Hemant Godse Nashik News : नाशिकविषयी रोज नव्या बातम्या; तरीही हेमंत गोडसे उमेदवारीबाबत कॉन्फिडंट कसे?

Hemant Godse Politics : आगामी लोकसभा निवडणुकीत नाशिक मतदारसंघातून कोणाला उमेदवारी मिळणार हे निश्चित नसताही हेमंत गोडसे लोकसभेच्या प्रचाराला लागले आहेत.
Hemant Godse
Hemant GodseSarkarnama
Published on
Updated on

Shivsena Nashik Politics : लोकसभा जागावाटपाचा तिढा सुटत नाही. त्यामुळे इच्छुक उमेदवार आणि कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता वाढत आहे. महायुतीच्या जागावाटपाबाबत रोज नव्या अफवा आणि चर्चांना तोंड फुटते. त्यामुळे नाशिकचा मतदारसंघ कोणाचा याबाबत उत्सुकता वाढत आहे.Hemant Godse Nashik News

शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे खासदार हेमंत गोडसे यांनी काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आपल्या कार्य अहवालाचे प्रकाशन केले. ठाणे येथे झालेल्या या कार्यक्रमात पदाधिकारी आणि कार्यकर्ते नाशिकच्या जागेबाबत ठोस माहितीची अपेक्षा घेऊन गेले होते. मात्र, मुख्यमंत्री शिंदे यांनी जागावाटप आणि लोकसभा निवडणुकीसंदर्भात कोणतेही विधान केले नाही. त्यामुळे कार्यकर्त्यांची निराशा झाली.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

हेमंत गोडसे Hemant Godse मात्र आपल्या उमेदवारीविषयी कॉन्फिडंट आहेत. ठाणे येथून आल्यानंतर त्यांनी लगेच दुसऱ्या टप्प्यातील आपल्या मतदारसंघाचा दौरा सुरू केला आहे. गोडसे सध्या उमेदवारी मिळाली अशा अविर्भावातच प्रचाराला लागले आहेत. त्यामुळे एकीकडे जागावाटपाबाबतची अनिश्चितता आणि दुसरीकडे खासदार गोडसे यांचा प्रचार अशी स्थिती आहे. यामुळे शिंदे गटाचे पदाधिकारी अप्रत्यक्षरीत्या महायुतीमध्ये नाशिकची जागा शिंदे गटालाच राहील असा संदेश देत आहेत. MP Hemant Godse believes that he will get candidature from Nashik

Hemant Godse
Loksabha Election 2024 : लोकसभेच्या मैदानात मनसे? नाशिकमध्ये चाचपणी; वर्धापनदिनी राज ठाकरे भूमिका जाहीर करणार?

दरम्यान, याबाबत एकनाथ शिंदे Eknath Shinde गटाच्या वरिष्ठ नेत्याशी संपर्क साधला असता सध्याच्या स्थितीत भारतीय जनता पक्षाचा सर्वात जवळचा सहकारी शिवसेनेचा एकनाथ शिंदे गट आहे. त्यामुळे येत्या लोकसभा निवडणुकीत भाजप आपल्या सहकाऱ्यांची जागावाटपाचे सूत्र ठरवत आहे. शिंदे गटाच्या तेरा खासदारांनी भाजपला पाठिंबा दिला आहे. त्यामुळे महायुतीकडे Mahayuti शिंदे गटाने 22 जागा मागितल्या आहेत. असे असले तरी पक्षाचे नेते विद्यमान खासदारांच्या जागांबाबत ठाम आहेत. त्यामुळे सर्व विद्यमान खासदारांना निवडणुकीची तयारी करण्याच्या सूचना यापूर्वीच देण्यात आल्याचे सांगण्यात आले असल्याचे ते म्हणाले.

महायुतीच्या जाग वाटपाच्या सध्याच्या सूत्रानुसार भाजप केंद्रीय नेत्यांच्या सल्ल्याने निर्णय घेणार आहे. उत्तर महाराष्ट्रात नाशिक Nashik आणि शिर्डी Shirdi हे दोन लोकसभा मतदारसंघ शिंदे गटाकडे आहेत. या दोन्ही ठिकाणी उमेदवार देण्याची तयारी शिंदे गटाने केली आहे. त्यासाठी भारतीय जनता पक्षाशी संबंध करण्याचे काम दोन महिन्यांपासून केले जात आहेत. त्यामुळे खासदार गोडसे हेदेखील उमेदवारीबाबत कॉन्फिडंट असल्याचे चित्र आहे.

Edited By : Rashmi Mane

R

Hemant Godse
Rahul Gandhi News : राहुल गांधींची भारत जोडो यात्रा महाराष्ट्रात होणार 'सुपरफास्ट'

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com