Lok Sabha Election 2024 : श्रीकांत शिंदे यांच्या घोषणेने भाजप कोमात, ठाकरे गट जोमात!

Hemant Godse News : गोडसे यांच्या उमेदवारीला भाजपने विरोध केला आहे. जागावाटपाचा निर्णय अद्याप झालेला नसताना उमेदवारी जाहीर करणे योग्य नसल्याचे भाजपने म्हटले आहे.
Uddhav Thackeray, CM Eknath Shinde
Uddhav Thackeray, CM Eknath ShindeSarkarnama
Published on
Updated on

Nashik News : नाशिक लोकसभा मतदारसंघ (Lok Sabha Election 2024) महायुतीच्या घटक पक्षांना अतिशय सोपा वाटत होता. त्यामुळे अनेक इच्छुक पडद्यामागून उमेदवारीसाठी सूत्रे हलवत होते. या सर्वांवर शिवसेनेचे खासदार श्रीकांत शिंदे यांनी उमेदवारीची घोषणा करून मात केली. या घोषणेचे पडसाद महायुतीच्या अन्य घटक पक्षांमध्ये उमटले आहेत.

श्रीकांत शिंदे (Shrikant Shinde) यांनी विद्यमान खासदार हेमंत गोडसे (Hemant Godse) हे नाशिकचे उमेदवार असतील अशी घोषणा केली आहे. भारतीय जनता पक्ष (BJP) आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडून (NCP) इच्छुक म्हणून अनेक पदाधिकारी प्रयत्नशील होते. त्या सर्वांना आता आपल्या तलवारी मॅन करावे लागणार आहेत. त्याबाबतची नाराजी त्यांनी उघडपणे व्यक्त केली आहे. त्यामुळे अधिकृत उमेदवारी जाहीर झाल्यानंतर हेमंत गोडसे यांना महायुतीच्या (Mahayuti) घटक पक्षांमध्ये समन्वय निर्माण करण्यासाठी घाम गाळावा लागेल.

Uddhav Thackeray, CM Eknath Shinde
Jalgaon Loksabha Constituency : उन्मेश पाटलांना पक्षांतर्गत वादाचा बसला फटका?

हेमंत गोडसे यांची उमेदवारी जाहीर झाल्याने नाशिक लोकसभा मतदारसंघाचे चित्र स्पष्ट झाले आहे. शरद पवार यांच्या दौऱ्यात त्यांनी नाशिक मतदारसंघ शिवसेनेच्या ठाकरे गटाला सोडण्यात आल्याचे स्पष्ट संकेत दिले. त्याचबरोबर मतदारसंघात उमेदवाराची चाचपणी त्यांनी केली. त्यामुळे आता नाशिकमध्ये शिवसेनेच्या उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) विरुद्ध मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्यातच खरी लढत होईल हे स्पष्ट झाले आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

लोकसभा निवडणुकीच्या जागावाटप आणि उमेदवारांची घोषणा ही प्रक्रिया आता अंतिम टप्प्यात आहे. त्यामुळे अनेक इच्छुक वरिष्ठ नेत्यांच्या भेटी घेत असल्याचे दिसते. पवार यांच्या दौऱ्यात माजी महापौर दशरथ पाटील यांनी पवार यांची भेट घेऊन उमेदवारीसाठी इच्छुक असल्याचे पत्र दिले आहे. याशिवाय अन्य काही इच्छुकांनी आपले प्रतिनिधी पवार यांच्या भेटीसाठी पाठविले होते. या सर्व धावपळीत शिवसेनेचे (उद्धव ठाकरे) दावेदार असलेले विजय करंजकर यांचे नाव मागे पडू लागल्याचे स्पष्ट झाले आहे.

शिवसेना (उद्धव ठाकरे) नेते खासदार संजय राऊत यांनीदेखील आपल्या नाशिक दौऱ्यात लोकसभा निवडणूक व उमेदवार यावर विशेष भर दिला होता. आमच्या पक्षाकडे तीन-चार संभाव्य उमेदवार असल्याचे त्यांनी सांगितले. शिवसेना ठाकरे गट नाशिक मतदारसंघासाठी अतिशय गांभीर्याने तयारीला लागला आहे. महाविकास आघाडीचे घटक पक्षदेखील शिवसेनेला उमेदवार तसेच निवडणूक तयारीसाठी मनापासून मदतीला आले आहेत. त्यामुळे नाशिक मतदारसंघात ऐनवेळी वेगळेच राजकीय चित्र व लढत पाहायला मिळाल्यास नवल वाटणार नाही.

R

Uddhav Thackeray, CM Eknath Shinde
MP Sujay Vikhe News : सुजय विखेंच्या उमेदवारीबरोबरच नगर जिल्ह्यात विरोधी उमेदवाराबाबत चर्चांना उधाण!

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com