नाशिक : बेळगाव (Belgaum) कारवार, निपाणी, बिदर अगोदर महाराष्ट्राला द्यावेत आणि नंतर बाकीच्या विषयांवर बोला, असे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी आज येथे स्पष्ट केले. तसेच जत तालुक्यातील काही गावे कर्नाटकची (Karnatak) अशी भाषा कर्नाटकमधील नेत्यांनी करणे म्हणजे, 'उलटा चोर कोतवाल को डाटे' या उक्तीगत असल्याची टीका श्री. भुजबळ यांनी केली. (Chhagan Bhujbal criticise Karnatak leaders on State border issue)
पत्रकारांशी बोलताना श्री. भुजबळ म्हणाले, की भारत एकसंघ देश आहे. शांततेच्या मार्गाने जर कुणी निदर्शने करत असेल, तर त्यांच्यावर गोंधळ घालण्याची आवश्यकता नाही. बेळगावमधील नेतेमंडळी कठोर आणि क्रूर अशी भूमिका घेत आहेत, ती योग्य नाही.
कर्नाटकमध्ये बेळगाव परिसरातील मराठी भाषिकांमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न कर्नाटकमधील नेत्यांकडून होत आहे. तसेच बेळगाव, कारवारसाठी जवळपास साठ वर्षांहून अधिक काळ लढा सुरू आहे. हा केवळ देशातील नव्हे, तर जगातील सर्वात दीर्घकाळ चाललेला लढा आहे. हा प्रश्न लवकर निकाली निघण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी महाराष्ट्र-कर्नाटक प्रश्नावर महाराष्ट्रातील सर्व पक्षांनी पक्षभेद विसरून एकत्र येऊन हा लढा देण्याची आवश्यकता आहे.
जातीनिहाय जनगणना करावी
देशात जातीनिहाय जनगणना करण्याची आमची पहिल्यापासून मागणी आहे. माजी खासदार समीर भुजबळ यांनी लोकसभेत मागणी केली होती. त्यावेळी खासदार शरद पवार यांच्या माध्यमातून शंभरहून अधिक खासदार एकत्र येऊन ही मागणी कायम केली. त्यावेळी करण्यात आलेली जनगणना चुकीच्या पद्धतीने झाली आहे. अद्याप केंद्र सरकारने ती जाहीर केली नाही. लवकर योग्य यंत्रणेच्या माध्यमातून जनगणना करून त्यातून ओबीसी समाजासह सर्व समाजाला आपले हक्क मिळतील, श्री. भुजबळ यांनी स्पष्ट केले. याशिवाय खासदार संजय राऊत यांना सरकारने सुरक्षा पुरवावी अशी मागणी त्यांनी केली.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.