Rohit Pawar News : 'आमच्याबाबत सुडाचे राजकारण कुणी करत असेल, तर..' ; रोहित पवारांचा इशारा!

Rohit Pawar Politics : 'ED कार्यालयात गेलो तर मला पहिला प्रश्न विचारला..' असंही रोहित पवारांनी यावेळी सांगितलं
Rohit Pawar
Rohit PawarSarkarnama
Published on
Updated on

Rohit Pawar and Karjat-Jamkhed Constituency : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी- शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी अहमदनगर येथील जामखेड तालुक्यातील कुसडगावमध्ये असणाऱ्या एसआरपीएफ प्रशिक्षण केंद्राचे, पोलिसांच्या विरोधानंतरही उद्घटान केले. यावेळी त्यांनी सत्ताधाऱ्यांवर टीकास्त्र सोडले. शिवाय, आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमवीर त्यांच्या कर्जत-जामखेड मतदारसंघाबाबतही ते बोलले आहेत.

रोहित पवार(Rohit Pawar) म्हणाले, 'मी कर्जत-जामखेड ऐवजी कुठल्याही मतदारसंघात उभा राहिलो असतो. पण लोकसभा निवडणुकीच्या काळात मी कर्जत-जामखेडमध्ये फिरायचो तेंव्हा मला असं वाटायचं ही लोक माझीच आहे. त्यावेळी पवार साहेबांनी विचारले तेंव्हा मी त्यांना सांगितले मी कर्जत-जामखेडमधूनच विधानसभा निवडणुक लढवणार. पवार साहेबांनी सांगितले की तू तिथे आमदार झाल्यावरही तुझ्या स्वभावात बदल होऊ देऊ नकोस, तेच मी करत आहे. कोरोना काळात मी प्रत्येकाची घरातील व्यक्तीप्रमाणे सेवा केली.'

Rohit Pawar
Rohit Pawar on SRPF Training Centre : जामखेडच्या 'SRPF' प्रशिक्षण केंद्रावरून राजकारण तापलं; रोहित पवार आक्रमक, पोलिसांनी रोखलं!

तर कुसडगावमध्ये असणाऱ्या एसआरपीएफ प्रशिक्षण केंद्राबाबत बोलताना ते म्हणाले, 'या प्रशिक्षण केंद्रामुळे जामखेड तालुक्यात साडेसहा हजार पोलिस राहणार आहे. यापुढे राज्यात कुठेही पोलिसांची मदत लागली तर जामखेड तालुक्याला फोन येईल. काही बॅनर इथे लागले होते प्रशिक्षण केंद्र यांनी(राम शिंदे) यांनी मंजूर केलं, पण माझ्याकडे सर्व जीआर आहेत. तुम्ही अडीच वर्षे मतदारसंघ फिरकले सुद्धा नाहीत.' असं म्हणत पुढचा आमदार मीच होणार आहे असा ठाम विश्वासही रोहित पवारांनी व्यक्त केला.

तसेच, 'कुसडगावचे प्रशिक्षण केंद्र भाजपच्या काळात बाहेर जाणार होते. महाविकास आघाडी काळात हे प्रशिक्षण केंद्र पुन्हा जामखेड तालुक्यात आणले. आमचे विरोधक (राम शिंदे) बिस्कीट खात बसले. आम्ही कधीही सुडाचे राजकारण करत नाही. आमच्याबाबत सुडाचे राजकारण कुणी करत असेल तर आम्ही सोडत नाही.' असा इशाराही दिला.

Rohit Pawar
Akshay Shinde father letter to Amit Shah : अक्षय शिंदेच्या वडिलांनी थेट अमित शाह अन् फडणवीसांना पाठवलं पत्र, म्हणाले...

याशिवाय, 'मी माझ्या मतदारसंघातील लहान बहीण-भावांना चॉकलेट, आणि शालेय साहित्य देतो. मला मन आहे भावना आहे म्हणून मी देतो, पण माझे विरोधक त्यावरूनही टीका करतात. पण तुम्हाला भावना नाही त्याला मी काय करू.मी कर्जत-जामखेडचा सेवक आहे, कर्जत-जामखेडच्या लोकांना हे लोक घाबरतात. SRPF केंद्राबाहेर गेलो तर पोलीस विनंती करत होते हे लोक ऐकणार नाही, तुम्हीच त्यांना सांगा.'

'मी ED कार्यालयात गेलो तेंव्हा पण कर्जत- जामखेडचे लोक कार्यालयाबाहेर जमा झाले होते. ED कार्यालयात गेलो तर मला पहिला प्रश्न विचारला बाहेर आलेले लोक कुठून आलेत. त्यांना वाटलं तासभर हे लोक थांबतील पण लोक हटले नाहीत. ED वाले देखील म्हणाले "मान गये बॉस". ही कर्जत-जामखेडच्या लोकांची ताकद आहे म्हणून मी दिल्लीपुढे झुकणार नाही. त्यांच्यापुढे हाच प्रश्न असतो की याला (रोहित पवार) थांबवायचे कसे.'

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com