Ahmednagar Municipal Corporation : ...तर नगरमधील साफसफाई आणि आरोग्य सेवा बंद; कर्मचारी 'या' मागणीवर ठाम

AMC employees agitation for 7th Pay Commission : अहमदनगर महापालिका कर्मचाऱ्यांनी सातवा आयोगाच्या अंमलबजावणीसाठी आरपारची लढाई सुरू केली आहे. आंदोलनाचा दुसरा दिवस आहे.
AMC employees
AMC employees Sarkarnama
Published on
Updated on

Ahmednagar News : अहमदनगर महापालिका कर्मचाऱ्यांचा सातवा वेतन आयोगाचा प्रश्न राज्य सरकारने तात्काळ मार्गी लावावा, यासाठी महापालिका कर्मचारी युनियनने बेमुदत उपोषण सुरू केले आहे. या आंदोलनाचा दुसरा दिवस होता.

महापालिका कर्मचाऱ्यांनी काळ्या फिती लावून कामकाज करत पाठिंबा दिला. राज्य सरकारने तात्काळ सातवा वेतन आयोगाची अंमलबजावणी करावी अन्यथा नगर शहरातील साफसफाई आणि आरोग्य सेवा बंद ठेवली जाईल, असा इशारा महापालिका कर्मचाऱ्यांनी यावेळी दिला.

महापालिका कर्मचाऱ्यांचा सातवा वेतन आयोगाची अंमलबजावणी तात्काळ व्हावी, यासाठी कर्मचाऱ्यांचे काळ्या फिती लावून कामकाज करत पाठिंबा जाहीर केला. यावेळी शहर अभियंता मनोज पारखे, आस्थापना विभाग प्रमुख मेहेर लहारे, घनकचरा विभाग प्रमुख अशोक साबळे, अध्यक्ष बाबासाहेब मुदगल, जितेंद्र सारसर यांच्यासह महापालिकेतील अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.

AMC employees
Shrirampur : जिल्हाधिकारी कार्यालयात पहिल्यादांच असं घडलं; 'लोटांगण' घालताच प्रशासन हादरलं

महापालिका कर्मचाऱ्यांचा (employees) 2016 पासून सातवा वेतन आयोगाचा प्रश्न प्रलंबित आहे. केंद्र, राज्य सरकार आणि इतर महापालिका कर्मचाऱ्यांचा सातवा वेतन आयोगाचा प्रश्न मार्गी लागला. मात्र नगर महापालिकेचा प्रश्न अद्याप सरकारने सोडविला नाही. महापालिकेचे कर्मचारी रात्रदिवस सेवा देत आहेत. साफसफाईसह नागरी सेवेची संपूर्ण कामे प्रभावीपणे करत आहेत. महापालिका कर्मचारी इतर विभागातील कर्मचाऱ्यांपेक्षा जास्त काम करीत असून देखील त्यांचा सातवा वेतन आयोगाचा प्रश्न मार्गी लागलेला नाही. त्यामुळे कर्मचारी आक्रमक झाले असून, दुसऱ्या दिवशी ही आंदोलन सुरू आहे.

AMC employees
RPI And Mahayuti : 'RPI'ची आमदारकीसाठी धडपड, सन्मान अन् इशारा; महायुती दखल घेणार का?

लाडक्या कर्मचाऱ्यांचा विसर

राज्य सरकारने लाडकी बहीण, लाडका भाऊ, लाडका शेतकरी विविध योजनाचा धडाका लावला. मात्र मनपाच्या लाडक्या कर्मचाऱ्यांचा विसर पडला. राज्यातील इतर महापालिका आस्थापन खर्च 80 टक्क्यांवर असून देखील त्यांना सातवा वेतन आयोग लावण्यात आला आहे. सरकारने अहमदनगर महापालिकेच्या कष्टाचे फळ द्या. सध्या महागाईने कर्मचाऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. कर्मचाऱ्यांच्या पाल्यांचे शिक्षण, कुटुंबातील आरोग्याचा प्रश्न निर्माण होतो. मात्र तो सोडवण्यासाठी आर्थिक परिस्थिती नसते, सरकारने तातडीने अहमदनगर महापालिका कर्मचाऱ्यांचा सातवा वेतन आयोगाचा प्रश्न मार्गी लावावा, अशी मागणी कॉ. अनंत लोखंडे यांनी केली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com