजपचे अनुसूचित जाती सेलचे महामंत्री एन. डी. गावित, माजी राज्यमंत्री भारती पवार यांनी त्यात भाग घेतला.

आज यासंदर्भात आदिवासी विकास विभागावर मोठा मोर्चा निघणार आहे. जिल्ह्याच्या विभागातील विविध भागातून आदिवासी त्यात सहभागी होणार आहेत. सुमारे एक लाख आदिवासी हा मोर्चा काढतील, असा अंदाज आहे.

Dr Vijaykumar Gavit & J P Gavit
Congress Politics: भाजपने भ्रष्टाचारासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनाही सोडले नाही, याची खंत!

विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर हा जिल्ह्यातील सत्ताधारी आमदारांना घाम फोडणारा विषय आहे. त्यामुळे भाजपनेही या मोर्चात भाग घेण्याचा निर्णय घेतला आहे. भाजपच्या या निर्णयाने अनेक आदिवासी नेत्यांनी आश्चर्य व्यक्त केले आहे.

सत्तेत भाजप, निर्णय घ्यायचा भाजपने, आदिवासी विकास मंत्री भाजपचा आणि आदिवासींच्या मागण्यांसाठी मोर्चा काढणार त्यात देखील भाजप. मग नेमके आदिवासींचे प्रश्न सोडवायचे तरी कोणी? असा गोंधळ निर्माण झाला आहे.

आदिवासींच्या सर्वपक्षीय मोर्चाला विविध पक्षांनी पाठिंबा दिला आहे. खासदार भास्कर भगरे, खासदार राजाभाऊ वाजे, शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे संपर्क नेते जयंत दिंडे, माजी आमदार रामदास चारोस्कर, माजी आमदार धनराज महाले, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे शहर अध्यक्ष गजानन शेलार, काँग्रेस यांसह विविध पक्षांनी पाठिंबा दिला आहे.

त्यामुळे आजचा मोर्चा अर्थात उलगुलान राज्यातील सत्ताधारी पक्षाला जेरीस आणणार हे मात्र नक्की.

-----

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com