Dhule: नव्या सरकारकडून धुळे शहराच्या विकासाला गती

दुसरी पाणीपुरवठा, ड्रेनेज योजना मंजूर; डॉ. भामरे, अग्रवाल यांच्या प्रयत्नांना यश
Dhule Municiple corporation
Dhule Municiple corporationSarkarnama
Published on
Updated on

धुळे : राज्यात (Maharashtra) भाजपच्या (BJP) पुढाकाराने परिवर्तनातून एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) सरकार स्थापन झाले. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा धुळे (Dhule) विकासाचे दान म्हणून आणखी एक पाणीपुरवठा योजना आणि भुयारी गटार (ड्रेनेज) योजना मंजूर केली आहे. यात महिन्याभरात सरकारने महापालिकेकडून ‘डीपीआर’ मागविला आहे. त्यामुळे महापालिकेच्या हद्दवाढीत समाविष्ट गावांना पाणीपुरवठा योजनेतून दिलासा, तर देवपूर वगळून उर्वरित धुळे शहराला ड्रेनेज योजनेचा लाभ मिळणार आहे. (BJP leader Fadanvis positive on Dhule Municiple corporation)

Dhule Municiple corporation
राज्य शासनाला न्यायालयाचा धक्का; धोरणात्मक निर्णय घेण्यास मनाई

खासदार डॉ. सुभाष भामरे आणि भाजपचे शहर- जिल्हाध्यक्ष अनुप अग्रवाल यांच्या प्रयत्नांना यश लाभल्याने या योजना महापालिकेच्या पदरात पडल्या आहेत. त्यामुळे शहर विकासाला गती आणखी गती लाभू शकेल. शहराचा पाणीप्रश्‍न निकाली काढू शकेल, अशी अक्कलपाडा पाणीपुरवठा योजना पूर्वी भाजपप्रणीत राज्य सरकारनेच मंजूर केली होती. तसेच विकसनशील देवपूरसाठी दीडशे कोटींच्या निधीतून भुयारी गटार योजनाही याच सरकारच्या काळात अमलात आली होती.

Dhule Municiple corporation
कोश्‍यारी यांनी मराठी माणसाचा अवमान केला!

यापाठोपाठ हद्दवाढीतील अंशतः नगावसह ११ गावांची तहान भागू शकेल, अशी महत्त्वाकांक्षी पाणीपुरवठा योजना नव्या सरकारने मंजूर केली आहे. या योजनेचा अंशतः नगाव, वलवाडी, भोकर, महिंदळे, नकाणे, मोराणे, चितोड, अवधान, वरखेडे, बाळापूर, पिंप्री क्षेत्राला लाभ मिळू शकेल. महापालिका हद्दवाढीच्या क्षेत्रासाठी ही मोठी उपलब्धी ठरली आहे.

ड्रेनेज योजनेचा लाभ

येथील तत्कालीन नगरपालिका आणि विद्यमान महापालिका क्षेत्रात ड्रेनेज लाईन नसल्याने अनेक संकटांना सामोरे जावे लागत आहे. सांडपाणी आणि मलःनिस्सारणाची सुविधा नसल्याने आरोग्याचे प्रश्‍नही बिकट झाले. असे असताना शहरात विकसनशील देवपूर भागात सुमारे दीडशे कोटींच्या निधीतून भुयारी गटार अर्थात ड्रेनेज लाईन योजना मंजूर झाली. ती निधीच्या कारणास्तव रखडली तरी तिला आता गती देण्यासाठी महापौर कर्पे आणि भाजपचे शहर- जिल्हाध्यक्ष अग्रवाल यांनी नुकतेच प्रयत्न सुरू केले आहेत. असे असताना देवपूर भाग वगळून उर्वरित धुळे शहरासाठी नव्या सरकारने ड्रेनेज लाईनला मंजुरी दिली आहे. त्यामुळे उर्वरित धुळे शहरातील सांडपाणी आणि मलःनिस्सारणाचा प्रश्‍न निकाली निघण्यास मदत होणार आहे.

शहरातील ज्या भागात पाणीपुरवठ्याची समस्या आहे, त्या भागातील वितरण वाहिनी टाकणे, सद्यःस्थितीतील पाणीपुरवठा वितरण व्यवस्था दीर्घकालीन असल्याने, जीर्ण झाल्याने आवश्यक त्या ठिकाणी नूतनीकरण करणे, शहरातील हद्दवाढ भागाचा विचार करून त्या ठिकाणी नवीन जलकुंभांची निर्मिती व वितरण व्यवस्था निर्माण करणे, नवीन जलशुद्धीकरण केंद्र उभारणे आणि त्यांचे नूतनीकरण करणे, पाणीपुरवठा व्यवस्था अत्याधुनिक करणे यासाठी शासनामार्फत मान्यता प्राप्त झाली आहे. यात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, खासदार डॉ. सुभाष भामरे, माजी मंत्री गिरीश महाजन, माजी मंत्री तथा आमदार जयकुमार रावल, माजी मंत्री अमरिशभाई पटेल, माजी आमदार राजवर्धन कदमबांडे, महापौर प्रदीप कर्पे, भाजपचे- शहर जिल्हाध्यक्ष अनुप अग्रवाल यांच्या माध्यमातून या दोन योजनांना मान्यता मिळाली आहे.

---

राज्यात भारतीय जनता पार्टीची सत्ता स्थापन झाल्यावर शहराच्या विकासाला गती मिळू लागली आहे. ही भेट शहर विकासातील महत्त्वपूर्ण टप्पा ठरणार आहे. धुळे शहराच्या सर्वांगिण विकासासाठी भाजप कटिबद्ध आहे. त्यास धुळेकरांची साथ लाभावी.

- अनुप अग्रवाल, शहर- जिल्हाध्यक्ष, भाजप

---

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com