Chhagan Bhujbal : ...म्हणून अजितदादांच्या अर्थसंकल्पावर भुजबळांची स्तुतिसुमने

Chhagan Bhujbal On Maharashtra Budget 2024 : राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी अजित पवार यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पाचे स्वागत केले आहे. या अर्थसंकल्पाने महाराष्ट्राचा स्वाभिमान उंचावेल असे अनेक निर्णय असल्याचंही ते म्हणाले.
Ajit Pawar and Chhagan Bhujbal
Ajit Pawar and Chhagan BhujbalSarkarnama
Published on
Updated on

Chhagan Bhujbal On Ajit Pawar : उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी शुक्रवारी राज्याचा अर्थसंकल्प मांडला. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर घोषणांचा पाऊस पाडणारा हा अर्थसंकल्प आहे. त्यामुळे सत्ताधारी पक्षाने या अर्थसंकल्पाची तोंड भरून स्तुती केली आहे.

राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी देखील या अर्थसंकल्पाचे स्वागत केले आहे. या अर्थसंकल्पाने महाराष्ट्राचा स्वाभिमान उंचावेल असे अनेक निर्णय असल्याचंही ते म्हणाले. राज्यातील शेतकरी, कष्टकरी, विद्यार्थी, युवक, महिला, मागासवर्गीय, आदिवासी, अल्पसंख्यांक आणि मुख्य म्हणजे ओबीसी अशा सर्व घटकांना न्याय देणारा हा संकल्प असल्याचं वक्तव्य भुजबळ यांनी केलं.

तसेच हा अर्थसंकल्प मांडताना सर्व घटकांच्या कल्याणाचा विचार करण्यात आलेला आहे. विविध सुविधांच्या माध्यमातून आर्थिक लाभ महिला तसेच विद्यार्थ्यांना होणार आहे. महाराष्ट्राची परंपरा असलेल्या वारकऱ्यांच्या दिंड्यांना प्रत्येक वीस हजार रुपये अनुदान मिळेल.

दरवर्षी रायगडावर (Raigad) राज्याभिषेक सोहळा होईल. विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्यासह अनेक निर्णय जनतेला खुश करतील. त्यामुळे महाराष्ट्राच्या विकासाला निश्चित चालना मिळेल, असा दावा भुजबळ यांनी केला.

Ajit Pawar and Chhagan Bhujbal
Ladli Behna Yojana Maharashtra : '17' ची किमया भारी, म्हणून महायुती सरकारला आठवली 'लाडकी बहीण'

तर या अर्थसंकल्पाच्या माध्यमातून पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर घरकुल योजना राबविण्यात येणार आहे. त्या माध्यमातून येत्या पाच वर्षात 35 लाख 40 हजार 491 घरकुले बांधण्याचा संकल्प आहे. त्यावर 7 हजार 491 कोटी रुपयांचा खर्च केला जाईल. पेट्रोल आणि डिझेल वरील मूल्यवर्धित कर समान करण्याची तरतूद लोकांना दिलासा देणारी ठरेल, असा विश्वास देखील भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी व्यक्त केला.

Ajit Pawar and Chhagan Bhujbal
Jayant Patil On Maharashtra Budget : जयंत पाटील यांनी एका वाक्यात बजेटची केली चिरफाड; म्हणाले, 'चादर लगी फटने...'

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com