रविकांत तुपकरांच्या धडक आंदोलनाने महावितरण हादरले!

विद्युत रोहित्रे तातडीने बसविण्याचे लिखीत आश्वासन शेतकऱ्यांना दिले.
Ravikant Tupkar & Farmars at BUldana Mahavitran office.
Ravikant Tupkar & Farmars at BUldana Mahavitran office.Sarkarnama
Published on
Updated on

बुलडांना : 'स्वाभिमानी'चे (Swabhimani Shetkari Sanghatna) नेते रविकांत तुपकर (Ravikant Tupkar) यांनी बुलडाणा महावितरण कार्यालयात काल ठिय्या आंदोलन केले. त्यांच्या या आींदोलनाने प्रशासनाला हादरवून सोडले. शेतकऱ्यांच्या (Farmers) रोहित्रांसाठी तुपकरांनी हे अनोखे आंदोलन केले. त्यामुळे प्रशासनाने रोहित्रे बसविण्याचे लिखीत आश्वसान दिले. (Farmers agitaion in Buldana Mahavitaran office)

Ravikant Tupkar & Farmars at BUldana Mahavitran office.
`दादा भुसे, संजय राठोड यांनी मला शब्द दिला होता, अशा लोकांच काय करायचं?`

बुलडाणा महावितरण कार्यालयात कार्यकारी अभियंता श्री. जायभाये यांच्या दालनात रविकांत तुपकरांनी ४ तास ठिय्या मांडला. बुलडाणा जिल्ह्यात शासनाकडून शेतकर्‍यांसाठी मोठ्या प्रमाणात विद्युत रोहित्रे मंजूर झाली आहेत. त्यासाठी लागणारा निधीही उपलब्ध झाला आहे. मे महिन्यात रोहित्रांच्या कामांच्या वर्क ऑर्डरही निघाल्या आहेत. ही सर्व कामे पावसाळ्यापूर्वी पूर्ण होणे अपेक्षित होते. परंतु पावसाळा सुरू झाला तरी काही ठेकेदारांनी कामे सुरूही केलेली नाहीत.

Ravikant Tupkar & Farmars at BUldana Mahavitran office.
मला मंत्री करा, असे एकनाथ शिंदेंना कधीही म्हटलो नाही!

ही प्रलंबित कामे आता पूर्ण करतांना पिकांचे मोठे नुकसान होणार आहे. तरी पिकांच्या होणाऱ्या नुकसानीची नुकसान भरपाई देवून महावितरणने ही कामे तात्काळ पुर्ण करावीत, मागणीसाठी रविकांत तुपकर यांनी शेलोडी (ता. चिखली) सह इतर गावांतील शेतकऱ्यांसह महावितरणच्या कार्यालयात ठिय्या मांडला. सर्व शेतकरी मुक्कामाच्या तयारीनेच आले असल्याने असल्याने त्यांनी तिथेच जेवणही केले.

रविकांत तुपकरांनी घेतलेल्या आक्रमक पवित्र्यानंतर चार तासांत महावितरण प्रशासन हादरले. आठ दिवसांच्या आत सर्व कामे पूर्ण करण्याचे त्यांनी लेखी आश्वासन महावितरणने दिल्यानंतर हे आंदोलन स्थगित करण्यात आले. जर महावितरणने दिलेले आश्वासन पाळले नाही तर मात्र महावितरणला आक्रमक आंदोलनाला सामोरे जावे लागेल, असा सज्जड इशारा यावेळी तुपकरांनी दिला.

...

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com