Lok Sabha Election 2024 : विखेंविरोधातील पहिल्या गौप्यस्फाटानंतर शरद पवारांची नगरमध्ये उद्या दुसरी सभा...

Sharad Pawar News : मंत्री विखे यांनी थेट शरद पवार यांच्यावर हल्ले सुरू केल्याने नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत रंग भरणार असे दिसू लागले.
Lok Sabha Election 2024
Lok Sabha Election 2024Sarkarnama

Ahmednagr News : नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातील निवडणूक पवार विरुद्ध विखे, अशी रंगू लागली आहे. शरद पवार यांची नगरमध्ये दुसरी सभा उद्या गुरूवारी सकाळी राहुरीत होत आहे. या सभेत शरद पवार काय गौप्यस्फोट करतात, याकडे आता लक्ष लागले आहे. पहिल्या सभेत शरद पवार यांनी केलेल्या गौप्यस्फोटावर भाजप नेते पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांनी "हास्यास्पद", एवढी प्रतिक्रिया देऊ शकले. मात्र शरद पवार यांच्या या गौप्यस्फोटामुळे महायुती भाजपच्या गोटात खळबळ उडाली आहे. त्यामुळे राहुरीत उद्या गुरूवारी शरद पवार यांच्या सभेकडे पुन्हा लक्ष लागले आहे. (Latest Marathi News)

नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार खासदार सुजय विखे आणि महाविकास आघाडीचे उमेदवार माजी आमदार नीलेश लंके यांच्यात लढत होताना दिसत आहे. ही लढत प्रत्यक्षात पवार विरुद्ध विखे, अशी पारंपारिक नेत्यांमध्ये होत असल्याचे सध्याचे चित्र आहे. तशा या लढाईला सुरूवात पालकमंत्री राधाकृष्ण विखेंकडून सुरूवात झाली. मंत्री विखे यांनी राजकीय स्वार्थ साधण्यासाठी नगर जिल्ह्यातील राजकीय नेत्यांमध्ये शरद पवार यांनी भांडणे लावली. नगर जिल्ह्याचे राजकीय वाटोळे केले, असा आरोप केला. दिवंगत लोकनेते बाळासाहेब विखेंना सतत विरोध करत राहिले, असा दावा देखील मंत्री विखे यांनी केला. मंत्री विखे यांनी थेट शरद पवार यांच्यावर हल्ले सुरू केल्याने नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत रंग भरणार असे दिसू लागले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

शरद पवार यांनी नीलेश लंके यांना उमेदवारी दिल्यानंतर ते नगरमध्ये आलेच नव्हते. मात्र नीलेश लंके यांनी नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात काढलेल्या स्वाभिमान जनसंवाद यात्रेच्या समारोपाला शरद पवार आले. त्यांच्याबरोबर काँग्रेसचे नेते तथा माजी मंत्री आमदार बाळासाहेब थोरात देखील आले. शरद पवार यांची नगर दक्षिणेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने नीलेश लंकेंसाठी पहिलीच सभा होती. ही सभा नगर शहरातील परिवर्तनाची नांदी ठरणाऱ्या गांधी मैदानात झाली. या सभेत शरद पवार यांनी मंत्री राधाकृष्ण विखे यांनी एका उद्योजकाकडून पाठवलेल्या निरोपावर भाष्य केले. नीलेश लंके यांना उमेदवारी देऊ नका, असा हा निरोप होता, असा गौप्यस्फोट शरद पवार यांनी या सभेत केला.

Lok Sabha Election 2024
Lok Sabha Election 2024 : तब्येतीमुळे 'रामलल्ला प्राणप्रतिष्ठेला' न येणारे शरद पवार प्रचारासाठी गावोगावी कसे फिरत आहेत? शाहांचा सवाल!

शरद पवार या गौप्यस्फोटावर थांबले नाहीत. बाळासाहेब विखे यांना पहिल्यांदा खासदार व्हायचे होते. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आमदार बाळासाहेब थोरात यांचे वडील भाऊसाहेब थोरात यांना घाबरून बाळासाहेब विखे आपल्याकडे आले होते. यानंतर आपणच त्यांना थोरातांकडे घेऊन गेलो. थोरातांनी मनाचा मोठेपणा दाखवत विखेंना माफ केले आणि विखे यांच्या संसदेतील मार्ग मोकळा केला. मात्र या सहकाऱ्याची जाणीव विखेंना राहिली नाही, असा देखील दावा शरद पवार यांनी केला.

गांधी मैदानातील ही सभा शरद पवार यांनी मंत्री विखेंविरोधात केलेल्यांना दाव्यांनी गाजवली. यावर मंत्री विखेंनी "हास्यास्पद" दावे आहेत, एवढीच प्रतिक्रिया दिली आहे. मंत्री विखे यांनी एवढूशीच प्रतिक्रिया नोंदवली, असली तरी आगामी मोठ्या राजकीय वादळाची चिन्हं असल्याचे सांगितले जात आहे. पवार आणि विखे यांच्यातील पारंपारिक लढाईची नगर दक्षिण लोकसभेच्या निवडणुकीच्या पुन्हा एकदा सुरूवात झाल्याचे दिसते. मंत्री विखे यांनी नगर दक्षिण मतदारसंघात गाठीभेटींचा झपाटा लावला आहे. जुन्या कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांची भेट घेऊन विजयाची बांधणी करत आहेत. ही बांधणी मजबूत होत का, याची मंत्री विखे त्यांच्या यंत्रणाकडून वारंवार खात्री आणि चाचपणी करून घेत आहेत.

Lok Sabha Election 2024
Prajakt Tanpure News : विखे पिता-पुत्राला सल्ला देताना तनपुरेंनी जगताप, कर्डिलेंना डिवचले

यातच शरद पवार यांची दुसरी सभा उद्या गुरूवारी राहुरी मध्ये होत आहे. पहिल्या सभेतील गौप्यस्फोटानंतर शरद पवारांची राहुरीत होत असलेल्या सभेची तयारी माजी मंत्री आमदार प्राजक्त तनपुरे करत आहेत. या सभेत शरद पवार काय बोलतात याकडे लक्ष लागले आहे. या सभेला काॅंग्रेसचे ज्येष्ठ नेते आमदार बाळासाहेब थोरात उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे ही सभा देखील गाजणार असल्याचे दिसते. या सभेनंतर मंत्री विखे (Sujay Vikhe) काय राजकीय भूमिका घेतात, याकडे लक्ष लागले आहे.

Lok Sabha Election 2024
NCP Manifesto : अजित पवारांनी जाहीरनाम्यातून सांगितली राष्ट्रवादी काँग्रेसची 'पंचसूत्री'!

पवार आणि विखेंसाठी प्रतिष्ठेची लढाई -

शरद पवार (Sharad Pawar) यांनी वर्षभरापूर्वीच नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात लोकसभा निवडणुकीची तयारी नीलेश लंके यांच्या रूपाने सुरू केली होती. राष्ट्रवादी फुटीनंतर नीलेश लंके अजितदादा गटाकडे गेले. नगर दक्षिणमध्ये राष्ट्रवादी काॅंग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचा उमेदवार कोण, अशी चर्चा असताना शरद पवार शांत होते. यातच नाट्यमय घडामोडी घडत नीलेश लंकेंनी शरद पवार यांची भेट घेतली. नीलेश लंकेंची अजितदादांची साथ सोडत शरद पवारांबरोबर आले आणि लोकसभेसाठी शड्डू ठोकला. पवारविरुद्ध विखे यांच्या राजकीय संघर्षाची लढाई 1991 मधील विखे-गडाख निवडणूक खटल्यापासून सुरू आहे. आता नीलेश लंके यांच्या रूपाने शरद पवार यांनी विखेविरोधात नगर दक्षिणेसाठी ही लढाई प्रतिष्ठेची केल्याचे दिसते.

(Edited By - Chetan Zadpe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com