Nandurbar Elections: नगरपरिषद निवडणुकीत AIMIM ठरते महायुतीची डोकेदुखी!

Shahada Municipal Election 2025:एमआयएममुळे होणाऱ्या मतांच्या विभाजनाचा थेट परिणाम भाजप, राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या मतांवर होणार असल्याने महायुतीचे समीकरण बिघडण्याची चिन्हे आहेत. नगरपरिषद निवडणुकीत एमआयएम महायुतीची डोकेदुखी ठरत आहे.
AIMIM vs BJP Lok Sabha
AIMIM vs BJP Lok SabhaSarkarnama
Published on
Updated on

सागर निकवाडे

Nandurbar News: नगरपालिका, नगरपंचायती निवडणुकीची रणधुमाळी सुरु झाली आहे. सर्वच पक्षाच्या प्रचारसभा, रॅली, मतदारांच्या गाठी-भेटी सुरु आहे. हे सुरु असतानाच अपक्ष उमेदवारांनीही प्रचारात आघाडी घेतली आहे. नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारीमुळे चुरस वाढली आहे.

शहादा नगरपरिषद निवडणुकीत एमआयएम पक्षाने एन्ट्री केल्याने महायुतीची भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट, शिवसेना शिंदे गटाची चिंता वाढली आहे. नगराध्यक्षपदासाठी एमआयएमने उमेदवार दिल्याने येथील लढत अत्यंत चुरशीची बनली आहे.

एमआयएमने साजिद पिंजारी यांना नगराध्यक्ष पदाच्या रिंगणात उतरवले आहे. पिंजारी यांच्या उमेदवारीमुळे महायुतीच्या उमेदवारांना मोठा फटका बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे. एमआयएममुळे होणाऱ्या मतांच्या विभाजनाचा थेट परिणाम भाजप, राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या मतांवर होणार असल्याने महायुतीचे समीकरण बिघडण्याची चिन्हे आहेत. नगरपरिषद निवडणुकीत एमआयएम महायुतीची डोकेदुखी ठरत आहे.

AIMIM vs BJP Lok Sabha
Maharashtra Politics: होऊ दे खर्च! फडणवीस, शिंदे, अजितदादांकडून प्रत्येक नगरपालिकेसाठी 10 कोटीचं बजेट?

विकासाच्या मुद्यांवरुन निवडणुकीच्या रिंगणात उतरलो आहे. अनेक वर्षांपासून शहादा शहराचा विकास झालेला नाही. शहादामध्ये दलित, आदिवासी, मुस्लिमाचे मतदार बहुसंख्य आहे. आत्तापर्यंत आमच्या मतावर हे निवडणूक आले पण त्यांनी विकास केलेला नाही. आम्हाला अल्पसंख्याकांचा पाठिंबा आहे. त्यांचे समर्थन मिळत आहे, असा विश्वास साजिद पिंजारी यांनी व्यक्त केला आहे.

शहादा नगरपालिकेसाठी जनता विकास आघाडीतर्फे अभिजित पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे खाटीक मकसूद शेख गफ्फार, भाजपातर्फे मकरंद पाटील, एआयएमआयएम पक्षाचे पिंजारी साजिद रहीम, तर दोन अपक्ष उमेदवार पिंजारी शेख आरिफ शेख मासुम आणि बेलदार मेहमूद शेख अहमद असे 6 उमेदवार नगराध्यक्षपदासाठी तर नगरसेवकांच्या २९ जागांसाठी ११९ उमेदवार मैदानात उतरले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस तसेच एमआयएमने उमेदवार दिल्याने ही निवडणूक रंगतदार ठरत आहे. नगराध्यक्ष पदासाठी सहा उमेदवार रिंगणात आहेत. त्यापैकी 4 मुस्लिम उमेदवार दिल्याने ते किती मतांवर प्रभाव टाकतात? त्यावर शहराचा नगराध्यक्ष ठरणार आहे. शहादाच्या नगराध्यक्षपदाच्या प्रतिष्ठेच्या आणि चुरशीच्या लढतीत मुस्लीम समुदायाची मते प्रभावी ठरणार, हे मात्र निश्चित आहे. ही मते यंदा कोणाच्या पारड्यात जाणार, हे तीन तारखेला समजेल.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com