खडसेंनी विरोधकांना खडसावले, `जी चौकशी करायची ती करा, आम्ही तयार आहोत`

महाविकास आघाडीच्या सहकार पॅनलच्या प्रचाराला आज मुक्ताई मंदिर येथे विधिवत पुजा करून प्रारंभ करण्यात आला.
Jalgaon DCC Bank chairmen Rohini Khadse with candidates.
Jalgaon DCC Bank chairmen Rohini Khadse with candidates.Sarkarnama
Published on
Updated on

मुक्ताईनगर : विरोधक बँकेने खाजगी संस्थाना बेकायदेशीर कर्ज वाटप केल्याचा आरोप करतात. मात्र रिझर्व्ह बँक आणि नाबार्डच्या नियमानुसार योग्य तारण घेऊन सर्व कर्ज दिलेली आहेत. त्याची नियमित कर्जफेड आहे. त्यातून बँकेला मोठया प्रमाणावर व्याज मिळत आहे. सर्व नियमानुसार असल्याने विरोधकांना जी चौकशी करायची असेल ती करावी, असे आव्हान ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी दिले.

Jalgaon DCC Bank chairmen Rohini Khadse with candidates.
आयुक्त दीपक पांडेंच्या जिल्हा बँकेतील ‘एन्ट्री’ने बँकेला रडवणाऱ्या राजकीय नेत्यांना फोडला घाम!

महाविकास आघाडीच्या सहकार पॅनलच्या प्रचाराचा आज मुक्ताई मंदिरात पुजन आणि नारळ वाढवून करण्यात आला. यावेळी झालेल्या कार्यक्रमात ते बोलत होते.

ते म्हणाले, जळगाव जिल्हा बँकेला सहकाराचा समृद्ध वारसा आहे. ही आशिया खंडातील अग्रणी बँक आहे . (स्व) प्रल्हादभाऊ पाटील, जे एस अप्पा, ओंकार अप्पा वाघ यांच्या सारखे अध्यक्ष राहिलेली हि बँक आहे. त्यांनी जिवापाड मेहनत करून बँकेला वैभव व नावलौकिक प्राप्त करून दिला. मध्यंतरी काही चुकीच्या निर्णयामुळे बँकेची आर्थिक स्थिती खालावली होती, ती सुस्थितीत आणण्यासाठी गेल्या पंचवार्षिक कलावधीत सर्वपक्षीय पॅनलची निर्मिती केली आहे.

Jalgaon DCC Bank chairmen Rohini Khadse with candidates.
निलंबीत कंडक्टर म्हणते, कुटुंबाची जबाबदारी माझ्यावर, आत्महत्येशिवाय दुसरे करू काय!

ते पुढे म्हणाले, त्यांनंतर रोहिणी खडसे या चेअरमन झाल्या. सर्व संचालक मंडळाने पारदर्शक पद्धतीने काटकसरीने कारभार केला. त्यातुन बँकेचा ६०० कोटींचा संचित तोटा भरून काढण्यात संचालक मंडळाला यश आले. यापुढे सुद्धा येणारे संचालक मंडळ पारदर्शक पद्धतीने कारभार करेल, याची मी ग्वाही देतो. मंडळाने ऑनलाईन पद्धतीने व पारदर्शकपणे भरती प्रक्रिया राबवली. संगणकीकरण करून कारभार गतीमान केला. सर्व व्यवहार ऑनलाइन पद्धतीने नियमानुसार केले. त्यामुळे बँक एनपीए मधून बाहेर आली. बँकेचा मोठया प्रमाणात संचित तोटा भरून निघाला व बँक क वर्गातून अ वर्गात आली. ही घोडदौड अशीच कायम राखण्यासाठी सहकार पॅनलच्या सर्व उमेदवारांना विजयी करा.

प्रास्तविक करताना बँकेच्या अध्यक्षा रोहिणी खडसे म्हणाल्या गेल्या सहा वर्षांपासून सर्व संचालक मंडळाच्या सहकार्याने जिल्हा बँकेची अध्यक्ष म्हणून काम केले या कार्यकाळात आदरातिथ्य व इतर अतिरिक्त खर्चाला कात्री लावून सर्व कारभार पारदर्शक पद्धतीने केला. बँकेचे शंभर टक्के संगणिककरण डिजिटलायझेशन केले त्यामुळे बँकेचा कारभार जलद गतीने झाला बँकेच्या ठेवी मध्ये वाढ झाली. बँकेला `क` दर्जातून `अ` दर्जात आणले.

यावेळी माजी मंत्री गुलाबराव देवकर, सतिष अण्णा पाटील, जळगावच्या महापौर जयश्रीताई महाजन, माजी आमदार चंद्रकांत सोनवणे, दिलीप सोनवणे, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष रवींद्र भैय्यासाहेब पाटील, शिवसेना जिल्हा प्रमुख विष्णु भंगाळे, काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस डॉ जगदीश पाटील, संजय पवार, नाना राजमल पाटील, संजय गरुड, रोहिणी खडसे खेवलकर, शिलाताई निकम, मेहताबसिंग नाईक, श्यामकांत सोनवणे, विनोद तराळ, रवींद्र नाना पाटील, वंदना ताई पाटील, एजाज भाई मलिक, मंगलाताई पाटील, कल्पिताताई पाटील, सरिताताई माळी आदी उपस्थित होते.

यावेळी बिनविरोध निवडून आलेल्या महाविकास आघाडीच्या संचालकांचा सत्कार करण्यात आला.

...

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com