Tribal Politics: संततधार पावसातही आदिवासींच्या भाजपविरोधातील आंदोलनाला 'धार'

JP Gavit Political News :आदिवासी आंदोलन चिघळणार, पेसा नियुक्त्यांसाठी बुधवारी नाशिकमध्ये सर्वपक्षीय मोर्चा.
All Party meeting on Trible issue
All Party meeting on Trible issueSarkarnama
Published on
Updated on

Tribal News: नाशिकमध्ये गेले तीन दिवस संततधार पाऊस सुरू आहे. जनजीवन ठप्प आहे. मात्र आदिवासींचे आंदोलन अधिक जोर धरू लागले आहे. त्यामुळे प्रशासन चिंतेत आहे.

'पेसा' कायद्यान्वये राज्यातील तेरा जिल्ह्यांमध्ये १९ संवर्गातील आदिवासी उमेदवारांच्या नियुक्ती कराव्या, या मागणीसाठी नाशिकमध्ये आंदोलन सुरू आहे. हे आंदोलन थेट भारतीय जनता पक्षाच्या विरोधात आहे.

आदिवासी नेत्यांनी भाजपने आदिवासींवर अन्याय केला, अशी भूमिका घेतली आहे. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राज्यभरातील आदिवासी नाशिकमध्ये एकत्र आले आहेत. त्यांना आता सर्वपक्षीय नेत्यांचा पाठिंबा देखील मिळू लागला आहे.

त्यामुळे सत्ताधारी महायुती सरकारची चांगलीच कोंडी होणार, हे दिसते आहे. या उमेदवारांची नियुक्ती या सर्वोच्च न्यायालयाच्या निकालामुळे थांबल्या, असा प्रशासनाचा दावा आहे. आदिवासी नेत्यांचे मत मात्र विपरीत आहे.

All Party meeting on Trible issue
Prakash Ambedkar : 'लाडकी बहीण' योजनेसाठी आदिवासींचे बजेट वापरले? प्रकाश आंबेडकरांचा गंभीर सवाल

सर्वोच्च न्यायालयाच्या आडून भाजप राज्य सरकारच्या माध्यमातून आदिवासींच्या नियुक्त्या रोखत आहे. त्याचवेळी खुल्या प्रवर्गातील उमेदवारांना नियुक्त देण्यात आल्या. हे दुटप्पी धोरण आदिवासींची कोंडी करण्याचा डाव आहे.

राज्यभरातील आदिवासी कार्यकर्ते आणि नियुक्तीची प्रतीक्षा करणारे उमेदवार येथे आंदोलन करत आहे. आदिवासी विकास विभागाचे मुख्यालय सध्या या आंदोलकांनीच व्यापले आहे. भर पावसातही हे आंदोलन होत आहे.

संततधार पावसात या आंदोलकांनी तीन दिवस सुरत- पेठ रोड रोखला. त्यामुळे कित्येक किलोमीटर वाहनांच्या रांगा लागल्या. गुजरातला जाणारी वाहतूक रोखली गेली.

All Party meeting on Trible issue
Unmesh Patil Politics: नार-पार गिरणा प्रश्नावर खानदेशच्या रिक्षा चालकांचे कल्याणमध्ये आंदोलन!

गुजरातची कोंडी करून आदिवासी आंदोलकांनी भाजपची दुखरी नस दाबली आहे. त्यामुळे आता राज्य सरकार विरुद्ध आदिवासी आंदोलक असे टोकाचे चित्र निर्माण झाले आहे.

दोन दिवसांपूर्वी माकपचे नेते माजी आमदार जेपी गावित, प्रकृती बरी नसतानाही उपोषणाला बसले. त्यांना राष्ट्रवादी काँग्रेसचे चिंतामण गावित आणि शिवसेनेचे एन. डी. गावित यांनी देखील साथ दिली.

यावेळी लाडकी बहीण योजनेसाठी मुख्यमंत्र्यांसह विविध मंत्री नाशिकला आले होते. मात्र त्यांनी या आंदोलकांची भेट घेतली नाही. त्यामुळे आंदोलकांमध्ये मोठ्या प्रमाणावर नाराजी आहे.

या प्रश्नावर सोमवारी झालेल्या बैठकीत माजी आमदार जे पी गावित. चिंतामण गावित, एन. डी. गावित, भारतीय जनता पक्षाचे शहर अध्यक्ष सुनील बच्छाव, शिवसेना ठाकरे पक्षाचे संपर्क नेते जयंत दिंडे, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे शहर अध्यक्ष गजानन शेलार, गोकुळ पिंगळे आणि दत्ता पाटील, यांसह विविध पक्षांचे नेते उपस्थित होते.

या सर्व पक्षांनी या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे. आता बुधवारी सकाळी जिल्हाभरातील आदिवासी एकत्र येऊन सर्वपक्षीय मोर्चा काढणार आहेत. भर पावसात सुरू असलेल्या या आंदोलनाची धग वाढत आहे.

त्यामुळे ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर नाशिकमध्ये आदिवासी राज्य सरकार विरुद्ध संघटित होताना दिसत आहे. त्यातून कोणता राजकीय संदेश जातो याची उत्सुकता आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com