Bhaskar Bhagre News : प्रचाराला गेलेले राष्ट्रवादीचे उमेदवार भगरे यांनी वाजंत्रीच्या तालावर धरला ठेका!

Dindori Lok Sabha Election 2024 : दिंडोरी लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीचे उमेदवार प्रचारासाठी गावोगावी लावताहेत हजेरी
Bhaskar Bhagre dance
Bhaskar Bhagre dancesarkarnama
Published on
Updated on

Dindori News : दिंडोरी लोकसभा मतदारसंघात ( Dindori Lok Sabha Constituency ) महाविकास आघाडीने ( Mahavikas Aghadi ) प्रचारात देखील आघाडी घेतली आहे. उमेदवार भास्कर भगरे ( Bhaskar Bhagre ) विविध गावांना भेटी देतात. ते गावातील विवाह, समारंभांना आवर्जून हजेरी लावतात. या मतदारसंघात महाविकास आघाडीने प्रचारात गावोगावच्या कार्यकर्त्यांना सहभागी केले आहे. महायुतीच्या उमेदवाराचाही प्रचार होत आहे. त्यामुळे निवडणुकीला आता चांगलाच रंग भरला आहे.

महाविकास आघाडीचा ( Mahavikas Aghadi ) प्रचार सध्या चांदवड तालुक्यात सुरू आहे. प्रत्येक गावात गेल्यानंतर प्रमुख कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांची चर्चा करण्यात येते. शनिवारी पिंपळनेर चांदवड येथे निवडणुकीचा प्रचार सुरू होता. जवळच विवाह समारंभ देखील होता. यानिमित्ताने सर्व पदाधिकारी आणि नेत्यांनी विवाह समारंभाला आवर्जून हजेरी लावली. यावेळी ग्रामीण भागातील पारंपारिक वाजंत्री आणि आणि संभळ हे वाजविले जात होते. यजमानांनी आग्रह केल्यावर घरचे कार्य समजून उमेदवार भागरे यांनीही ठेका धरला.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

यावेळी शिवसेनेचे संपर्क नेते जयंत दिंडे, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख नितीन आहे, शिवसेनेचे तालुकाप्रमुख विलास भवर, काँग्रेसचे संजय जाधव आदी नेतेही त्यात सहभागी झाले त्यामुळे ग्रामस्थांनी महाविकास आघाडीच्या या नेत्यांच्या उत्स्फूर्त ठेक्याचा चांगलाच आनंद घेतला. त्याचा व्हिडिओ समाज माध्यमांवर देखील व्हायरल झाला.

या मतदारसंघात तिरंगी लढत होणार आहे. यामध्ये भारतीय जनता पक्षाच्या विद्यमान खासदार आणि राज्यमंत्री डॉक्टर भारती पवार, महाविकास आघाडीचे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे भास्कर भगरे आणि मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे माजी आमदार जे. पी. गावित यांच्यासह वंचित बहुजन आघाडीने मालती थवील यांना उमेदवारी दिली आहे. गावित यांनी शुक्रवारी उमेदवारी अर्ज दाखल केला. राष्ट्रवादीचे भगरे सोमवारी आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.


( Edited By : Akshay Sabale )

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com