Sudhakar Badgujar New Chief Shivsena UBT : शहरी जिल्हाप्रमुख शिवसेनेच्या ठाकरे गटाला तारक की मारक?

Sudhakar Badgujar Thackeray Group News : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सुधाकर बडगुजर यांची शिवसेनेच्या जिल्हाप्रमुख पदी नियुक्ती झाली.
Sudhakar Badgujar
Sudhakar Badgujarsarkarnama
Published on
Updated on

प्रदीर्घ काळानंतर शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या जिल्हाप्रमुख पदी शहरी चेहरा असलेले सुधाकर बडगुजर ( Sudhakar Badgujar ) यांची नियुक्ती झाली आहे. मात्र, नाशिक शिवसेनेचा आजवरचा इतिहास पाहता शहरी चेहरा असलेले जिल्हाप्रमुख शिवसेनेच्या विस्ताराला कितपत उपयुक्त ठरतील, हा नवा प्रश्न उपस्थित होत आहे.

Sudhakar Badgujar
Loksabha Election 2024 : श्रीराम शेटे यांनी 'तुतारी' फुंकल्याने दिंडोरीत 'इंडिया' आघाडी झाली भक्कम!

आगामी लोकसभा निवडणुकीच्या ( Lok Sabha Election 2024 ) पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या ठाकरे गटात पदाधिकाऱ्यांच्या नव्या नियुक्त्या झाल्या आहेत. यामध्ये विद्यमान महानगर प्रमुख व शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांचे निकटवर्तीय अशी प्रतिमा असलेले माजी नगरसेवक सुधाकर बडगुजर ( Sudhakar Badgujar ) यांची जिल्हाप्रमुख पदी नियुक्ती झाली आहे. महानगर प्रमुख पदी माजी नगरसेवक विलास शिंदे तर विद्यमान जिल्हाप्रमुख व भगूरचे माजी नगराध्यक्ष विजय करंजकर यांची नाशिक लोकसभा मतदारसंघाच्या समन्वयक पदी नियुक्ती झाली आहे. यानिमित्ताने शिवसेनेत पदाधिकाऱ्यांची खांदेपालट झाली. पण, विविध निवडणुका आणि ग्रामीण भागातील पक्षाचा विस्तार याचा विचार करता शहरी चेहरा असलेले जिल्हाप्रमुख ठाकरे गटाला कितपत न्याय देऊ शकतील, अशी चर्चा सुरू झाली आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

शिवसेना जिल्हाप्रमुख पदाच्या स्पर्धेत असलेले माजी जिल्हा परिषद सदस्य निवृत्ती जाधव (इगतपुरी) आणि तानाजी आगळे (नाशिक) ही दोन नावे आता मागे पडली आहेत. ग्रामीण भागाचा चेहरा असलेली हे दोन्ही नेते ग्रामपंचायत पंचायत समिती ते जिल्हा परिषद अशा विविध पदांवर काम केलेले आहेत. आगळे नाशिक रोड देवळाली व्यापारी बँकेचे संचालक देखील आहेत. जाधव यांनी देखील विविध पदे भूषविली आहेत. त्यामुळे ग्रामीण भागात संपर्क व परिचय असलेल्या या नेत्यांची संधी हुकली. त्यांना आता केव्हा संधी मिळेल या प्रश्नाने ते नाराज देखील होऊ शकतात.

Sudhakar Badgujar
Manikrao Kokate News: आमदार कोकाटे अन् राजाभाऊ वाजे गटाला इशारा, तिसरी शक्ती 'उदयास' येणार?

यापूर्वी 1996 मध्ये तत्कालीन जिल्हाप्रमुख राजाभाऊ गोडसे यांना शिवसेनेने लोकसभेची उमेदवारी देण्यात आली होती. ते निवडून आल्यानंतर त्यांच्या जागेवर 1997 मध्ये नाशिकचे माजी महापौर विनायक पांडे यांची जिल्हाप्रमुख पदी नियुक्ती झाली. विनायक पांडे यांच्यानंतर दत्ता गायकवाड आणि सुनील बागुल यांनी देखील जिल्हाप्रमुख पदी काम केले. मात्र, शहरी चेहरा असलेले हे जिल्हाप्रमुख ग्रामीण भागात पक्षाचा विस्तार करण्यास फारसे उपयुक्त ठरले नाही. या कालावधीत शिवसेनेची वाढ प्रामुख्याने शहरी भागात झाली. आता पुन्हा त्याची पुनरावृत्ती झाली असून बडगुजर हे सिडको भागातील आहेत. नाशिकच्या ग्रामीण भागात त्यांचा संपर्क व संघटना बांधणी कशी होते व त्याला ते कितपत न्याय देतात, याची चर्चा ग्रामीण भागातील कार्यकर्त्यांमध्ये आहे.

शिवसेनेच्या स्थापनेपासून (कै.) काकासाहेब सोलापूरकर हे पहिले जिल्हा अध्यक्ष होते. (कै.) केशवराव थोरात तसेच माजी नगरसेवक राजेंद्र बागुल यांनी शिवसेनेची धुरा वाहिली. शिवसेनेच्या विस्तारात खऱ्या अर्थाने 1990 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत चालना मिळाली. तेव्हा देवळाली मतदार संघातून बबनराव घोलप हे आमदार म्हणून निवडून आले होते. (कै.) राजाभाऊ गोडसे यांच्या कार्यकाळात सबंध जिल्ह्यात शिवसेनेचा विस्तार होण्यास मदत झाली. या पार्श्वभूमीवर आगामी लोकसभा निवडणुकीचा विचार करता नव्या नियुक्त्या कितपत उपयुक्त ठरतात, या चर्चेला शिवसेनेच्या ग्रामीण भागातील पदाधिकाऱ्यांमध्ये कारण मिळाले आहे.

Sudhakar Badgujar
Raver Lok Sabha constituency 2024: एकनाथ खडसे यांच्या डावपेचांमुळे भाजपचे इच्छुक 'गॅसवर'

सध्या शिवसेनेच्या संघटनात्मक विस्तारासाठी विविध प्रयोग करण्यात आलेले आहेत. पक्षाची सबंध जिल्ह्यात ताकद वाढलेली आहे. त्यादृष्टीने नाशिक शहरासाठी शिवसेना नेते खासदार संजय राऊत तर ग्रामीण भागासाठी जयंत दिंडे हे संपर्कप्रमुख आहेत. याशिवाय सुधाकर बडगुजर, नितीन आहेर, गणेश धात्रक आणि कुणाल खराडे असे चार जिल्हाप्रमुख आहेत. लोकसभा आणि विधानसभा मतदार संघाच्या दृष्टीने या पदांच्या नियुक्त्या करण्यात आलेल्या आहेत.

Sudhakar Badgujar
Loksabha Election 2024 : लाल वादळाची लोकसभेत दिशा कोणती? 'माकप' पुन्हा नव्या जोमाने मैदानात...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com