BJP State Meeting; आघाडी सरकारने फडणवीसांच्या अटकेची तयारी केली होती.

आशीष शेलार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे- फडणवीस सरकारच्या अभिनंदणाचा ठराव भाजपच्या प्रदेश कार्यकारीणी बैठकीत मांडला.
Ashish Shelar
Ashish ShelarSarkarnama

नाशिक : (Nashik) महाविकास आघाडी (Mahavikas Front) सरकारमध्ये त्या काळात सुडाचे राजकारण सुरु होते. देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांना देखील एक नव्हे तर दोन खोट्या गुन्ह्यांमध्ये अटक करण्याचा पुर्ण प्रयत्न मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackrey) यांच्या काळात सरकारने केला होता, याचा पुनरूच्चार भाजप (BJP) नेते आमदार आशीष शेलार (Ashish Shelar) यांनी केला. (Uddhav Thackrey Government have played a game of Revenge)

Ashish Shelar
Atul Save News; अवैध सावकारशाही विरोधात सावेंनी थोपटले दंड!

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या अभिनंदनाचा ठराव भाजपच्या प्रदेश कार्यकारीणी बैठकीत आज आमदार आशीष शेलार यांनी मांडला. यावेळी महाविकास आघाडी सरकारवर विविध आरोप करण्यात आले. यासंदर्भात त्या पत्रकारांना माहिती दिली.

Ashish Shelar
Sharad Pawar News; उसापासून हायड्रोजन निर्मितीचा प्रयत्न करू!

ते म्हणाले, सुरवातीला दहा हजार आणि नंतर तीस हजारांची मदत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोरोना काळात मुंबईच्या कोरोनाग्रस्तांना मदत जाहीर केली. त्यानंतर सरकार बदलले. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले. त्यांनी अवघ्या सात महिन्यांत एक लाखाहून अधिक फेरीवाल्यांना त्यांच्या बँक खात्यात तो निधी जमा केला. शेतकऱ्यांना देखील राज्य व केंद्र शासनाने पंतप्रधान योजनेतून थेट बँक खात्यात मदत जमा केली, हे सर्व महाराष्ट्रातील शेतकरी पाहतो आहे.

ते पुढे म्हणाले, महाविकास आघाडीच्या सरकारकडे ना विचार होता, ना तत्व होती. ज्या हिदुत्वाचा विचार करून शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेना घडवली, वाढवली आणि महाराष्ट्राने पाहिली. तो प्रखर हिदुत्वाचा व राष्ट्रभक्तीचा विचार देखील गुंडाळून ठेवण्यात आला. त्याची उदाहरणे मी देत नाही, आपल्या सगळ्यांना ती माहिती आहे. अनेक घटना उद्धव ठाकरे यांच्या मुख्यमंत्री काळात घडल्या आणि शिवसेना हिदुत्वाच्या विचारापासून बाजुला गेली. राष्ट्रवादी विचारांपासून महाविकास आघाडी फारकत घेत होती, हे आम्ही पाहिले आहे. सुडाच राजकारण म्हणजेच सरकार चालवणं ही भूमिका घेऊन उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांचे सरकार काम करीत होते.

महाविकास आघाडीचे सरकार केतकी चितळे पर्यंतच नाही तर आपल्या मधल्या एका पत्राकाराल कोरोनाच्या काळात घरातून आणून अटक करेपर्यंत, एका संपादकाला त्या काळात घरात घुसून अटक करण्यात आली. ज्या गोष्टीत साधी एनसी देखील होणार नाही अशा प्रकरणात केंद्रीय मंत्र्यांना अटक करण्यापर्यंत सरकार गेले. केवळ सोशल मीडियावर एक कार्टून व्हायरल केले म्हणून एका माजी नेव्ही अधिकाऱ्याला त्याचा डोळा फोडण्यापर्यंत मारहाण झाली. सरकारमध्ये त्या काळात सुडाचे राजकारण चालले. देवेंद्र फडणवीस यांना देखील एक नव्हे तर दोन खोट्या गुन्ह्यांमध्ये अटक करण्याचा पुर्ण प्रयत्न मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या काळात महाविकास आघाडी सरकारने केला होता, याचा पुनरूच्चार शेलार यांनी केला.

आमदार शेलार म्हणाले, गणेशोत्सव, दसरा, दिवाळी सण उत्सव आनंदात झाला व या सरकारने सात कोटी लोकांपर्यंत शीधा राज्य सरकारला पोहोचवला. अडीच कोटी घरांवर तिरंगा फडकवला. 570 किलोमीटर लांबीचा समृद्धी महामार्ग पूर्ण करून लोकार्पण केले. 75 हजार शिक्षक, शिक्षण सेवक व सरकारी कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या दिल्या. मानधन वाढ असे जनहितार्थ निर्णय घेत कामाची गती वाढवली. त्यामुळे ग्रामपंचायत निवडणुकीत खुप मोठे समर्थन भाजप व एकनाथ शिंदे यांच्या सरकारला मिळाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com