Lok Sabha Election 2024 : शरद पवारांचे शिलेदार बाळ्यामामांच्या गोदामावरील कारवाईनंतर आव्हाड म्हणतात, "आम्ही घाबरणारे नाही...

Suresh Balyamama Mhatre News : "तुम्ही फक्त घाबरून, दम देऊन निवडणुका लढवू शकता, हे आता स्पष्ट झाले आहे. आता तुम्हाला पराभव दिसत असल्यानेच अशी कृत्ये केली जात आहेत."
Suresh Balyamama Mhatre News
Suresh Balyamama Mhatre NewsSarkarnama

Bhivandi News : भिवंडीतून सुरेश म्हात्रे ऊर्फ बाळ्यामामा यांना उमेदवारी जाहीर झाल्यावर त्यांच्या गोदामांवर झालेली कारवाई दुर्दैवी आहे. लोकशाहीत निवडणुका जाहीर झाल्यानंतर आपण निवडणुकींच्या कामाला लागतो. शासकीय यंत्रणांचा या काळात वापर कमी केला जातो. अशाप्रकारे एमएमआरडीएने राजकीय हस्तक्षेप करणे चुकीचे आहे, अशा पद्धतीने जर घाबरविण्याचा प्रयत्न केला जात असेल, तर आम्ही घाबरणारे मुळीच नाही, असे मत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी व्यक्त केला. (Lok Sabha Election 2024)

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Suresh Balyamama Mhatre News
Loksabha Election 2024 : शरद पवार गटाने लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात आतापर्यंत उतरवलेले 'शिलेदार'

ठाण्यात शुक्रवारी घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. म्हात्रे यांची उमेदवारी झाल्यानंतर अवघ्या दोन तासांत एमएमआरडीए कामाला लागते, ही आर्श्चयाची बाब असल्याचेही ते म्हणाले. वास्तविक पाहता एमएमआरडीएलादेखील माहिती आहे, या गोदामांच्या बाबतीत म्हात्रे यांच्याकडे उच्च न्यायालयाची 'स्टे ऑर्डर' आहे. परंतु तरीदेखील अशा पद्धतीने घाबरविण्याचा प्रयत्न केला जात असून, आम्ही घाबरणारे नसून आम्ही लढणारे आहोत, असेही आव्हाडांनी या वेळी सांगितले.

तसेच स्वातंत्र्यकाळातील जमिनींचे फेरफार कुणी कसे बदलले, हे संपूर्ण भिवंडीकरांना माहिती आहे, असे म्हणत अप्रत्यक्षपणे त्यांनी भाजपचे उमेदवार कपिल पाटील यांच्यावर टीका केली. तुम्ही फक्त घाबरून, दम देऊन निवडणुका लढवू शकता, हे आता स्पष्ट झाले आहे. आता तुम्हाला पराभव दिसत असल्यानेच अशी कृत्ये केली जात आहेत. त्यामुळे अशी माणसे लोकसभेत निवडून जाणार असतील तर हे देशाचे दुर्देव असल्याचेही आव्हाड (Jitendra Ahwad) म्हणाले.

Suresh Balyamama Mhatre News
BJP V/s Congress : निरुपम यांची भाजपची वाट खडतर? मोहित कंबोज म्हणाले, 'काँग्रेसचा कचरा...'

वाद पेटवणारेच नाशिकचे उमेदवार - आव्हाडांची टीका

सहा महिने मराठा विरुद्ध ओबीसी असा वाद पेटवणारे आता नाशिकचे उमेदवार आहेत, अशी टीका आव्हाड यांनी छगन भुजबळ यांच्यावर केली. तसेच हा वाद म्हणजे राजकीय डाव असून, त्याचे प्रमुख भुजबळच होते, असेही आव्हाड म्हणाले. तसेच मुद्दाम घाबरून ठेवून तो वाद वेगळ्या दिशेने नेला आणि उमेदवारी मिळवून घेतली, अशी टीका यावेळी त्यांनी केली. तसेच छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांच्यासह निवडणूक रिंगणात उतरलेल्या 48 उमेदवारांना आपल्या शुभेच्छा असल्याचेही आव्हाड या वेळी म्हणाले.

R

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com