Lok Sabha Election 2024 : रिपाई गवई गट निवडणुकीच्या रिंगणात; प्रस्थापितांचे टेन्शन वाढवणार

RPI Gawai Fraction : नगर जिल्ह्यातील राहुरी येथील मेळाव्यात गवई गट 25 जागा लढवणार असल्याचे प्रदेशाध्यक्षांनी जाहीर केले आहे. महाविकास आघाडीसाठी हा धक्का मानला जात आहे.
Rajendra Gawai
Rajendra GawaiSarkarnama

Ahmednagar News : लोकसभेची निवडणूक (Lok Sabha Election 2024) छोट्या-मोठ्या पक्षांच्या अस्तित्त्वाची लढाई असणार आहे. त्यासाठी चाचपणी सुरू आहे. काही पक्ष छोटे असले तरी प्रस्थापित पक्षांना आव्हान देत आहेत. यातूनच प्रस्थापित पक्षांची डोकेदुखी वाढणार आहे. आता रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या गवई गटाने राज्यात 25 जागांवर लढणार असल्याची घोषणा केली आहे. 

आरपीआय गवई गटाचा (RPI Gawai Fraction) नगर जिल्ह्यातील राहुरी येथे मेळावा झाला. प्रदेशाध्यक्ष सुबोध वाघमोडे यांनी नगर दक्षिण आणि शिर्डी लोकसभा मतदारसंघासाठी आमच्याकडे सक्षम उमेदवार असून राज्यात 25 जागा लढवणार असल्याचे सांगितले.

Rajendra Gawai
Karjat Jamkhed MIDC : एमआयडीसीसाठी आवाज उठवणाऱ्या रोहित पवार यांना बैठकीला टाळले; आज उद्योगमंत्र्यांच्या दालनात बैठक

प्रदेशाध्यक्ष वाघमोडे म्हणाले, युतीचा वाट न बघता लोकसभा निवडणुकीसाठी आम्ही सज्ज आहोत. नगर दक्षिण आणि शिर्डी लोकसभा मतदारसंघासाठी (Shirdi Lok Sabha Constituency) आमच्याकडे सक्षम उमेदवार आहेत. आता युतीत आमचा वापर होऊ द्यायचा नाही. काँग्रेस (Congress) आणि राष्ट्रवादीला (NCP) जेव्हा आमची गरज वाटायची, तेव्हा ते बोलावून घेतात. सभेला उभे करतात. निळ्या झेंड्याचा वापर करतात. आम्हाला जेव्हा न्याय पाहिजे असतो, त्यावेळी हे मात्र भेटत नाहीत, असेही वाघमोडे म्हणाले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

महाविकास आघाडीच्या नेत्यांनी गेल्या निवडणुकीत फसवणूक केली. त्यामुळे आता नगर दक्षिण आणि शिर्डी लोकसभा निवडणुकीसाठी सक्षम उमेदवार देण्याबरोबर राज्यातील पाच राखीव आणि  लोकसभा मतदारसंघात सक्षम उमेदवार देऊन एकूण 25 जागांवर निवडणूक लढणारच, असेही वाघमोडे यांनी म्हटले.

जिल्हाध्यक्ष सुधाकर रोहम हे मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी होते. यावेळी खजिनदार रामराव दाभाडे, प्रदेश उपाध्यक्ष माणिक आठवले, शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे संपर्कप्रमुख तथा प्रभारी किशोर वाघमारे, नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघाचे संपर्कप्रमुख सुशांत मस्के उपस्थित होते.

(Edited By - Rajanand More)

Rajendra Gawai
Sudhakar Badgujar New Chief Shivsena UBT : शहरी जिल्हाप्रमुख शिवसेनेच्या ठाकरे गटाला तारक की मारक?

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com