Mahadev Jankar Politics: महादेव जानकर यांचा तिसऱ्या आघाडीला झटका, म्हणाले, मी महायुतीतच!

Mahadev Jankar; The wise people disappointed Chhatrapati Sambhajiraje, Jankar will remain in Mahayuti-महादेव जानकर यांनी महायुतीतच राहणार असल्याचे जाहीर केल्याने छत्रपती संभाजीराजे नाऊमेद केले.
Mahadev Jankar & Chhatrapati Sambhajiraje
Mahadev Jankar & Chhatrapati SambhajirajeSarkarnama
Published on
Updated on

Third front News: आगामी विधानसभा निवडणुकीत तिसरी आघाडी उभी करण्यासाठी धडपड सुरू आहे. त्याला महादेव जानकर यांनी आज झटका दिला. त्यामुळे छत्रपती संभाजीराजे यांची निराशा होणार आहे.

राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर महायुतीमध्ये नाराज आहेत. त्याचा जानकर यांनी पुन्हा एकदा पुनरुच्चार केला आहे. त्यांची नाराजी प्रामुख्याने जागा वाटपाबाबत आहे. अशी नाराजी असली तरीही आपण तिसऱ्या आघाडीत जाणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.

गेले काही दिवस तिसरी आघाडी निर्माण करण्यासाठी प्रयत्न करणारे छत्रपती संभाजीराजे आणि प्रहार पक्षाचे आमदार बच्चू कडू यांच्या प्रयत्नांना बाधा निर्माण झाली आहे. पश्चिम महाराष्ट्रातील राजकारणात जम बसविण्यासाठी तिसरी आघाडी जोरदार प्रयत्न करीत आहेत.

श्री जानकर या प्रयत्नात महत्त्वाचा घटक ठरू शकले असते. मात्र आता ती शक्यता दुरावली आहे. त्यामुळे बाल्यावस्थेत असलेल्या तिसऱ्या आघाडीला उभे राहण्याआधीच अडचणी जाणवत आहेत. त्यामुळे या नेत्यांच्या उत्साहावर विरजन पडले आहे.

Mahadev Jankar & Chhatrapati Sambhajiraje
Ajit Pawar politics: अजित पवारांनी मोहन भागवतांचा दावा खोडला, अगदी फडणवीसांच्या उपस्थितीतच!

यासंदर्भात श्री जानकर यांनी आगामी विधानसभा निवडणुकीबाबत आपले धोरण देखील स्पष्ट केले आहे. यापूर्वी त्यांनी महायुतीने योग्य जागा न दिल्यास राज्यातील सर्व २८८ मतदार संघात उमेदवार देऊ, अशी घोषणा केली होती.

यासंदर्भात ते म्हणाले, महायुतीच्या जागा वाटपाची चर्चा सुरू आहे. ही चर्चा प्रामुख्याने तीन पक्षांतच होत आहे. अन्य घटक पक्ष उपेक्षित आहेत. आम्हाला महायुतीकडून किमान ३५ ते ४० जागांची अपेक्षा आहे. अशी मागणी आम्ही केली आहे.

याबाबत महायुतीच्या नेत्यांनी लवकर निर्णय घ्यावा. आमच्या पक्षाला चार राज्यांत राष्ट्रीय पक्ष म्हणून मान्यता मिळाली आहे. स्वबळावर प्रयत्न करून आमच्या पक्षाला महाराष्ट्रात दहा ते बारा आमदार निश्चितपणे निवडून आणता येतील, असा दावा जानकर यांनी केला.

Mahadev Jankar & Chhatrapati Sambhajiraje
Mahayuti News : उत्तर महाराष्ट्रासाठी महायुतीने आखली रणनीती; 'या' 16 मतदारसंघावर असणार विशेष लक्ष

राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष जानकर यांच्या भूमिकेमुळे तिसऱ्या आघाडीचे नुकसान होणार आहे. तसेच अप्रत्यक्षरीत्या महायुतीला इशारा देखील आहे. महायुतीमध्ये जागवा वाटपात भाजप मोठा भाऊ आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष यांच्यासाठी किती जागा सोडायच्या यावरून वाद सुरू आहेत.

काही मतदारसंघांत मैत्रीपूर्ण लढतीच्या घोषणा देखील, हे पक्ष करीत आहेत. अशा स्थितीत महायुतीत सहभागी असलेल्या अन्य सात ते आठ पक्षांना विधानसभा निवडणुकीत मतदार संघ हवे आहेत. त्यांच्या अपेक्षा कशा पूर्ण करणार, याविषयी महायुतीच्या नेत्यांमध्ये अद्याप काहीच स्पष्टता नाही.

श्री. जानकर आपल्या मागण्यांवर ठाम राहिल्यास इतर पक्षांच्याही अपेक्षा वाढू शकतात. अशा स्थितीत महायुतीच्या जागा वाटपात अडचणींची भर पडेल. त्यातून कसा मार्ग निघतो हा प्रश्न शिल्लक राहतो.

------

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com