NCP Sharad Pawar : लोकसभेच्या निकालाने अनिल कदम जोमात, दिलीप बनकरांचे टेन्शन वाढलं!

Loksabha Election Result Anil Kadam Diliprao Bankar Maharashtra Nashik Politics : निफाड मध्ये लोकसभेच्या निवडणुकीकडे विधानसभेची रंगीत तालीम म्हणूनच पाहिले गेले. निफाड मतदारसंघात भगरे यांना 18 हजार मतांची आघाडी आहे.
Anil Kadam Diliprao Bankar
Anil Kadam Diliprao Bankar sarkarnama

Anil kadam News : लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे भास्कर भगरे विजयी झाले. त्यांनी भाजपच्या केंद्रीय राज्यमंत्री भारती पवार यांचा पराभव केला. यामध्ये निफाड मतदारसंघात भगरे यांना 18 हजार मतांची आघाडी आहे.

निवडणूक लोकसभेची होती. मात्र निफाड विधानसभा मतदारसंघात परीक्षा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आमदार दिलीप बनकर आणि शिवसेना ठाकरे गटाचे माजी आमदार अनिल कदम यांची होती. या निकालाने अनिल कदम यांना दिलासा मिळाला आहे.तर, बनकर यांचे टेन्शन वाढले आहे.

निफाड मध्ये लोकसभेच्या निवडणुकीकडे Loksabha Election विधानसभेची रंगीत तालीम म्हणूनच पाहिले गेले. या मतदारसंघात कांदा निर्यात बंदी शेतकऱ्यांचे प्रश्न आणि मराठा आरक्षणाचा इफेक्ट प्रचारात स्पष्टपणे जाणवला. मतपेटीतही तो दिसून आला. त्यामुळे विधानसभेतही हा कल कायम राहील अशी चिन्हे आहेत.

Anil Kadam Diliprao Bankar
Nashik Politics: देवळालीत 'गद्दांराना' फटका; विधानसभेसाठी अहिरेंसमोर 'एक अनार तीन बिमार'चे आव्हान

ज्येष्ठ नेते शरद पवार Sharad Pawar यांचा निफाड तालुक्याच्या राजकारणावर विशेष प्रभाव राहिला आहे. कांदा द्राक्ष आणि टोमॅटोची बाजारपेठ अशी येथील ओळख आहे. दुसरीकडे हा मतदारसंघ प्रदीर्घकाळ शिवसेना बाळासाहेब ठाकरे गटाचा आमदार निवडून देणारा देखील आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडल्यावर आमदार बनकर अजित पवार गटात सामील झाले.गेल्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार यांना 96 हजार 354 तर शिवसेनेचे अनिल कदम यांना 78 हजार 686 मते होती. कदम यांचा सतरा हजार मतांनी पराभव झाला. मात्र तिसरे उमेदवार यतीन कदम यांना वीस हजार मते मिळाली होती. कुटुंबातील भाऊबंदकीचा लाभ आमदार बनकर यांना झाला. यंदा त्याची पुनरावृत्ती होईल का? यावर पुढचे गणित ठरेल.

आमदार बनकर ज्येष्ठ नेते शरद पवार यांचे विश्वासू होते. सध्या मात्र माजी आमदार कदम हे शरद पवार यांच्या जवळ गेले आहेत. शरद पवार यांची निकटता आणि ठाकरे यांच्याशी निष्ठा हे त्यांचे राजकीय बलस्थान झाले आहे

आमदार बनकर मात्र सध्या गोंधळलेले दिसतात. अजित पवार गटात गेले मात्र लोकसभेच्या निकालाने त्यांना परतीचे वेध लागले असल्याचे बोलले जाते. विधानसभा निवडणुकीत निफाडचे चित्र काय असेल, हे स्पष्ट झाले आहे. बनकर विरुद्ध कदम या लढाईत तिसरा कोण येतो आणि त्याचा फायदा कोणाला होतो, याचीच सध्या चर्चा आहे.

Anil Kadam Diliprao Bankar
Manoj Jarange Patil : 'सरकारशी चर्चेला तयार पण दार बंद केलं तर...'; मनोज जरांगेंचा इशारा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com