Ahmednagar Politics : 'मढी देवस्थान'चे अध्यक्ष मरकड आक्रमक; आमदार राजळेंची तक्रार फडणवीसांकडे करणार

Ahmednagar Madhi Devasthan Sanjay Markad vs Monika Rajale : मढी देवस्थानचा वाद आता देवेंद्र फडणवीस यांच्या दरबारी...
Ahmednagar
AhmednagarSarkarnama
Published on
Updated on

Ahmednagar Latest News : पाथर्डीतील श्री क्षेत्र मढी येथील कानिफनाथ देवस्थानच्या विश्वस्तांमधील हाणामारीचा वाद लवकरच भाजप नेते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दरबारात पोहोचणार आहे. देवस्थानचे अध्यक्ष संजय मरकड यांनी पत्रकार परिषद घेत पुन्हा एकदा भाजप आमदार मोनिका राजळे यांच्या दिशेने आरोप केले.

आमदार राजळे यांच्या सांगण्यावरून मला मढी देवस्थानच्या अध्यक्षपदावरून यापूर्वी काढण्यात आले होते. मी या विरोधात न्यायालयात गेलो अन् मला न्याय मिळाला. पुन्हा अध्यक्ष झालो. आता देखील अध्यक्षपदावरून हटवण्यासाठी आमदार राजळे यांच्या निवासस्थानी विश्वस्तांची बैठकीत घेत कट केला. मी देखील भाजपचा पदाधिकारी असून मला मुद्दाम त्रास दिला जात आहे. या संदर्भात शिष्टमंडळासह भाजप नेते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन आमदाराविषयी तक्रार करणार आहे. मला जीवे मारून टाकण्याचा कट होता, असे हाणामारी विषयी आमदार मोनिका राजळे यांचा नामोल्लेख टाळत संजय मरकड म्हणाले.

संजय मरकड यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेवेळी भाजप ओबीसी सेल आघाडीचे जिल्हाध्यक्ष गोकुळ दौंड, अंबादास आरोळे, देविदास मरकड, सदाशिव मरकड, अक्षय कुटे, प्रतीक काळदाते, गेणू पगारे, नितीन शेळके, फिरोज शेख आदी उपस्थित होते.

संजय मरकड म्हणाले, "मी मढी गावचा सरपंच असून मढी देवस्थानचा अध्यक्ष आहे. प्रतिस्पर्धी होतो की काय? या भीतीने माझ्यावर जीवघेणा हल्ला करून मला संपवण्याचा प्रयत्न होता. आमदारांच्या निवासस्थानी यासाठी 10 डिसेंबरला बैठक झाली. आमदारांच्या घराचे सीसीटीव्ही फुटेज जनतेसमोर आणा म्हणजे कळेल की, त्यादिवशी मढी देवस्थानचे सगळे विश्वस्त काय करत होते? आमदाराचा मढी देवस्थानमध्ये खूप हस्तक्षेप वाढला आहे. त्यामुळे आमदाराच्या निवासस्थानामधूनच माझ्या हत्येचा कट रचला गेला". देवस्थानमधील दानपेटीमधील पैशांची या विश्वस्त मंडळांनी अफरातफर केली आहे. पोलिसांनी दबावाखाली माझा जबाब घेऊन 307 सारखा गुन्हा दाखल होणे अपेक्षित होते. मात्र ते झाले नाही. 307 चा गुन्हा दाखल करून मला पोलीस बंदोबस्त मिळावा, अशी मागणी पोलीस अधीक्षकांकडे केली आहे. तसेच या घटनेबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना माहिती देण्यासाठी लवकरच एक शिष्टमंडळ घेऊन भेटणार असल्याचे संजय मरकड म्हणाले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

यावेळी भाजप ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष गोकुळ दौंड यांनी देखील भाजपच्या निष्ठावान अनेक कार्यकर्त्यांवर असे प्रकार होत आहे. ज्यांनी भाजपसाठी वीस वर्ष घातले, अशा लोकांवर अन्याय आमदारांकडून होत आहेत. नेमके लोकप्रतिनिधीना यातून काय करायचे ते काय कळत नाही. एखाद्या गोष्टीवर किंवा विकासाच्या मुद्द्यावर कार्यकर्त्यांनी बोलायचं नाही का? बोलले ते असे प्रकार सुरू होतात. लोकप्रतिनिधींच्या पायाखालची वाळू सरकल्याने, असे अन्यायकारक प्रकार भाजपच्या कार्यकर्त्यांवर होत असल्याचा आरोप केला.

Ahmednagar
Assembly Winter Session : अहमदनगर जिल्हा नामांतर आणि विभाजनाच्या मुद्य्यावर अधिवेशनात शिंदे, लंके अन् जगतापांचे मौन!

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com