Girish Mahajan Politics: मुख्यमंत्र्यांचे विश्वासू गिरीश महाजन नाशिकचे सर्वेसर्वा; मंत्री महाजनांनी महापालिकेसाठी दाखवला सर्वसमावेशक राहुल ढिकलेंवर विश्वास!

KumbhMela- Minister- Girish- Mahajan-incharge-Nashik-Rahul-Dhikle-will-Balance- New-and-old-BJP-Faces-for-NMC-Election-नाशिक महापालिका निवडणुकीसाठी आमदार डिकले साधणार नव्या जुन्या नेत्यांचा, इच्छुकांचा मेळ
Rahul Dhikle & Girish Mahajan
Rahul Dhikle & Girish MahajanSarkarnama
Published on
Updated on

Nashik NMC News: कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन जळगावचे नेतृत्व करतात. त्यांचे मन मात्र सदैव नाशिक महापालिकेत अडकलेले असते. निवडणुकांच्या नव्या नियुक्त्यांमध्ये त्याचा प्रत्यय आला आहे.

भारतीय जनता पक्षाने आगामी जिल्हा परिषद आणि महापालिका निवडणुकांसाठी जिल्हानिहाय नियुक्त्या केल्या आहेत. नाशिक जिल्ह्याची जबाबदारी पुन्हा एकदा मुख्यमंत्र्यांचे विश्वासू गिरीश महाजन यांच्याकडे आली आहे. मंत्री महाजन यांची नियुक्ती अपेक्षितच होती.

मात्र यावेळी संकटमोचक महाजन यांनी गेले काही दिवस सुरू असलेल्या अंतर्गत हालचालींचा नेमका अंदाज घेतला. शहरातील नियुक्तीमध्ये समतोल आणि नव्या जुन्यांचा मेळ घातला आहे. आमदार राहुल ढिकले यांच्यावर नाशिक महापालिकेची जबाबदारी देण्यात आली आहे.

Rahul Dhikle & Girish Mahajan
BJP Vs Shivsena Politics: स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या जन्मभूमीत भाजपने बाह्या सरसावल्या, मात्र एकनाथ शिंदे यांचा शिलेदार त्यांची डाळ शिजू देईल का?

भारतीय जनता पक्षाने या नियुक्त्यांमध्ये अतिशय कॅल्क्युलेटेड मुव्ह घेतली आहे. मंत्री महाजन जळगावचे नेते आहेत. मंत्री महाजन यांच्या कलानेच जळगाव, धुळे आणि नंदुरबार या निवडणुकांची सूत्रे सोपविण्यात आली आहे. मुख्यमंत्र्यांचा महत्त्वकांक्षी प्रकल्प असलेल्या कुंभमेळ्याचा त्यात जाणीवपूर्वक विचार करण्यात आला आहे.

Rahul Dhikle & Girish Mahajan
Kumbh Mela Politics : मुलांना आत्ताच लग्नासाठी मुली मिळेनात, भविष्यात त्यांनी चोऱ्या कराव्यात का? महिलांचा गाडी अडवत मंत्री महाजनांना तिखट सवाल

गेली पाच वर्ष महापालिकेत गिरीश महाजन यांच्या मर्जी शिवाय पानही हलत नव्हते. पालिकेने पहिल्यांदाच स्वबळावर सत्ता स्थापन केली. मावळत्या महापालिकेत पक्षाचे ६५ हून अधिक नगरसेवक होते.

या पार्श्वभूमीवर यंदा पक्षाने हंड्रेड प्लस असे उद्दिष्ट नाशिक साठी निश्चित केले आहे. हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी आमदार राहुल ढिकले हे जुन्या आणि नव्या नेत्यांचा समतोल साधणारे नेतृत्व मानले जाते. स्वतः राहुल ढिकले यांनीही माध्यमांना अशीच प्रतिक्रिया दिली आहे.

शहरात भाजपचे तीन आमदार आहेत. यातील दोन आमदारांना आपल्या पुढच्या पिढीला महापालिकेत सेटल करायचे आहे. अन्य समर्थकांनाही उमेदवारीचे शब्द या आमदारांनी दिले आहेत. त्या दृष्टीने जाणीवपूर्वक राहुल ढिकले यांची नियुक्ती केलेली दिसते.

शहरात गेल्या काही दिवसात झालेले प्रवेश देखील चर्चेत आहेत. सिडको भागात स्थानिक पदाधिकारी आणि आमदारांचा विरोध डावलून मंत्री महाजन यांनी काही प्रवेश घडवले. शिवसेना उद्धव ठाकरे पक्षातून आलेल्या अनेक वादग्रस्त नेत्यांचा त्यात समावेश आहे. या नेत्यांचे स्थानिक आमदारांची फारसे सख्ख्या नाही.

महापालिका निवडणुकीसाठी पडद्याआड आणि मुख्यमंत्र्यांनी यापूर्वी स्वबळाचे सुतोवाच केले आहे. त्या दृष्टीने महापालिका निवडणूक ही आव्हानात्मक आहे. यामध्ये हंड्रेड प्लस टार्गेट साध्य करण्यासाठी आमदार डिकले यांना जुन्या नव्यांचा ताळमेळ बसविणे अपरिहार्य आहे.

याबाबत ढिकले अनुभवी आणि राजकारणाचे बाळकडू घेतलेले आमदार आहेत. उमेदवारीचा अथवा अन्य कोणताही चेंडू आल्यास ते सहजपणे वरिष्ठांकडे पास करतील. त्यांना फारसा राजकीय इगोही नाही, ही त्यांची जमेची बाजू सांगितली जाते. त्यांच्या मनात काय आणि कोण याचा थांब पत्ता सहजासहजी लांगणे अवघड आहे. या दृष्टीने भाजपची ही अतिशय कॅल्क्युलेटेड मुव्ह घेतली आहे.

--------

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com