Bhagyashree Banait; मुंडेंच्या बदलीचा रेकॉर्ड मोडत बानाईत महापालिकेत रुजू

पदभार स्विकारल्यानंतर देखील विद्यमान अधिकाऱ्याने तळ ठोकल्याने हजर होताच अडथळ्यांची स्पर्धा सुरू
Ashok Atram & Bhagyshree Banait
Ashok Atram & Bhagyshree Banait Sarkarnama

नाशिक : एकाच महिन्यात अनेकदा बदली होण्याचा आयएएस अधिकारी तुकाराम मुंडे (Tukaram Munde) यांचा विक्रम मोडीत काढल्यानंतर भाग्यश्री बानाईत (Bhagyashree Banait) यांनी महापालिकेच्या (NMC) अतिरिक्त आयुक्तपदाचा सोमवारी पदभार स्वीकारला. मात्र, येथेही त्यांची अडथळ्यांची स्पर्धा संपली नाही. पदभार स्वीकारल्यानंतर अशोक अत्राम (Ashok Atram) यांनी पदमुक्त होणे अपेक्षित असताना दिवसभर त्यांच्या दालनात बैठका घेऊन बानाईत यांना महापालिकेचा प्रवास सोपा नसल्याचे दाखवून दिले. (Bhagyashree Banait take charge as NMC adl. Commissioner in Nashik)

Ashok Atram & Bhagyshree Banait
Jindal Fire; `जिंदाल`स्फोट व आग प्रकरणी दोषींविरुद्ध कारवाई होणारच!

राज्यातील शिंदे- फडणवीस सरकारने मागील आठवड्यात सहा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या. त्यात भाग्यश्री बानाईत यांची नाशिक महापालिकेत अतिरिक्त आयुक्त पदावर बदली करण्यात आली.

Ashok Atram & Bhagyshree Banait
Pune News : येरवडा कारागृहातील तीन कैद्यांचा मृत्यू : कुटुंबियांचा प्रशासनावर गंभीर आरोप

आयएएस बानाईत यांची सरकारने महिन्याभरात तिसऱ्यांदा बदली केली आहे. त्यामुळे तुकाराम मुंडे यांचा बदल्यांचा विक्रम मोडीत निघाला आहे. शिर्डीच्या साईबाबा संस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदावर भाग्यश्री बानाईत कार्यरत होत्या. त्यांची बदली विदर्भ वैधानिक विकास महामंडळात सदस्य सचिव म्हणून करण्यात आली होती. त्यानंतर आठ दिवसातच नाशिक विभागाच्या अतिरिक्त विभागीय आयुक्तपदी त्यांची नियुक्ती करण्यात आली. आता पुन्हा नाशिक महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्तपदी बदली करण्यात आली. बानाईत यांनी दुपारी पदाचा कार्यभार महापालिकेत स्वीकारला. महापालिका आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार रजेवर असल्याने अतिरिक्त आयुक्त अशोक अत्राम यांच्याकडून पदभार स्वीकारला.

बैठकांचा धडाका

अत्राम यांनी अतिरिक्त आयुक्तपदाची सूत्रे बानाईत यांच्याकडे सोपविल्यानंतर कामकाज बंद करणे अपेक्षित होते. परंतु दुपारी दोन ते सहाच्या दरम्यान अत्राम यांनी बैठकांचा धडाका लावला. काही अधिकाऱ्यांकडून फाइल मागवल्या. अत्राम यांची आठ महिन्यांची कारकीर्द वादग्रस्त राहिल्याने त्यांच्या या भूमिकेवर महापालिका मुख्यालयात विविध चर्चा घडल्या. नागरिकांचे प्रश्न सोडवण्यासाठी कामकाज करीत असून यात महापालिका व शासनाचे कुठलेही नुकसान नसल्याचा दावा माजी अतिरिक्त आयुक्त अत्राम यांनी केला, तर पदभार स्वीकारलेल्या अतिरिक्त आयुक्त भाग्यश्री बानाईत यांनी याविषयी बोलणे टाळले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com