BJP Monika Rajale : आक्रमक जमाव, बचावासाठी भाजप महिला आमदाराने स्वतःला घेतलं कोंडून, कारण...

BJP woman MLA locks herself to escape mob attack: भाजप महिला आमदार मोनिका राजळे यांच्यावर मतदानाच्या दिवशी जमावाच्या रोषामुळे वेगळाच प्रसंग उद्धभवला होता.
Monika Rajle
Monika RajleSarkarnama
Published on
Updated on

Ahilyanagar News: अहिल्यानगर जिल्ह्याच्या मतदानाच्या शेवटची शेवगाव-पाथर्डी विधानसभा मतदारसंघात मोठा गोंधळ झाला.

जमावाच्या रोषापासून वाचण्यासाठी भाजप महिला आमदार मोनिका राजळे यांनी स्वतःला समर्थकांसह खोलीत कोंडून घेतलं. हा प्रकार शेवगाव-पाथर्डी मतदारसंघातील शिरसाटवाडी (ता. पाथर्डी) इथं झाला.

शेवगाव-पाथर्डी तालुक्यात 'कांटे की टक्कर', अशी विधानसभा निवडणूक होत आहे. भाजपच्या विद्यमान आमदार मोनिका राजळे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार (Sharad Pawar) पक्षाचे प्रतापराव ढाकणे, माजी आमदार चंद्रशेखर घुले पाटील, लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या कट्टर समर्थक तथा जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या हर्षदा काकडे यांच्यात चुरशीची लढाई आहे.

Monika Rajle
Shivsena News : मोठी बातमी, एकनाथ शिंदेंच्या उमेदवाराचा पाठलाग, वाहनावर गोळीबार; नेमकं काय घडलं, तिघांविरोधात गुन्हा दाखल

पाथर्डी तालुक्यातील शिरसाटवाडी इथं बूथ ताब्यात घेतल्याची माहिती मिळाल्यानंतर भाजप (BJP) आमदार मोनिका राजळे या समर्थकांसह तिथे भेट देण्यासाठी गेल्या होत्या. भाजप आमदार आल्याचे कळाल्यावर शिरसाटवाडीमधील लोक एकत्र आले. रोष व्यक्त करण्यास सुरवात केली. यातून गोंधळ उडाला. यावेळी जमाव आक्रमक होत,आमदारांवर चालून जाऊ लागला.

Monika Rajle
Rohit Pawar Vs Ram Shinde : मतांसाठी नोटा बदाबदा गळं..; पवार अन् शिंदेमधला 'वॉर' टोकाला

दरम्यान मोठा जमाव असल्याने आमदार राजळे सावध झाल्या. त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह स्वतःला एका खोलीत बंद करून घेतले. संबंधित खोली बाहेर मोठा जमाव होता. हुल्लडबाजी करत होता. पोलिस बंदोबस्त कमी असल्याने मोनिका राजळे या बाहेर येण्यास तयार नव्हत्या.

आमदार राजळे यांनी शेवटी दूरध्वनीवरून पोलिसांशी संपर्क साधत मदत मागवली. शेवटी अतिरीक्त पोलिस बंदोबस्त आल्यानंतर आमदार राजळे यांना बंदोबस्तात शिरसाटवाडीतून बाहेर पडल्या. खोली बाहेर जमलेला जमाव हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचा असल्याचा दावा, आमदार राजळेंकडून केला गेला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com