Ajit Navale On Onion Issue: कांदा निर्यातीवरील शुल्कवाढीचा मुद्दा तापला; किसान सभा अन् स्वतंत्र भारत पक्षही आक्रमक

Swabhimani Shetkari Sanghatana : स्वाभिमानी शेतकरी संघटनेने रस्त्यावर उतरत आक्रमकपणे आंदोलन करत बाजार समित्यातील कांदा खरेदी बंद पाडली
Ajit Navale and Anil Ghanvat
Ajit Navale and Anil GhanvatSarkarnama

राजेंद्र त्रिमुखे :

Ahmednagar News: केंद्र सरकारने कांद्यावर अचानक 40 टक्के निर्यात कर लावल्यामुळे शेतकऱ्यांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या विविध संघटना आणि राजकीय पक्षांनी केंद्र सरकार विरोधात एल्गार पुकारल्याचे चित्र राज्यात आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेने रस्त्यावर उतरत आक्रमकपणे आंदोलन करत बाजार समित्यातील कांदा खरेदी बंद पाडली आहे. व्यापारी वर्गाने पण आंदोलनाला पाठींबा देत लिलाव बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

शेतकरी रस्त्यावर उतरत असताना आता किसान सभा आणि स्वतंत्र भारत पक्षानेही आंदोलनांना पाठिंबा देत आंदोलने अजून तीव्र करा, अशी संघर्षाची भूमिका मांडली आहे. किसान सभेचे डॉ.अजित नवले यांनी शेतकऱ्यांनी रस्त्यावर उतरून कांद्याचे लिलाव बंद पाडा, असे आवाहन करत आंदोलनाला पाठिंबा दिला आहे.

Ajit Navale and Anil Ghanvat
Mumbai University Senate Elections: 'सिनेट'वरून राजकारण तापलं; मुंबई विद्यापीठात युवासेनेचा चार तास ठिय्या

अगोदर दूध पावडर आयात करून दुधाचे दर घसरवले. नंतर टोमॅटो आयात करून टोमॅटो उत्पादकांना खड्यात घातले आणि आता कांद्यावर निर्यात कर लादून शेतकऱ्यांना बरबाद करण्याचे काम केंद्र आणि राज्य सरकार करत असल्याचा नवले यांनी निषेध केला.

Ajit Navale and Anil Ghanvat
Dhananjay Munde On Onion Issue : कांदा निर्यातीवरील शुल्कवाढीस कृषिमंत्री मुंडेंचा विरोध; म्हणाले ‘मी उद्याच दिल्लीला जातोय...’

स्वतंत्र भारत पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष अनिल घनवट यांनी, कांद्याचे दर नियंत्रित करण्यासाठी केंद्र शासनाने कांद्याच्या निर्यातीवर निर्यात शुल्क वाढविल्याने शेतकऱ्यांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे. सरकार निवडणुका जिंकण्यासाठी जर कांद्याचे भाव पाडत असेल तर शेतकऱ्यांनी अशा पक्षाचे सरकार पाडावे, असे आवाहन केले.

कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या हिता विरोधात निर्णय घेणाऱ्या सरकारला व कांदा भाववाढीच्या विरोधात आंदोलने करणाऱ्या सर्व राजकीय पक्षांना शेतकऱ्यांनी या पुढे मतदान करू नये, असे आवाहन घनवट यांनी केले.

Edited By- Ganesh Thombare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com