"लखपती दीदी गावांची अर्थव्यवस्था बदलणार," असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जळगाव येथील कार्यक्रमात व्यक्त केला. मोदी यांच्या उपस्थितीत आज ‘लखपती दीदीं’चा मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मोदी बोलत होते.
पुढील पिढीला सशक्त बनविण्याचे काम महिलांनी केले आहे. आजही बहिणाबाईंच्या कविता विचार बदलण्यास प्रेरक ठरतात. मला मातृशक्तीवर विश्वास आहे. काही लोक म्हणायचे महिलांना कर्ज देऊ नका. पण या महिलांचा देशाच्या अर्थव्यवस्थेची कणा बनत चालल्या आहेत, असे मोदी म्हणाले.
"तीन कोटी बहीणींना लखपती दीदी बनवयाची आहे. दोन महिन्यात देशात ११ लाख दीदी या लखपती दीदी बनल्या आहेत. एक महिला कुटुंबांचे भवितव्य बदलत आहे. आमच्या सरकारने महिलांसाठी अनेक योजना आणल्या. या योजनांच्या माध्यमांतून देशाला सक्षम बनवण्याचे काम नारीशक्ती करीत आहेत.तुमच्यामध्ये मी जिजाऊ आणि सावित्रीबाईंची छबी पाहतो," अशा शब्दात मोदींनी उपस्थित महिलांचे कौतुक केले.
आपल्या भाषणाची सुरूवात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मराठीमध्ये केली.नेपाळ दुर्घटनेतील मृतांना श्रद्धांजली वाहिली. नेपाळ बस अपघाताची घटना घडली तसे आम्ही रक्षा खडसे ना तिथं पाठवले, केंद्र आणि राज्य सरकारकडून त्यांना मदत दिली जाईल असे आश्वासन मोदी यांनी दिले.
महाराष्ट्रातील संस्कृती जगभर पसरली आहे. मी नुकताच युरोपमधून पोलंडला गेलो होतो. त्या ठिकाणी मला महाराष्ट्राच्या संस्कृतीचे दर्शन झाले. पोलंडची जनता महाराष्ट्रातील लोकांचा खूपच सन्मान करतात. पोलंडच्या राजधानीत त्यांनी कोल्हापूर मेमोरियल उभारले आहे.
कोल्हापूरच्या लोकांची सेवा आणि सत्कारच्या भावनेला सन्मान देण्यासाठी पोलंडच्या लोकांनी हे मेमोरियल बनवले आहे. महाराष्ट्रातील गौरवशाली संस्कृती आणि संस्काराचे दर्शन मला सर्वत्र होते, अशा शब्दात मोदींनी महाराष्ट्रांच्या संस्कारांचे कौतुक केले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.