Loksabha Election 2024 : '23' आकडा ठरवणार बबनराव घोलप यांचं राजकीय भवितव्य? घोटाळा प्रकरणात कोर्टात उद्या सुनावणी

Shirdi Loksabha Constituency : समाजकल्याण मंत्री असताना यंत्रमाग खरेदीत 15 कोटींच्या घोटाळ्याचं प्रकरण
Uddhav Thackeray, Babanrao Gholap, Eknath Shinde
Uddhav Thackeray, Babanrao Gholap, Eknath ShindeSarkarnama
Published on
Updated on

Shirdi Political News :

माजी मंत्री बबनराव घोलप यांनी शिवसेनेच्या ठाकरे गटाला 'जय महाराष्ट्र' केला खरा, पण त्यांचं राजकीय भवितव्य काय हे अद्याप निश्चित नाही. त्यामुळे घोलप खरोखर शिर्डी मतदारसंघातून निवडणूक लढणार काय? या प्रश्नाला अजून उत्तर मिळत नाही.

शिवसेना-भाजप युतीच्या सरकारमध्ये बबनराव घोलप (Babanrao Gholap) समाजकल्याण मंत्री होते. या कालावधीत त्यांनी भिवंडीतील एका संस्थेकडून यंत्रमाग खरेदी केले होते. महिला कल्याण योजनेतून ही खरेदी करून त्याचे वितरण होणार होते, पण त्यात मोठा घोटाळा झाल्याचा आरोप झाला. पुढे कोर्टाने त्यांना दोषी ठरवलं. हा घोटाळा सुमारे 15 कोटींचा होता.

Uddhav Thackeray, Babanrao Gholap, Eknath Shinde
Loksabha Election 2024 : नाशिक लोकसभेसाठी आता केदा आहेरांची एन्ट्री

विशेष म्हणजे बबनराव घोलप घोटाळा प्रकरणात चक्क ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे (Anna Hajare) यांना शिक्षा झाली होती. घोलपांवरील आरोप सिद्ध न करता आल्यामुळे अण्णांना शिक्षा भोगावी लागली होती. त्यानंतर अण्णा हजारेंनी घोलपांचा नाद सोडला. मात्र, सामाजिक कार्यकर्ते मिलिंद यावतकर यांनी घोलप यांचा पिच्छा सोडला. 24 वर्षे यावतकर कोर्टात घोलपांविरोधात लढा देत आहेत.

या घटल्यात कोर्टानेदेखील मोठा कालावधी घेतला आहे. आतापर्यंत सात न्यायाधीश बदलले आहेत. हा खटला निर्णयाप्रत पोहोचलेला नाही. त्याची सुनावणी उद्या म्हणजे 23 फेब्रुवारीला होत आहे. त्यामुळे 24 वर्षे चाललेला हा लढा आणि त्याची सुनावणी उद्या होणार आहे. त्यात घोलप निवडणूक लढवू शकतील की नाही, याचा निर्णय होऊ शकतो.

हा निर्णय न झाल्यास घोलप लोकसभा निवडणुकीसाठी (Loksabha Election) अपात्र ठरण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे 23 हा आकडा घोलप यांचे राजकीय भवितव्य ठरवणार आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

कोर्टाच्या अगोदरच्या निकालानुसार घोलप कोणतीही निवडणूक लढवण्यास पात्र नाहीत. तरीही शिर्डी लोकसभेच्या उमेदवारीसाठी त्यांच्याच नावाची चर्चा होत असते. घोलप यांनी शिर्डी मतदारसंघातील पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या आणि राजकारण यावरून शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाचा राजीनामा दिला आहे. ते लवकरच एकनाथ शिंदेंच्या (Eknath Shinde) शिवसेनेत प्रवेश करण्याची दाट शक्यता आहे.

शिवसेनेकडून शिर्डी लोकसभा मतदारसंघात (Shirdi Loksabha Constituency) घोलप यांची उमेदवारी जवळपास निश्चित मानली जाते. ही सगळी अनुकूलता असताना घोलप यांचे राजकीय भवितव्य पूर्णतः उद्याच्या कोर्टाच्या सुनावणीवर अवलंबून आहे. त्यामुळे 23 हा आकडा घोलप यांना हिरवा झेंडा दाखवेल ती राजकीय मार्गात रेड सिग्नल देईल, हे उद्या स्पष्ट होईल.

(Edited by Avinash Chandane)

R

Uddhav Thackeray, Babanrao Gholap, Eknath Shinde
Shivsena Vs Bjp : नाशिक पाहिजे तर जळगाव द्या, शिंदे गटाचा भाजपला प्रस्ताव !

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com