Lok Sabha Election 2024 : शिवसेना-राष्ट्रवादीचा दावा असतानाच भाजपचाही डोळा; महायुतीत नाशिक कुणाला मिळणार?

Nashik Lok Sabha Election 2024 : "याबाबत आम्ही पक्षाकडे नाशिकसाठी जोरदार किल्ला लढवलेला आहे."
Lok Sabha Election 2024
Lok Sabha Election 2024Sarkarnama

Nashik News : भाजप-शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या महायुतीच्या जागावाटपात नाशिकचा सुरू असलेला गोंधळ अद्याप संपलेला नाही. भारतीय जनता पक्षाला अद्यापही हा मतदारसंघ आपल्यालाच सुटेल, असा विश्वास वाटतो. मात्र, महायुतीतील तीनही पक्षांनी नाशिकवर जोरदार दावा केला आहे. काही झाले तरी ही जागा सोडायची नाही, असा आक्रमक पवित्रा त्यांनी घेतला आहे, तर राष्ट्रवादीनेही ही जागा आम्हालाच हवे आहे, असे म्हणत शिवसेनेला जोरदार ठणकावले आहे. (Latest Marathi News)

Lok Sabha Election 2024
NCP Baba Jafri News : धाराशिवच्या उमेदवारीबाबत राष्ट्रवादी काँग्रेसच्या निर्णयामुळे बाबा जाफरींचा तालुकाध्यक्ष पदाचा राजीनामा!

या संदर्भात भाजपचे प्रदेश सरचिटणीस लक्ष्मण सावजी यांनी हा मतदारसंघ पक्षाला मिळावा, अशी सर्व इच्छुक आणि पदाधिकाऱ्यांची इच्छा आहे. याबाबत आम्ही पक्षाच्या व्यासपीठावर जोरदार किल्ला लढवलेला आहे. वरिष्ठ नेत्यांची चर्चा केली आहे. त्यांनादेखील आम्ही मांडलेली भूमिका मनोमन पटलेली आहे. मात्र, महायुती म्हणून सहकारी पक्षांच्या अपेक्षांचादेखील विचार करावा लागतो, त्यादृष्टीने पक्ष योग्य तो निर्णय घेईल.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

भारतीय जनता पक्षाने नाशिक मतदारसंघात लोकसभा निवडणुकीची तयारी गेले वर्षभर केलेली आहे. बूथप्रमुखांपासून तर शक्ती केंद्रांपर्यंत आमची यंत्रणा तयार आहे. अगदी दोन दिवसांपूर्वीसुद्धा आम्ही त्याचा आढावा घेतलेला आहे. निवडणुका जाहीर झालेल्या असल्याने आम्ही सर्व महायुतीचे उमेदवार म्हणून प्रचार करणार आहोत. त्यामुळे कोणत्या पक्षाला जागा सुटते उमेदवार कोण असेल? हा आमच्या दृष्टीने महत्त्वाचा प्रश्न आहे. त्याच वेळी आम्ही त्याला गौणदेखील मानतो. जो कोणी उमेदवार असेल त्याच्या प्रचारासाठी आणि त्याला विजयी करण्यासाठी आमचे प्रयत्न असतील. नाशिकचा खासदार हा पंतप्रधान मोदी यांना मतदान करणारा असेल, असा दावा त्यांनी केला.

Lok Sabha Election 2024
Lok Sabha Election 2024 : शरद पवारांचे शिलेदार बाळ्यामामांच्या गोदामावरील कारवाईनंतर आव्हाड म्हणतात, "आम्ही घाबरणारे नाही...

नाशिक मतदारसंघाची निवडणूक शेवटच्या टप्प्यात आहे. येथून महाविकास आघाडीतर्फे माजी आमदार राजाभाऊ वाजे यांना शिवसेना उद्धव ठाकरे गटाने उमेदवारी जाहीर केली आहे. वाजे यांनी प्रचारदेखील सुरू केलेला आहे. या जागेवर शिवसेना एकनाथ शिंदे गटाचा दावा आहे. विद्यमान खासदार म्हणून हेमंत गोडसे यांना येथून उमेदवारीची अपेक्षा आहे. त्यासाठी गोडसे यांनीदेखील तीन वेळा शक्तिप्रदर्शन केलेले आहे. पक्षाचे खासदार व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र श्रीकांत शिंदे यांनी नाशिकच्या मेळाव्यात खासदार गोडसे यांची उमेदवारी जाहीरदेखील केली होती. मात्र, त्यानंतर भाजपच्या दबावातून सर्व समीकरणे बिघडली. त्यामुळे गोडसे यांची उमेदवारी सध्या तरी अधांतरीच आहे. या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीच्या (Mahavikas Aghadi) उमेदवार कधी जाहीर होणार? याची उत्सुकता आहे.

नाशिक येथून राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार गटाचे (Ajit Pawar) नेते आणि राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्या उमेदवाराची चर्चा आहे. भुजबळ यांची उमेदवारी निश्चित मानली जाते. मात्र, त्याच्या घोषणेत सातत्याने विलंब होत आहे. त्यामुळे महायुतीतील पक्षांमध्ये आणि कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता आहे. त्यावर सावजी यांनी केलेल्या सूचक विधानाने मतदारसंघ नेमका कोणाला मिळणार? यावरून गोंधळ वाढण्याची शक्यता आहे.

R

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com