
Pahalgam terror News: मंगळवारी दोन दहशतवाद्यांनी लष्करी गणवेषात येऊन पहलगाम येथे पर्यटकांवर हल्ला केला. या हल्ल्यात सत्तावीस पर्यटकांचा मृत्यू झाला. त्यामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. त्यात महाराष्ट्रातील विविध शहरांतील पर्यटकांचा समावेष आहे.
पहलगाम येथे हल्ला झाला तेव्हा त्या परिसरात नाशिकचे विविध पर्यटक देखील होते. यामध्ये ब्रिजमोहन टुर्स मार्फत इंदिरानगर येथी चव्हाण कुटूंब होते. त्यांचे चार सदस्य काश्मीर सहलीला गेले होते. हल्ला झालेल्या ठिकाणापासून लांब अतरावर असल्याने ते बचावले. ते सुरक्षीत असून परतीच्या मार्गावर असल्याचे ब्रिजमोहन चौधरी यांनी सांगितले.
गिरीकंद टूर्सचे वीस पर्यटक सध्या काश्मीर सहलीला गेलेले आहेत. यातील आठ पर्यटक हा हल्ला झाला, तेव्हा पहलगाम येथील त्या स्पॉटजवळच होते. यामध्ये नाशिकच्या गोळे कॉलनी परिसरात राहणारे व श्री अन्नपूर्णा डिस्ट्रीब्यूटर्सचे संचालक शशिकांत नेर व त्यांच्या पत्नी मनिषा होत्या.
या आठ सदस्यांनी त्याआधीन तीन दिवस श्रीनगर तसेच अन्य भागांच्या सहली केल्या होत्या. या सहली झाल्यावर ते मंगळवारी पहलगामला गेले होते. हल्ला झाला, त्या स्पॉटवर त्यांना जायचे होते. मात्र त्यातील सहा सदस्य ज्येष्ठ नागरिक असल्याने त्यांना घोड्यावरून जाणे शक्य नसल्याने सगळ्यांनाच तो कार्यक्रम रद्द करावा लागला. त्यामुळे दहशतवादी हल्ल्यापासून ते बचावले.
या घटनेनंतर त्यांनी तात्काळ श्रीनगर गाठले. ते ज्या हॉटेलमध्ये मुक्कामाला होते, तीथे ते पोहोचले. मात्र इंटरनेट बंद होते. त्यामुळे कोणाशीही संपर्क होने शक्य नव्हते. त्यांनी हॉटेल चालकांना विनंती करून वाय फाय सेवा देण्याची विनंती केल्यावर त्यांचा नाशिकला संपर्त होऊ शकला.
सायंकाळी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा श्रीनगरला पोहोचले. त्यानंतर सुरक्षा व्यवस्था अधिक कडक करण्यात आली. हॉटेल बाहेर पडणे शक्य नव्हते. कारण सायंकाळनंतर सर्व रस्ते वाहतुकीसाठी बंद करण्यात आले. आता हे पर्यटक श्रीनगर विमानतळावर पोहोचले असून सायंकाळी ते विमानाने मुंबईकडे रवाना होतील.
------
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.