नाशिक : राज्यातील (Maharashtra) कायदा व सुव्यवस्था पूर्णपणे ढासळली असून, गुंडांसाठी महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) सरकार काम करत आहे. दिवसाढवळ्या महिलांची छेड काढली जात असताना, न्याय मिळत नाही. त्यामुळे महिलांना गुंडांच्या धाकातच फिरावे लागत आहे, असा आरोप भारतीय जनता पक्षाच्या प्रदेश उपाध्यक्षा चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनी येथे केले. (BJP leader chitra wagh criticised state Government)
येवला येथे एका भोंदूबाबाच्या अत्याचाराला बळी पडलेल्या कुटुंबीयांची भेट घेतल्यानंतर नाशिकमध्ये भाजपच्या वसंत-स्मृती कार्यालयात त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्या म्हणाल्या, की येवला तालुक्यात भोंदूबाबाकडून महिलांचे शोषण होत असल्याची माहिती मिळाल्यानंतर काही महिलांकडे विचारणा केली. पोलिस यंत्रणेकडून सुरू असलेल्या तपासाचीदेखील माहिती घेतली. मात्र, येथे योग्य पोलिस तपास सुरू असल्याचे दिसून आले. भोंदूबाबांच्या अंधश्रद्धेला महिलांनी बळी पडू नये, या संदर्भात अजून किती महिला बळी पडल्या याचाही तपास करावा.
त्या म्हणाल्या, राजरोसपणे अत्याचार करून गुंड मोकाट फिरत आहेत. कायद्याचे भय नाही की पोलिसांचा धाक नाही. त्याला गोरगरीब जनता बळी पडते. महिलांनीदेखील ताकदीने समोर यावे. नाशिकबरोबरच राज्यात सर्वत्र कायदा व सुव्यवस्था बिघडली असल्याचा आरोपही त्यांनी केला. पुण्यातील भारतीय कामगार सेनेचा पदाधिकारी रघुनाथ कुचिक याचा उल्लेख करताना, पुरावे देऊनही त्याला जामीन मिळत असल्याबद्दल आश्चर्य व्यक्त केले.
पोलिस जामीन रद्द करण्यासाठी प्रयत्न का करत नाहीत, असा सवाल उपस्थित करतानाच कुचिकवर दोन दिवसांपासून फेसबुकवर पोस्ट टाकून गायब असलेल्या मुलीवर बलात्कार केल्याचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी चित्रा वाघ यांनी केली. शहराध्यक्ष गिरीश पालवे, ज्येष्ठ नेते लक्ष्मण सावजी, हिमगौरी आहेर-आडके, संध्या कुलकर्णी आदी या वेळी उपस्थित होते.
----
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.