Leopard tiger human conflict : 250 हून अधिक मृत्यू, 17 हजार पाळीव प्राण्यांचा फडशा; वाघ-बिबट्याचे हल्ले म्हणजे..! अजितदादांच्या शिलेदाराचा विधिमंडळाला अभ्यासपूर्ण तडाखा

Parner MLA Kashinath Date Presents Leopard–Tiger Human Conflict Data in Nagpur Assembly : नागपूर हिवाळी अधिवेशनात आमदार काशिनाथ दाते यांनी बिबट आणि वाघांचे मानवी वस्तीवरील हल्ल्यांवर अभ्यासपूर्ण भाषण केले.
MLA Kashinath Date
MLA Kashinath DateSarkarnama
Published on
Updated on

Nagpur winter session discussion : राज्यातील विविध भागात वाघ आणि बिबट्यांच्या हल्ले वाढले आहेत. या हिंस्त्र वन्यप्राण्यांबरोबर मानवी संघर्ष तीव्र होताना दिसतो आहे. नागपूर हिवाळी अधिवेशनात वन्यप्राण्यांबरोबर मानवी संघर्षाचे पडसाद उमटले.

जुन्नरचे आमदार शरद सोनवणे यांनी सरकारचं लक्ष वेधण्यासाठी नागपूर विधिमंडळात बिबट्या वेश परिधान करून एन्ट्री केली. यावर अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार काशिनाथ दाते यांनी, विधिमंडळात वन्यप्राण्यांबरोबर मानवी संघर्ष म्हणजे, नुसती धोक्याची घंटा नसून, वाजणारी धोक्याची घंटा आहे, असे सांगून अभ्यासपूर्ण मांडणी करत, आपल्याच सरकारला तडाखा दिला.

गेल्या तीन ते चार वर्षांपासून राज्यात (Maharashtra) वाघ-बिबट या हिंस्त्र वन्यप्राण्यांबरोबर मानवी संघर्ष वाढत चालला आहे. अलीकडच्या काळात बिबट्यांचे मानवी वस्तीत घुसून होणारे हल्ले वाढले आहेत. यात बिबट्या आणि वाघांच्या हल्ल्यांत 250 हून अधिक नागरिकांचा मृत्यू झाला आहे, तर 17 हजारहून अधिक पाळीव प्राण्यांचा फडशा पडाल्याकडे आमदार काशिनाथ दाते यांनी सरकारचे लक्ष वेधले.

आमदार काशिनाथ दाते यांनी राज्याच्या वनमंत्र्यांचे लक्ष वेधताना, सप्टेंबर 2025 मध्ये पारनेर (Parner) तालुक्यातील कळस इथं युवकाचा झालेला मृत्यू, तर पारनेर शहरात तीन वर्षीय बालिकेचा बिबट्याच्या हल्ल्यात झालेला झाला. अहिल्यानगर जिल्ह्यातील खारेकर्जुने इथल्या पाच वर्षांच्या मुलीचा मृत्यू, तसेच जानेवारी ते नोव्हेंबर 2025 दरम्यान नाशिक व अहिल्यानगर जिल्ह्यात तब्बल 20 जणांचा बिबट्या आणि वाघांच्या हल्ल्यात बळी गेल्याकडे लक्ष वेधल.

MLA Kashinath Date
Akole Sangamner railway demand : शिंदेंच्या शिलेदारानं फलक झळकवताच, अजितदादांच्या लडक्या आमदाराची मागणीचा "फ्लेक्स" घालून विधिमंडळात एन्ट्री!

गोंदिया जिल्ह्यातील तिरोड्यात वडिलांसोबत शेतात गेलेल्या बालिकेचा वाघानं बळी घेतला, तर चंद्रपूर जिल्ह्यातील मूल तालुक्यात चिचपल्ली वनपरिक्षेत्रात गुराख्याचा वाघाच्या हल्ल्यात मृत्यू झाला. पुणे जिल्ह्यातील पिंपरखेड इथं 13 वर्षीय मुलाचा, 2 नोव्हेंबरला बिबट्याने बळी घेतला. यापूर्वीच एका पाच वर्षांच्या मुलीचा मृत्यू झाला आहे. अशा अनेक घटनां अलीकडच्या काळात घडल्याने स्थानिकांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण पसरले आहे, असे काशिनात दाते यांनी म्हटले.

MLA Kashinath Date
Dhananjay Munde Manoj Jarange criticism : भर सभेतून पवारांच्या शिलेदाराचा धनंजय मुंडेंना फोन; जरांगेंवर एका वाक्यात बरसले, टक्क्यात सुद्धा ठेवणार नाही!

राज्यात पाच हजारांपेक्षा जास्त बिबटं

आमदार काशिनाथ दाते यांनी, राज्यात बिबट्यांची संख्या पाच हजारांपेक्षा अधिक असल्याचा अंदाज व्यक्त केला. वनविभागाच्या सर्व्हेनुसार जंगलांमध्ये 2,285 बिबटे असल्याचे समोर आले आहे. मात्र जंगलाबाहेर द्राक्ष, ऊस आणि कापसाच्या शेतीत मोठ्या प्रमाणात बिबट्यांची पैदास होऊन याठिकाणचे सर्वेक्षणच न झाल्याचीकडे लक्ष वेधले. फक्त जुन्नर वनपरिक्षेत्रातच तब्बल दोन हजार बिबटे असल्याचे दिसून येत आहे, तर राज्यात इतकी मोठी संख्या असताना फक्त पाच बिबट्यांच्या नसबंदीला परवानगी दिली गेल्याची बाब गंभीर आहे, याकडे देखील काशिनाथ दाते यांनी लक्ष वेधले.

उच्चस्तरीय उपाययोजना हव्यात

वाघ अन् बिबट्यांशी संघर्ष होत असताना, यातच बिबट्यांची संख्या अनियंत्रितपणे वाढत आहे. यातच राज्यात वन अधिकारी व रक्षकांची हजारो पदे रिक्त आहेत. ज्यामुळे नियंत्रणाची क्षमता कमी झाली आहे. यात आता सरकारचा हस्तक्षेप गरजेचा आहे. नुसतं धोक्याची घंटा आहे, असे ओरडून चालणार नाही. तर उच्चस्तरीय उपाययोजना लागू कराव्यात, अशी मागणी काशिनाथ दाते यांनी केली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com