

Nashik Live in Relationship Crime News: नाशिकमध्ये लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये तब्बल १५ वर्षे सोबत राहणाऱ्या प्रियकराचा गळा चिरून खून केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पुरावा नष्ट करण्यासाठी हत्या केल्यानंतर मृतदेह तब्बल १८ तास घरातच ठेवण्यात आला आणि त्यानंतर मध्यरात्री कसारा घाटात नेऊन फेकण्यात आला.
६ ऑगस्ट रोजी पहाटे वसंत सातपुते हे घरी झोपलेले असताना त्यांची प्रेयसी हसीना शेख हिने नव्या प्रियकराच्या मदतीने त्यांचा गळा चिरून हत्या केल्याचे तपासात समोर आलं आहे. त्यानंतर मृतदेह घरातच ठेवण्यात आला आणि ७ ऑगस्टच्या पहाटे नाशिक-मुंबई महामार्गावरील कसारा घाटात मृतदेह फेकून देण्यात आला.
वसंत सातपुते यांच्याशी संपर्क होत नसल्याने त्यांच्या नातेवाईकाने याप्रकरणी तक्रार दाखल केली होती. त्यानंतर गुन्हे शाखा युनिट क्रमांक १च्या पथकाने तपास सुरू केला. तपासादरम्यान कसारा घाटातून सातपुते यांचा मृतदेह पोलिसांनी शोधून काढला.
प्रेमसंबंधात अडथळा निर्माण होत असल्याच्या कारणातून हसीना शेख हिने नव्या प्रियकरासह खुनाचा कट रचल्याचं पोलिसांच्या तपासात निष्पन्न झालं आहे. याप्रकरणी हसीना शेखसह साहिल शहा, मोईन शहा आणि आणखी एका संशयिताला पोलिसांनी ताब्यात घेतलं असून, गुन्हे शाखेकडून पुढील तपास सुरू आहे, अशी माहिती सहाय्यक पोलीस आयुक्त, संदिप मिटके यांनी दिली.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.