Maharashtra Kesari 2025 : महाराष्ट्र केसरी स्पर्धेतील वादग्रस्त निर्णय; 'इनसाइट'चा राजकीय दबाव?

Maharashtra Kesari Kusti tournament Maharashtra Kustigir Sangh Ahilyanagar controversy : महाराष्ट्र कुस्तीगीर संघातर्फे अहिल्यानगरमध्ये झालेल्या महाराष्ट्र केसरी स्पर्धा विविध मुद्यांनी गाजत आहे.
Maharashtra Kesari 2025
Maharashtra Kesari 2025Sarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : महाराष्ट्र कुस्तीगीर संघाने अहिल्यानगरमध्ये आयोजित केलेल्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेतील निर्णयामुळे वादात सापडली आहे. ही स्पर्धा वेगवेगळ्या मुद्यांनी गाजत आहेत. राजकीय दबाव असल्याची चर्चा आता होऊ लागली आहे. तो राजकीय दबाव नेमका कोणता?

शिवराज राक्षे याने ट्रिपल महाराष्ट्र केसरी होईल म्हणूनच मला जाणूनबुजून पराभूत करण्यात आलं आहे, या प्रतिक्रियेत दडला आहे. कुठेतरी हीच इनसाइट स्टोरी दडलेली असल्याचे म्हटले जात आहे.

महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत पुण्याचा (Pune) पृथ्वीराज मोहोळ आणि सोलापूरच महेंद्र गायकवाड यांच्यात अंतिम लढत झाली. दोघा पैलवानांना एक-एक गुण मिळाले. महेंद्र गायकवाड याने अचानक आखाडा सोडला अन् गोंधळ झाला. यातच पृथ्वीराज मोहोळ याला विजयी घोषित करण्यात आलं. हा मुद्दा देखील कळीचाच आहे.

Maharashtra Kesari 2025
Top Ten News : पृथ्वीराज मोहोळ 'महाराष्ट्र केसरी' ; राज ठाकरेंचे मंत्री उदय सामंतांना आवाहन - वाचा महत्त्वाच्या घडामोडी!

तत्पूर्वी नांदेडमध्ये (Nanded) असलेला शिवराज राक्षे तसा पुण्याचा. उपांत्यफेरीत त्याची गादी विभागात पृथ्वीराज मोहोळ याच्याशी लढत झाली. राक्षे याला यावेळी ट्रिपल महाराष्ट्र केसरी होण्याची संधी होती. गादीवरील लढतीत मोहोळ विजय झाला. पण पंचांच्या या निर्णयावर राक्षे याने हरकत घेतली. खांदे टेकलेले नसताना, मोहोळचा विजय कसा? यावरून त्याचे पंचांबरोबर वाद झाले. वाद टोकाला पोचले अन् राक्षने पंचांच्या काॅलरलाच थेट हात घातला. यानंतर त्याने पंचांना लाथ मारली. यामुळे वाद विकोपाला पोचला आहे.

Maharashtra Kesari 2025
NCP Stand for Wrestling Controversy : कुस्तीतील वाद राजकीय आखाड्यात, राक्षेवर अन्याय शरद पवारांच्या पक्षाची भूमिका !

शिवराज याचे तीन वर्षांसाठी निलंबन

पंचांनी शिवराज राक्षेवर गुन्हा नोंदवण्याची मागणी केली. राक्षे याने व्हिडिओ दाखवा म्हटल्यावर पंचांनी शिवीगाळ केली, असा आरोप केला. या गोंधळातून मोहोळ याच्यावर विजयाचा शिक्कामोर्तब झाला. यानंतर पंचांबरोबर गैरवर्तन केल्याचा ठपका ठेवत शिवराज राक्षे याला तीन वर्षांसाठी निलंबन करण्यात आलं. शिवराज याच्यावर अन्याय झाल्याचं त्याच्या आईवडिलांचं देखील म्हणणं आहे. याशिवाय शिवराज याने ट्रिपल महाराष्ट्र केसरी होईल, म्हणून मला जाणूनबुजून पराभूत करण्यात आल्याचा आरोप केला आहे.

गायकवाडचे निलंबन, काय आहे कारण

पृथ्वीराज मोहोळ आणि सोलापूरचा महेंद्र गायकवाड यांच्यात अंतिम सामना झाला. सुरवातीला दोघांना एक-एक गुण मिळाले होते. त्यानंतर महेंद्र गायकवाड याने मैदान सोडलं अन् पंचांकडे धाव घेतली. यामुळे गोंधळ उडाला. यात मोहोळ याला विजयी घोषित करण्यात आलं. यामुळे महेंद्र गायकवाड याचे समर्थक आक्रमक झाले. गोंधळ घालत असतानाच, पोलिसांनी लाठीचार्ज केला. पंचांकडे धाव घेतलेल्या महेंद्र गायकवाड याला देखील तीन वर्षांसाठी निलंबन करण्यात आलं आहे.

पृथ्वीराज म्हणतो, शिवराज चांगला पैलवान

'शिवराज राक्षे याने पंच दत्तात्रय माने यांना लाथ मारलेला प्रकार चुकीचा असल्याची प्रतिक्रिया पृथ्वीराज मोहोळ याने दिली. राक्षे हा चांगला पैलवान आहे. पंचांनी मला घोषित केल्यानंतर मी मैदानातून बाहेर पडलो. बाकी मागे काय झाले, याबाबत मी सांगू शकत नाही', अशी प्रतिक्रिया महाराष्ट्र केसरी पृथ्वीराज मोहोळ याने दिली.

शिवराज म्हणला, म्हणून लाथ मारली

शिवराज राक्षे म्हणाला, "आपले दोन्ही खांदे टेकले नव्हते, कुस्तीही चितपट झाली नाही. तरीही पंचांनी आपल्याला पराभूत केले. मी ट्रिपल महाराष्ट्र केसरी होईल, म्हणूनच मला जाणूनबुजून पराभूत करण्यात आलं. पंचांनी आपल्यावर अन्याय केला. यातूनच राग आला आणि मी लाथ मारली".

राजकीय नेत्यांची उपस्थिती

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, विधान परिषदेचे सभापती राम शिंदे, केंद्रीय नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, राज्याचे क्रीडामंत्री दत्तात्रय भरणे, जलसंपदा तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे, संयोजक आमदार संग्राम जगताप, राज्य कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष रामदास तडस, माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील, माजी आमदार अरुण जगताप, आमदार ज्ञानेश्वर कटके, आमदार काशिनाथ दाते यांच्यासह कुस्ती क्षेत्रातील पैलवान उपस्थित होते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com