Lok Sabha Election 2024: पुलवामा हल्ल्यावेळी PM मोदी..., भास्कर जाधवांची बोचरी टीका

Bhaskar Jadhav On Narendra Modi: "पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मागील दोन्ही निवडणूकांमध्ये जनतेला मोठी आश्‍वासने दिली होती. या आश्‍वासनांच्या स्वप्नात जनता होती. मात्र गेल्या दहा वर्षात जनतेच्या सर्व स्वप्नांचा चुराडा करीत देशाला महागाई, बेरोजगारीच्या खाईत लोटलं आहे."
Bhaskar Jadhav, Narendra Modi
Bhaskar Jadhav, Narendra ModiSarkarnama
Published on
Updated on

Nagar Lok Sabha Election 2024: शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते आमदार भास्कर (Bhaskar Jadhav) जाधव यांनी पंतप्रधानाच्या उच्च राहणीमानवरून टीका केली आहे. "पुलवामा हल्ल्यात आपले 42 जवान मारले गेले, तेव्हा देशावर शोककळा पसरली होती. मात्र या काळात पंतप्रधान फोटोशूट करण्यात व्यग्र होते. त्यांनी भावनिक राजकारण करून देशाला दोनदा गंडवले, पण आता नाही. पक्ष फोडून सत्तेत राहणाऱ्यांना माफी नाही. अब की पार भाजप तडीपार निश्चित आहे." असं म्हणत आमदार जाधव यांनी भाजपसह मोदींवर हल्लाबोल केला.

आमदार भास्कर जाधव (Bhaskar Jadhav) यांच्या उपस्थित जामखेडमध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार माजी आमदार नीलेश लंकेंच्या प्रचाराची सांगता सभा झाली. आमदार जाधव म्हणाले, नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात भाजप उमेदवार सुजय विखे (Sujay Vikhe) यांच्या धनशक्तीसमोर महाविकास आघाडीचे उमेदवार माजी आमदार नीलेश लंके (Nilesh Lanke) यांची जनशक्ती भारी पडणार. लंके खासदार म्हणून संसदेत जाणार असा विश्वास आहे. लंकेंचा विजय लोकशाही आणि संविधानाचा विजय असणार आहे, असं जाधव म्हणाले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्याकडे विकासाचा मुद्दा नाही. म्हणून ते भावनिक मुद्दे पुढे करत आहेत. मोदी यांनी मागील दोन्ही निवडणूकांमध्ये जनतेला मोठी आश्‍वासने दिली होती. या आश्‍वासनांच्या स्वप्नात जनता होती. मात्र गेल्या दहा वर्षात जनतेच्या सर्व स्वप्नांचा चुराडा करीत देशाला महागाई, बेरोजगारीच्या खाईत लोटल्याची टीका जाधव यांनी केली.

Bhaskar Jadhav, Narendra Modi
Lok Sabha Election 2024: साध्या माणसाविरोधात विश्वनेत्यांना सभा घ्यावी लागली, रोहित पाटलांची टोलेबाजी

'जीएसटी'च्या रूपाने जनता, शेतकऱ्यांचा खिसा कापला

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी भाजप सरकार देशातील सरकारी यंत्रणाचा अतिवापरावर टीका केली. पवार कुटुंबीयांना ईडीच्या माध्यमातून त्रास दिला. त्यांनी आपल्यासोबत यावे म्हणून दबाव आणला. परंतु रोहित पवार घाबरले नाहीत. त्यांनी या सर्व त्रासाचा सामना केला. 'जीएसटी'च्या रूपाने भाजपने (BJP) सर्वसामान्य जनता, शेतकरी वर्गाचा खिसा कापला. सगळ्याच वस्तूंवर जीएसटी आकारला. भाजपच्या काळात देश अराजकतेकडे चालला आहे. एकीकडे 25 लाख कोटी रूपयांचे उद्योगपतींचे कर्ज माफ केले जात असताना दुसरीकडे सर्वसामान्य जनतचे हाल होत असल्याची टीका जयंत पाटील यांनी केली.

(Edited By Jagdish Patil)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com