Lok Sabha Election 2024 : तब्येतीमुळे 'रामलल्ला प्राणप्रतिष्ठेला' न येणारे शरद पवार प्रचारासाठी गावोगावी कसे फिरत आहेत? शाहांचा सवाल!

Amit Shah On Sharad Pawar : उद्धव ठाकरेंना राम मंदिर प्राणप्रतिष्ठापनाचं निमंत्रण दिलं, पण सोनिया गांधी यांच्या भीतीने उद्धव ठाकरे गेले नाहीत.
Amit Shah On Sharad Pawar
Amit Shah On Sharad PawarSarkarnama
Published on
Updated on

Amaravati News : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचा आज महाराष्ट्र दौरा होता. अमरावती लोकसभेच्या भाजप उमेदवार नवनीत राणा यांच्या प्रचारासाठी शाह आज अमरावतीत दाखल झाले होते. या वेळी त्यांनी काँग्रेसवर सडकून टीका केली. तसेच ठाकरे गट प्रमुख उद्धव ठाकरे आणि ज्येष्ठ नेते शरद पवार यांना राम मंदिराच्या मुद्द्यावरून पुन्हा एकदा शाह यांनी घेरले आहे. राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठापनेला न येणारे पवार आज निवडणूक सभा घेत फिरत आहेत, असे शाह म्हणाले. (Latest Marathi News)

Amit Shah On Sharad Pawar
Sharad Pawar News : लेकीसाठी 8 धैर्यशील 6 अन् लाडक्या शशिकांतभाऊंसाठी 5 सभा, पवारांचा झंझावात!

अमित शाह (Amit Shah) म्हणाले, "स्वत:ला शिवसेनेचा अध्यक्ष मानणाऱ्या उद्धव ठाकरेंना राम मंदिर प्राणप्रतिष्ठापनाचं निमंत्रण दिलं, पण सोनिया गांधी यांच्या भीतीने उद्धव ठाकरे गेले नाहीत. शरद पवार यांनाही निमंत्रण दिलं, पण ते म्हणाले माझी तब्येत खराब आहे. मी येऊ शकणार नाही. पण आता निवडणुकांमध्ये शरद पवार सभा घेत कसे फिरत आहेत. राहुल गांधींनाही निमंत्रण दिल. पण ते आले नाहीत. राहुल गांधी यांनी पहिल्यांदा अयोध्येमध्ये दर्शनासाठी या, असे अमित शाह म्हणाले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Amit Shah On Sharad Pawar
NCP Sharadchandra Pawar News : शरद पवारांचा मराठवाड्यात झंझावात; बीडमध्ये तीन तर संभाजीनगरात एक सभा घेणार..

इंडिया आघाडीवर निशाणा -

नवनीत राणा यांना दिलेलं एक एक मत नरेंद्र मोदींना (Narendra Modi) मजबूत करणार आहे. देशाला दहशतवाद आणि नक्षलवादापासून मुक्तीकडे नेणारं हे मत असणार आहे. 400 जागा मिळवत भाजपला संविधानच बदलायचं आहे, असा अपप्रचार काँग्रेसकडून केला जात आहे. आम्हाला 2014 पासून मोठं बहुमत देशातल्या लोकांनी दिलं. मात्र या बहुमताचा उपयोग आम्ही 370 हटवणं, ट्रिपल तलाकला बंदी असे निर्णय घेण्यासाठी केला, असंही शाह म्हणाले.

R

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com