Rohit Pawar Vs Ram Shinde : मतांसाठी नोटा बदाबदा गळं..; पवार अन् शिंदेमधला 'वॉर' टोकाला

Ahilyanagar Karjat Jamkhed Constituency Rohit Pawar Ram Shinde voter : अहिल्यानगरच्या कर्जत मतदारसंघात रोहित पवार आणि राम शिंदे यांच्यातील राजकीय संघर्ष मतदानाच्या दिवशी टोकाला पोचला होता.
Rohit Pawar 1
Rohit Pawar 1Sarkarnama
Published on
Updated on

Ahilyanagar News : राज्यात विधानसभेसाठी मतदान होत आहे. अनेक भागात पैसे वाटपाचे, हिंसक घटना घडल्या आहेत. अहिल्यानगरमधील कर्जत-जामखेड मतदार संघात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार आणि भाजपचे आमदार राम शिंदे यांच्यातील राजकीय संघर्ष मतदानाच्या दिवशी चांगलाच उफळला.

पैसे वाटपाचे आरोप, त्याचे व्हिडिओ दोन्ही बाजून समाज माध्यमांवर व्हायरल करण्यात येते होते. मतदान प्रक्रिया आणि निवडणूक आयोगाच्या निर्बंधांमुळे या सर्व प्रकारावर सविस्तरपणे नंतर बोलणार असल्याचा इशारा आमदार रोहित पवार यांनी दिला.

आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांच्या कारखान्याचा शेतकी अधिकाऱ्याला पैशासह, तर खासगी स्वीय सहायक विनय डुकरे यांना बोगस मतदान करताना पकडल्याचा दावा, भाजपच्या राम शिंदे यांनी केला. या संदर्भातील व्हिडिओ समाज माध्यमांवर व्हायरल झाले. भाजपच्या राम शिंदे यांच्या समर्थकांनी निवडणूक आयोगाकडे तक्रार केल्याचे सांगितले गेले.

Rohit Pawar 1
Election Crackdown: 4 हजारांवर प्रतिबंधक कारवाई, 31 कोटी जप्त; मतदान केंद्रावर मोबाईलला बॅन अन् ड्रोन वॉच

भाजपच्या (BJP) या 'वॉर'नंतर रोहित पवार यांनी देखील जोरदार प्रत्युत्तर दिले. शेतकी अधिकाऱ्याला धमकावणारे भाजच्या कृपेने निवडणुकीसाठी जामिनावर सुटलेल्या आणि गंभीर गुन्ह्यातील आरोपींना मारहाण केली. काही दिवसांपासून कर्जत-जामखेडमध्ये गुंडाराज सुरू असल्याचा आरोप करणारी पोस्ट रोहित पवार यांनी एक्स खात्यावर शेअर केली. लोकांचा बुद्धीभेद करण्यासाठी अनेक चुकीच्या गोष्टी सुरू असल्याचेही रोहित पवार यांनी म्हटले आहे. याशिवाय भाजप कार्यकर्त्यांनी बाभुळगाव खालसामधील महिलेला धमकावल्याने त्यांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल केल्याचा दावा रोहित पवार यांनी केला.

Rohit Pawar 1
Nitin Gadkari : 'लग्न आमचं झालं, मुलं आम्हाला झाली अन् लाडू..'; नितीन गडकरींची 'ही' शेलकी टोलेबाजी कोणाला?

सात ते आठ लाख रुपये पकडले

तसेच राम शिंदे यांनी निवडणुकीसाठी पैसे नसल्याचे सांगत 'क्यूआर' कोड समाज माध्यमांवर शेअर केला होता. त्यावर देणगी स्वरुपाचे आव्हान केले होते. त्याचा संदर्भ घेत रोहित पवार यांनी राम शिंदेंचे पदाधिकारी मतं कसे विकत घेत आहे, याचा व्हिडिओ देखील 'एक्स' खात्यावर शेअर केला आहे. भाजपचे तालुका उपाध्यक्ष ऋषिकेश मोरे आणि कार्यकर्ते बाळू मोहिते यांचा हा व्हिडिओ आहे. तसेत एका हाॅटेलमधून राम शिंदे यांच्या नातेवाईकांकडून सात ते आठ लाख पकडले आहेत. पोलिस यासंदर्भात कारवाई करत आहेत. याचसाठी केला होता अट्टाहास, पैशासाठी पसरला लोकांपुढे हात..! असा चिमटा देखील पवार यांनी राम शिंदे यांना काढला.

रोहित पवारांचा राम शिंदेंना इशारा

रोहित पवार एवढ्यावर थांबले नाही, तर एका मतदान केंद्रातील व्हिडिओ शेअर केला आहे. हा व्हिडिओ राम शिंदे यांना टॅग केला आहे. भाजप उमेदवार राम शिंदे यांच्या खोटारडेपणाला लागली कळं... मतासाठी नोटा बदाबदा गळं... ये तो सिर्फ ट्रेलर हैं, पिक्चर अभी बाकी है, असा देखील इशारा रोहित पवार यांनी दिला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com