Nashik Political News : नाशिक लोकसभा मतदारसंघावरून महायुतीत गुंता अधिकच वाढला आहे. उमेदवारीसाठी दोन दिवस मुंबईत तळ ठोकूनही मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी खासदार हेमंत गोडसेंना ताटकळत ठेवले. मात्र त्यांना रित्याहती शुक्रवारी (ता. 29) परतावे लागले आहे. नाशिकला येताच गोडसेंनी महाआरतीच्या माध्यमातून शक्तिप्रदर्शन करण्याचा निर्णय घेतला आहे. यातून गोडसे अप्रत्यक्षपणे अजित पवार गटाचे नेते, मंत्री आणि लोकसभेसाठी इच्छुक छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) आणि भाजपला इशारा देणार असल्याचे बोलले जात आहे.
नाशिक (Nashik) मतदारसंघ महायुतीसाठी आता राज्यातील एक वादग्रस्त मतदारसंघ होऊ पाहत आहे. गेले दोन दिवस या मतदारसंघाबाबत गेल्या दोन दिवसात रोज नव्या राजकीय घडामोडी घडत आहेत. त्यामुळे तिन्ही पक्षांमध्ये आणि इच्छुकांमध्ये तणावाचे वातावरण आहे. हा तणाव निवडण्याची चिन्हे नाहीत. उलट त्यात दिवसेंदिवस भरच पडताना दिसत आहे.
नाशिकच्या उमेदवारीबाबत खासदार हेमंत गोडसे (Hemant Godse) गेले दोन दिवस मुंबई तळ ठोकून होते. या कालावधीत त्यांना उपमुख्यमंत्र्यांकडून भेटीसाठी वेळ मिळाला नाही. आज याबाबत खासदार गोडसे तसेच त्यांच्या काही सहकाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. ठाणे येथे खासदार श्रीकांत शिंदे यांची भेट घेतली. मात्र उमेदवारी बाबत कोणताही शब्द त्यांना मिळाला नाही. गोडसे यांनी भाजप नेत्यांची चर्चा करावी असा सल्ला त्यांना देण्यात आल्याची कळते. त्यामुळे संतप्त गोडसे समर्थक नाशिकला परतले आहेत.
भाजपच्या वरिष्ठ स्तरावरील नेत्यांनी नाशिक मतदारसंघातून अजित पवार (Ajit Pawar) गटाचे नेते आणि राज्याच्या अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळांना उमेदवारी देण्याच्या सूचना केल्या आहेत. वरिष्ठ स्तरावर झालेल्या या निर्णयात राज्यस्तरावरील नेत्यांना बदल करणे अशक्य असल्याचे बोलले जाते. त्यामुळे उमेदवारीचा हा गुंता मोठा झाला आहे. दरम्यान, आजच उमेदवारीची घोषणा अपेक्षित होती. मात्र आता ती अनिश्चित काळासाठी लांबली आहे. यामुळे महायुतीच्या तिन्ही पक्षांत तणाव निर्माण झाला आहे.
या सर्व घडामोडींमुळे शिंदे गटाचे (Eknath Shinde) पदाधिकारी आणि खासदार गोडसे समर्थक प्रचंड संतप्त आहेत. खासदार गोडसे मुंबईहून रित्या हाती नाशिकला परतले. आता यावर वेगळ्या निर्णय घेण्याची त्यांची चर्चा आहे. आता ते शनिवारी सकाळी शालीमार येथील मारुती मंदिरात महाआरती करून शक्ति प्रदर्शन करतील. या शक्तिप्रदर्शनातून एकाच वेळी मंत्री छगन भुजबळ आणि भारतीय जनता पक्ष अशा दोघांनाही इशारा देण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. या सर्व घडामोडींमध्ये नाशिकमधील महायुतीच्या नेत्यांत तणाव वाढत चालला आहे. त्याचा गंभीर परिणाम येत्या निवडणुकीतील प्रचारात होऊ शकतो, असे राजकीय जाणकारांचे म्हणणे आहे.
(Edited by Sunil Dhumal)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.