Ram Mandir Donation: राम मंदिर दानचोरी प्रकरणात चंपत राय, अनिल मिश्रा यांना क्लीनचीट; सुप्रीम कोर्टाच्या देखरेखीखालील SITच्या अहवालत नेमकं काय म्हटलंय?

Ram Mandir Donation: राम मंदिर दानचोरी प्रकरणाचा तपास एसआयटीकडून पूर्ण झाला असून त्याचा अंतिम अहवाल शासनाला सादर करण्यात आला आहे.
Ram Mandir Trust accepts Champat Rai resignation
Ram Mandir Trust accepts Champat Rai resignation Sarkarnama
Published on
Updated on

Ram Mandir Donation: अयोध्येतील राम जन्मभूमी मंदिरात दानचोरी प्रकरणी सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर उत्तर प्रदेश सरकारनं स्थापन केलेल्या विशेष तपास पथकानं अर्थात एसआयटीनं आपला तपास पूर्ण केला असून त्याचा अंतिम अहवाल उत्तर प्रदेश सरकारला सादर केला आहे. या अहवालात राम जन्मभूमी मंदिर ट्रस्टचे माजी सरचिटणीस चंपत राय यांना क्लीनचीट देण्यात आली आहे. याप्रकरणात त्यांच्यावरच सर्वाधिक आरोप करण्यात आले होते. त्यांच्याबरोबर ट्रस्टे सदस्य अनिल मिश्रा यांनाही क्लीनचीट देण्यात आली आहे.

Ram Mandir Trust accepts Champat Rai resignation
CM Fadnavis ON FDA: तुकाराम मुंढेंच्या खात्याला कोर्टाकडून 5 लाखांचा दंड : लगेचच CM फडणवीसांकडून FDAच्या कामाबद्दल निरीक्षण

सुप्रीम कोर्टानं २५ जुलै रोजी जारी केलेल्या अधिसूचनेद्वारे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी विशेष तपास तपथकाची स्थापना केली होती. या एसआटचीच्या तपासावर भाष्य करताना सुप्रीम कोर्टानं दोनच दिवसांपूर्वी एसआयटीला लवकरात लवकर तपास पूर्ण करा आणि त्याला लॉजिकल एन्डपर्यंत पोहोचवण्याची सूचना केली होती. तसंच याचा अंतिम अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले होते. सध्या या एसआयटीवर तीन न्यायाधीशांचं खंडपीठ लक्ष ठेवून आहे. त्यानुसार, एसआयटीनं आपल्या तपासाचा अंतिम अहवाल आज उत्तर प्रदेश सरकारला सादर केला. पण हा अहवाल पाहिल्यानंतर या प्रकरणात मोठा ट्विस्ट आल्याचं दिसून आलं आहे.

अहवालात नेमकं काय म्हटलंय?

एसआयटीनं आपल्या प्राथमिक अहवालात ज्या ८ आरोपींवर गुन्हा दाखल होऊन त्यांना अटक करण्यात आली होती. याच आठ लोकांची नाव या अंतिम चौकशी अहवालात दिसून आली असून यातून चंपत राय आणि अनिल मिश्रा यांची नाव वगळण्यात आली आहेत. यावरुन या दोघांना एसआयटीकडून क्लीनचीट दिल्याचं सांगितलं जात आहे. तसंच देणग्यांची मोजणी करताना बँक आणि ट्रस्टने केलेल्या देखरेखीच्या व नियोजनाच्या पद्धतींमधील काही त्रुटी आणि उणिवांचाही या अहवालात उल्लेख करण्यात आला आहे. त्यानंतर, प्रशासकीय व्यवस्था अधिक बळकट करण्यासाठी पावले उचलण्यात आली आहेत, असंही या अहवालात म्हटलं आहे.

Ram Mandir Trust accepts Champat Rai resignation
Nashik Kumbh Mela Scam : कुंभमेळ्यातील घोटाळ्याचं बिंग कसं फुटलं? जळगावच्या प्रिंटिंग प्रेसपासून अग्रीमेंटपर्यंत ; बनावट वर्क ऑर्डरची इनसाईड स्टोरी समोर

चंपत राय, अनिल मिश्रांच्या भूमिकेवर निर्माण झालं होतं प्रश्नचिन्ह

दानचोरीच्या प्रकरणात चंपत राय आणि अनिल मिश्रा यांच्या भूमिकेवर अनेक प्रश्न उपस्थित करण्यात आले होते. एसआयटी स्थापन झाल्यानंतर या पथकानं इतर आरोपींकडून मोठ्या प्रमाणावर रोकड जप्त केली होती. त्यामुळं चंपत राय आणि अनिल मिश्रा यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. पण आता एसआयटीच्या अहवालात दोघांचीही नाव न आल्यानं त्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com