Simhastha Kumbhmela: ऐन दिवाळीत शेतकऱ्यांच्या घरांवर सरकारी बुलडोझर...कारवाई थांबवण्यास प्रशासनाचा नकार!

Kumbh Mela encroachment eradication campaign, bulldozers on farmers' houses, farmers in trouble on Diwali-इफेक्ट कुंभमेळा; त्र्यंबक रस्त्याच्या रूंदीकरणासाठी शेतकऱ्यांच्या घरांवर बुलडोझर, संतप्त नागरिक उतरले रस्त्यावर!
Farmers agitation & Rajabhau Waje
Farmers agitation & Rajabhau WajeSarkarnama
Published on
Updated on

Sinhsth Kumbh Mela News: सिंहस्थ कुंभमेळ्याच्या तयारीला प्रशासनाने नव्या जोमाने सुरवात केली आहे. यामध्ये आज त्र्यंबकेश्वर रस्ता रूंद करण्यासाठी अडथळे दूर करण्यास सुरवात झाली. त्याचा फटका रस्त्यालगतच्या शेतकऱ्यांच्या घरे, दुकानांना बसल्याने एकच धावपळ उडाली. शेतकऱ्यांच्या घरांवर बुलडोझर फिरला.

आगामी सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी नाशिक ते त्रंबकेश्वर रस्ता रुंदीकरण होत आहे. त्याचा पहिला फटका या भागातील गावकुसातल्या शेतकऱ्यांना बसला. ऐन दिवाळीत सरकारी बुलडोझर शेतकऱ्यांच्या घरांवर चालवण्यात आला. त्यामुळे शेतकरी, लोकप्रतिनिधींची एकच धावपळ उडाली.

आज सुरू झालेल्या मोहिमेला रहिवासी आणि शेतकऱ्यांनी कडाडून विरोध केला. दिवाळीचा सण असल्याने किमान आठवडाभराची मुदत द्यावी, अशी मागणी करण्यात आली. मात्र प्रशासनाने अतिक्रमण निर्मूलन मोहिम स्थगित करण्याबाबत नकार दिला.

Farmers agitation & Rajabhau Waje
Eknath Shinde Politics: महायुतीत भाजप, शिवसनेत विसंवादाचे वारे; पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्यावर स्वबळासाठी दबाव?

यासंदर्भात सकाळीच महापालिका हद्दीलगतच्या पिंपळगाव बहूला येथून त्रंबकेश्वर गावापर्यंत ही मोहीम सुरू करण्यात आली. ४० ते ५० वर्षांपासून येथे घरे, दुकाने, जनावरांचे गोठे आदी बांधकामे आहेत. ग्रामपंचायत हद्दीतील या घरांना परवानगी असून त्यातील काही घरे चाळीस ते ५० वर्षे जुनी आहेत. मात्र आता ती रस्ता रुंदीकरणासाठी अडथळा ठरली आहेत.

Farmers agitation & Rajabhau Waje
Nashik Crime : RPI नेते प्रकाश लोंढेच्या गँगला नाशिकमध्ये निर्माण करायची होती संघटीत गुन्हेगारी, पोलीस तपासात धक्कादायक माहिती उघड

महापालिका हद्दीपासून १५० फुट रस्ता ३२८ फूट करण्याचा निर्णय झाला आहे. त्यासाठी रस्त्याच्या मध्यरेषेपासून दुतर्फा असलेली बांधकामे पाडण्याचे काम सुरू झाले. त्याला विरोध म्हणून शेतकरी रस्त्यावर उतरले. जोरदार घोषणाबाजी आणि विरोध केला. यावेळी शेतकऱ्यांनी विविध मंत्र्यांशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याचा काहीही उपयोग झाला नाही.

खासदार राजाभाऊ वाजे आणि या भागातील आमदार हिरामण खोसकर यांनी तातडीने आयुक्त प्रवीण गेडाम यांची भेट घेतली. दिवाळीचा सण असल्याने शेतकऱ्यांच्या समस्या लक्षात घ्याव्यात, अशी विनंती केली. मात्र आयुक्त गेडाम यांनी त्यांची भूमिका समजून घेतली. मात्र प्रतिक्रीया दिली नाही.

यासंदर्भात खासदार वाजे, आमदार खोसकर यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. ऐन दिवाळीत सरकारने शेतकऱ्यांना कोणताही मोबदला, भरपाई न देता रस्त्यावर आणले आहे. हा अन्याय आहे. याबाबत आम्ही शासनाकडे दाद मागू. वेळ पडल्यास मुख्यमंत्र्यांकडे दाद मागण्यात येईल. मात्र ऐन दिवाळीच्या तोंडावर शेतकऱ्यांची घरे, दुकाने, गोठ्यांवर सरकारी बुलडोझर चालवायला नको होता, अशी खंत व्यक्त केली.

नागरिकांच्या मागणीला पाठिंबा म्हणून माकपचे नेते, माजी नगरसेवक तानाजी जायभावे, आमदार सरोज अहिरे यांसह परिसरातील सरपंच आणि लोकप्रतिनिधींनी रस्त्यावर ठाण मांडले होते. अनेकांनी मुख्यमंत्र्यांशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला. मात्र प्रतिसाद मिळाला नाही.

यानिमित्ताने कुंभमेळ्याचा पहिला फटका या भागात प्रदीर्घकाळ राहणाऱ्या मूळ रहिवासी असलेल्या शेतकऱ्यांना बसला आहे. कोणतीही भरपाई न देता रस्त्यासाठी जमीन घेण्यात येत असल्याचा आरोप करण्यात आला.

------

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com