Ramdas Athawale News : नाही कोणतेही भय... निवडून येणार सुजय...; आठवलेंनी कवितेतून मांडला 'विजय'

Ramdas Athawale On Congress : घटनेनुसार धार्मिक आधारावर आरक्षण देता येत नाही. परंतु, काँग्रेस ओबीसीमधून मुस्लिम आरक्षण देण्याचा प्रचार करतात, अशी टीका आठवलेंनी केली.
ramdas athawale
ramdas athawalesarkarnam

Ahmednagar News, 11 May : केंद्रीय मंत्री रामदास आठवले हे आपल्या कवितांमुळे प्रसिद्ध आहेत. मंत्री आठवलेंनी माध्यमांशी संवाद साधताना मतदारांना आवाहन करत महायुतीचे उमेदवार खासदार सुजय विखे ( Sujay Vikhe ) यांचा विजय कवितेतून मांडला. 'तुम्ही मनामध्ये ठेवू नका कोणतेही भय... कारण निवडून येणार आहेत सुजय...', आठवलेंच्या या कवितेनंतर त्यांच्याभोवती असलेल्या समर्थकांनी टाळ्यांची दाद दिली. तसेच, काँग्रेसनं शरद पवार यांना ( Sharad Pawar ) पंतप्रधान होऊ न दिल्याचा दावा, मंत्री आठवलेंनी केला.

महायुती भाजपचे नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघाचे ( Ahmednagar Lok Sabha Election 2024 ) उमेदवार खासदार डॉ. सुजय विखे व शिर्डीतील उमेदवार सदाशिव लोखंडे ( Sadashiv Lokhande ) यांच्या प्रचारासाठी मंत्री आठवले नगरला आले होते. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. पालकमंत्री राधाकृष्ण विखे, माजी मंत्री डॉ. राजकुमार बडोले, विनायक देशमुख, नरेश चव्हाण, राजू वाघमारे उपस्थित होते.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

"शरद पवार यांनी 'एनडीए'मध्ये यावे, असे माझे फार पूर्वीपासूनचे आवाहन आहे. कारण, काँग्रेसने त्यांच्यावर अन्याय केलेला आहे. पंतप्रधानपदाची संधी असतानाही काँग्रेसने ती त्यांना देता न देता मनमोहन सिंग यांना दिली. दुसऱ्या वेळीही पवारांना डावलले व सिंग यांनाच पुन्हा संधी दिली. त्यामुळे आता त्यांच्यावर अन्याय करणाऱ्या काँग्रेसमध्ये त्यांनी त्यांचा पक्ष विलीन न करता, त्यांनी आमच्या महायुतीमध्ये यावे," असे आवाहन मंत्री रामदास आठवले ( Ramdas Athawale ) यांनी केले.

"छोटे पक्ष काँग्रेसमध्ये विलीन करण्याबाबत शरद पवार बोलले असले, तरी केवळ त्यांचा एकच राष्ट्रवादी पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होऊ शकतो. परंतु, त्यांनी तसे न करता ते जर अजित पवारांच्या राष्ट्रवादीत आले तर त्यांचे घड्याळ चिन्ह त्यांना परत मिळेल. तसेच, धनुष्यबाण चिन्ह गेल्याने संतापलेले उद्धव ठाकरे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासमवेत आले तर, त्यांचे धनुष्यबाण चिन्हही त्यांना मिळेल. यातून अजित पवार व एकनाथ शिंदे फार काही नाराज होणार नाहीत," असा दावाही मंत्री आठवले यांनी केला.

"नरेंद्र मोदी मुस्लिम विरोधी नाही"

"भाजपचा 'चारशे पार'चा नारा हा संविधान बदलासाठी आहे. यातून लोकशाही धोक्यात येईल, असा दावा काँग्रेस करत असली तरी देशाची लोकशाही नाही, तर काँग्रेसच धोक्यात आलेली आहे. संविधान कोणालाच बदलता येणार नाही. फक्त त्यात, दुरुस्ती करता येऊ शकते. काँग्रेसने तर 80 वेळा, अशी दुरुस्ती केली आहे. संविधानाची शपथ घेतच पंतप्रधान नरेंद्र मोदी सत्तेवर आले आणि देशाची अर्थव्यवस्था सुधारली. चारशे पारच्या नाऱ्यातून संविधान बदल होणार नाही. उलट संविधान मजबुतीकरण होईल. काँग्रेस पक्ष भेदभावाचे वातावरण पसरवत आहे. घटनेनुसार धार्मिक आधारावर आरक्षण देता येत नाही. परंतु, काँग्रेस ओबीसीमधून मुस्लिम आरक्षण देण्याचा प्रचार करतात. ही घटना विरोधी भूमिका आहे. नरेंद्र मोदी मुस्लिम विरोधी नाही तर ओबीसीमधून मुस्लिमांना आरक्षण देण्याच्या भूमिके विरोधात आहेत," असे मंत्री आठवले यांनी स्पष्ट केलं.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com