Kunal Patil Politics: कुणाल पाटील पाऊणशे वर्षांची काँग्रेसची बांधिलकी तोडणार, भाजप प्रवेश निश्चित!

Kunal Patil; Established Congress leader from Dhule district Kunal Patil will join BJP- धुळे जिल्ह्यात काँग्रेसला मोठा धक्का, माजी आमदार कुणाल पाटील भाजप प्रवेश करणार
Kunal_Patil
Kunal_PatilSarkarnama
Published on
Updated on

Kunal Patil News: गेल्या आठवड्यात भाजपचे प्रदेश कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची काँग्रेसचे माजी आमदार कुणाल पाटील यांनी भेट घेतली होती. या भेटीनंतर लगेचच त्यांच्या भाजप प्रवेशाची चर्चा सुरू झाली होती. राज्यातील सत्तांतरानंतर कुणाल पाटील राजकीय दृष्ट्या एकाकी पडले होते. अशातच ते भाजप प्रवेश करण्याच्या हालचाली आहेत.

धुळे जिल्ह्यातील काँग्रेसचे एकखांबी नेतृत्व असलेले माजी आमदार कुणाल पाटील यांनी भाजप प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. सध्या फक्त त्याची अधिकृत घोषणा केव्हा होते याची प्रतीक्षा आहे. माजी आमदार पाटील यांनी शनिवारी आपल्या समर्थकांचा मेळावा घेऊन चाचणी केली. अपेक्षेप्रमाणे समर्थकांनी पाटील घेतील तो निर्णय मान्य असेल असे सांगितले.

कधीकाळी काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या धुळे जिल्ह्यात भाजपने सत्तेच्या माध्यमातून काँग्रेसला खिळखिळी केली आहे. माजी आमदार कुणाल पाटील येत्या आठवड्यात भाजप प्रवेश करणार आहे. हा राज्यातील काँग्रेस पक्षाला मोठा धक्का मानला जातो. धुळे जिल्ह्यात काँग्रेस पुढे मोठे प्रश्नचिन्ह निर्माण होणार आहे. धुळे जिल्ह्यात आता भाजप सर्व पदांवर प्रबळ होईल. काँग्रेसला मात्र अस्तित्वासाठी लढावे लागणार आहे.

Kunal_Patil
Dada Bhuse Politics : राज ठाकरेंची समजूत काढायला गेलेले मंत्री दादा भुसे एकाकी; 'हिंदी'च्या मुद्यावर चलबिचल

माजी आमदार कुणाल पाटील यांचे कुटुंबीय गेली ७५ वर्ष काँग्रेस पक्षात सक्रिय आहे. आमदार खासदार यांसह राज्यात प्रदीर्घकाळ काँग्रेसने या घराण्याला मंत्रिपद दिले. काँग्रेस कार्यकाळातील सत्तेच्या माध्यमातूनच त्यांच्या जवाहर शिक्षण संस्थेचा मोठा विस्तार झाला आहे. त्यामुळे काँग्रेसचे बडे प्रस्थ म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते.

माजी आमदार पाटील लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार म्हणून भाजपकडून पराभूत झाले. विशेष म्हणजे या निवडणुकीत त्यांच्या स्वतःच्या गावातही त्यांना मतदान मिळू शकले नव्हते. गतवर्षी झालेल्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी उमेदवारी नाकारली होती. तेव्हाच काहीतरी माशी जिंकली अशी चर्चा सुरू झाली होती.

आगामी जिल्हा परिषद आणि महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर माजी आमदार कुणाल पाटील यांचा भाजप प्रवेश होत आहे. या पार्श्वभूमीवर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी शनिवारी धुळ्याचे पालकमंत्री जयकुमार रावल, माजी खासदार डॉ सुभाष भामरे, राम भदाण, सुभाष देवरे, बापू खलाणे, धरती देवरे यांसह धुव्यातील विविध भाजपने त्यांचा संबंध बैठक केली. त्यात कुणाल पाटील यांच्या पक्षप्रवेशाविषयी चर्चा करण्यात आली.

गेले काही दिवस कुणाल पाटील सातत्याने भाजप नेत्यांच्या संपर्कात होते. काही दिवसांपूर्वीच त्यांनी पालकमंत्री जयकुमार रावण यांच्या कार्यालयात त्यांची भेट घेऊन प्रदीर्घ चर्चा केली होती. तेव्हाच कुणाल पाटील यांच्या भाजप प्रवेशाची प्रक्रिया सुरू झाल्याचे बोलले जाते.

------

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com