Maharashtra Kesari 2025 : अजितदादांच्या समोर झालेला 'तो' निर्णय चुकीचाच...

National Wrestling Federation Nitesh Kabile controversial decision Maharashtra Kesari competition Ahilyanagar Maharashtra State Wrestling Association : महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघानं अहिल्यानगरमध्ये घेतलेल्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेत चुकीचा निर्णय देणारे पंच नितेश काबिले यांच्यावर राष्ट्रीय कुस्तीगीर महासंघाने कारवाई केली.
Maharashtra Kesari 2025
Maharashtra Kesari 2025Sarkarnama
Published on
Updated on

Ahilyanagar wrestling decision : उपमुख्यमंत्री अजित पवार, विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे, केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ आणि स्वागताध्यक्ष आमदार संग्राम जगताप यांच्या उपस्थित महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघानं घेतलेल्या स्पर्धेत चुकीचा निकालावर राष्ट्रीय कुस्तीगीर महासंघानं शिक्कामोर्तब केला.

चुकीचा निर्णय देणारे आंतरराष्ट्रीय कुस्ती पंच नितेश काबिले यांच्यावर तीन वर्षांची बंदी घालत, राज्य अजिंक्यपद कुस्ती स्पर्धेत सहभागास बंदी घालण्यात आली आहे.

महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघानं फेब्रुवारी 2025मध्ये अहिल्यानगरमध्ये महाराष्ट्र (Maharashtra) केसरी स्पर्धा झाल्या होत्या. या स्पर्धेतील अंतिम लढत पृथ्वीराज मोहोळ आणि महेंद्र गायकवाड यांच्यात झाली. यात पृथ्वीराज मोहोळ महाराष्ट्र केसरीचा मानकरी ठरला.

Maharashtra Kesari 2025
Gopichand Padalkar Vs Ajit Pawar : पडळकरांचा सुपडासाफ करण्यासाठी अजितदादांना सापडला मोहरा; मायक्रो प्लॅनिंग सुरू

या स्पर्धेच्या उपांत्य फेरीत, पृथ्वीराज मोहोळ आणि शिवराज राक्षे यांच्यात लढत झाली. यात पंचांनी पृथ्वीराज याला काही सेकंदातच विजयी घोषित केले. तसा निर्णय पंच नितेश काबिले यांनी दिला. चुकीचा निर्णय दिला म्हणून शिवराज यांनी पंचांशी वाद घातला. तसेच शिवराज राक्षे याने एका पंचाला देखील लाथ मारली.

Maharashtra Kesari 2025
China Visa rules eased for Indians : चीनचा व्हिसा मिळणं झालं सोपं; कशी आहे प्रक्रिया? समजून घ्या...

या वादानंतर शिवराज राक्षेवर कुस्तीगीर संघाने तीन वर्षांसाठी निलंबित केलं. हा सर्व वाद उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar), सभापती प्रा. राम शिंदे, केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्यासमोर झाला होता. राक्षेंनी पंचांनी चुकीचा निर्णय जाणिवपूर्वक दिल्याचा आरोप केला. या आरोपींची दाखल घेत, राज्य कुस्तीगीर संघाचे कार्याध्यक्ष संदीप भोंडवे यांनी विलास कुथरे यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमत चौकशी अहवाल मागवला होता.

या समितीचा अहवाल समोर आला असून, राक्षेविरुद्ध मोहोळ सामान्यात पंचांची चूक होती, असे निरीक्षण नोंदवलं आहे. या अहवालानंतर आता चुकीचा निर्णय दिला म्हणून, पंच नितेश काबिले यांच्यावर तीन वर्षांची बंदी घालण्याचा निर्णय दिला आहे. अहवाल समोर येताच, कुस्तीगीर संघाने अहिल्यानगरमध्ये घेतलेल्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेमागील राजकारणावर चर्चा होऊ लागल्या आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com