साहित्य संमेलन; सारस्वतांनो नाशिकला येत असाल तर ‘नो व्‍हॅक्‍सिन, नो एंट्री’

ओमिक्रॉनच्‍या संभाव्‍य धोक्‍यामुळे जिल्‍हा प्रशासनाचा साहित्य संमेलनाबाबातचा निर्णय
Suraj Mandhre, Collector, Nashik
Suraj Mandhre, Collector, NashikSarkarnama
Published on
Updated on

नाशिक : ९४ व्‍या अखिल भारतीय मराठी साहित्‍य संमेलनात सहभागासाठी सारस्‍वत, रसिकांनी कोरोना प्रतिबंधक लसीकरण करून घेणे अनिवार्य असणार आहे. जगभरात थैमान घालत असलेल्या कोरोनाच्‍या ओमिक्रॉन व्हेरिएंटच्‍या पार्श्‍वभूमीवर जिल्‍हा प्रशासनाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. संमेलनात ‘नो व्‍हॅक्‍सिन, नो एंट्री’ अर्थात लसीकरण न झालेल्‍यांना प्रवेश नाकारला जाईल, असे जिल्‍हाधिकारी सूरज मांढरे (Collector Suraj Mandhre) यांनी स्‍पष्ट केले.

Suraj Mandhre, Collector, Nashik
नाशिकच्या प्रशासनाने धसका घेतलेला तो `आर्यनमन` आहे तरी कोण?

येथील कुसुमाग्रज नगरी मेट भुजबळ नॉलेज सिटी येथे ३ ते ५ डिसेंबरदरम्‍यान संमेलन होत आहे. या संदर्भात जिल्‍हाधिकारी मांढरे यांनी सविस्‍तर माहिती जारी केली आहे. ओमिक्रॉन या नव्‍याने आढळलेल्‍या कोरोना व्हेरिएंटबाबत जिल्‍हा प्रशासन सतर्क असून, विविध उपाययोजना केल्‍या जात आहेत. साहित्य संमेलनाबाबत आयोजकांशी सविस्‍तर चर्चा केलेली आहे. मास्‍क, शारीरिक अंतर व अन्‍य कोरोनाविषयक बाबींचे संपूर्ण पालन केले जाईल. खबरदारी म्‍हणून लसीकरण झालेल्‍यांनाच संमेलनात सहभागी करून घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, तसेच प्रवेशद्वारावर गर्दी होऊ नये, यासाठी विशेष खबरदारी घेण्याच्‍या सूचना आयोजकांना दिल्या असल्‍याचे श्री. मांढरे यांनी स्‍पष्ट केले.

Suraj Mandhre, Collector, Nashik
अजित पवार यांच्यासमोर तरी आपली एकजूट दिसली पाहिजे

बालगोपाळांना मुभा

अठरा वर्षांखालील वयोगटासाठी लसीकरण उपलब्‍ध झालेले नसल्‍याने कुमार गट, बालगटातील उपक्रमांत सहभागी होणाऱ्या बालगोपाळांना या अटीपासून वगळण्यात येईल. त्‍यांना लसीकरणाची सक्‍ती राहणार नाही, तर अठरा वर्षांवरील सर्व प्रौढांनी लशीचा किमान एक डोस घेतलेला असणे आवश्‍यक असेल. संमेलनस्‍थळी दाखल होताना, लसीकरणाचे प्रमाणपत्र किंवा अन्‍य आवश्‍यक पुरावा सादर करावा लागेल.

....

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com