Gulabrao Patil politics: गुलाबराव पाटील यांनी भाजपच्या मंगेश चव्हाण यांची केली सव्याज परतफेड

Mangesh Chavan politics; guardian minister Patil worns Mangesh Chavan on milk politics- दोन दिवसांपूर्वीच आमदार मंगेश चव्हाण आणि आमदार किशोर पाटील यांनी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या गंभीर आरोप केले होते.
Minister Gulabrao Patil & MLA Mangesh Chavan
Minister Gulabrao Patil & MLA Mangesh ChavanSarkarnama
Published on
Updated on

Gulabrao Patil News: जिल्हा नियोजन मंडळाच्या बैठकीत आमदार मंगेश चव्हाण यांनी मंत्री गुलाबराव पाटील यांची राजकीय कोंडी केली होती. त्यानंतर या दोघांमधील दुरावा वाढला होता. राजकीय हेवेदावे तीव्र झाले आहेत. त्यामुळे महायुतीत सर्व काही अलबेला नसल्याचे चित्र आहे.

जळगाव जिल्हा दूध संघातर्फे काल दूध संघांच्या प्रतिनिधींसाठी कार्यशाळा झाली. या कार्यशाळेला पालकमंत्री गुलाबराव पाटील उपस्थित होते. मात्र दूध संघाचे अध्यक्ष आणि भाजपचे आमदार मंगेश चव्हाण यांनीच दांडी मारली. त्यामुळे अध्यक्षांच्या अनुपस्थितीतच ही महत्त्वाची कार्यशाळा झाली.

पालकमंत्री पाटील या बैठकीला उपस्थित असल्याने आमदार चव्हाण यांच्याबाबत काय भूमिका घेतात याची उत्सुकता होती. यावेळी आमदार चव्हाण अनुपस्थित असले तरी, पालकमंत्री पाटील यांनी आमदार चव्हाण यांच्या कारभाराचे चागंलेच वाभाडे काढले. त्यांना चांगलेच टोमणे मारत इशाराही दिला. कामकाज सुधारा अन्यथा मला वेगळा काहीतरी निर्णय घ्यावा लागेल, असा कडक इशाराच मंत्री पाटील यांनी दिला.

Minister Gulabrao Patil & MLA Mangesh Chavan
Ajit Pawar politics: अजित पवारही जागे झाले, विधानसभेच्या तयारीसाठी काढली सन्मान यात्रा!

दोनच दिवसांपूर्वी जिल्हा नियोजन मंडळाच्या बैठकीत भाजपचे आमदार चव्हाण आणि पाचोर्‍याचे आमदार किशोर पाटील यांनी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्यावर गंभीर आरोप केले होते. जळगाव जिल्ह्यातील जल जीवन योजनेतील पाणीपुरवठा कामांवर बाराशे कोटी रुपयांचा निधी मंजूर आहे.

जिल्ह्यात केवळ दोनशे कोटीच खर्च झाले. ठेकेदारांनी अधिकारी आणि राजकीय नेत्यांशी संगणमत करून भ्रष्टाचार केला. त्याला कोणाचे राजकीय संरक्षण आहे. एकाही गावात पाणी मिळालेले नाही. या सगळ्याची चौकशी करण्याची मागणी या दोन्ही आमदारांनी केली होती.

त्या आरोपांमुळे बैठकीत पालकमंत्री गुलाबराव पाटील यांची चांगलीच अडचण झाली. त्या आरोपांची उत्तरे देताना पालकमंत्री पाटील अक्षरशः हतबल झालेले दिसले. यामध्ये राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन हे त्यांच्या मदतीला धावून आले होते. या राजकीय अंकाची सव्याज परतफेड पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी तिसऱ्याच दिवशी केली.

Minister Gulabrao Patil & MLA Mangesh Chavan
Kunal Patil Politics: भाजपने शेतकऱ्यांवर केला घोर अन्याय, जनता परतफेड करणारच!

आगामी काळात जिल्हा दूध संघात एकनाथ खडसे यांच्यानंतर त्यांचे कट्टर विरोधक आमदार चव्हाण यांच्या विरोधात वातावरण पेटवले जाऊ शकते. विशेषतः पालकमंत्री आणि आमदार चव्हाण यांच्यात आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आरोप प्रत्यारोप सुरू आहेत. महायुतीच्या दोन पक्षांच्या नेत्यांमध्येच हा वाद रंगल्याने तो चर्चेचा विषय आहे.

यावेळी गुलाबराव पाटील यांनी दूध संघाच्या कारभारावर चांगलेच ताशेरे देखील ओढले. शेतकऱ्यांचे दूध नाकारले जात आहे. मग हा संघ कोणासाठी काम करतो?. शेतकऱ्यांवर अन्याय झाला तर मी सहन करणार नाही. शेतकऱ्यांना न्याय देऊ शकलो नाही तर, मी दूध संघात राहायचे की नाही याचा देखील वेगळा निर्णय घेईल.

यापूर्वी काय घडले ते सोडा, असे सांगत त्यांनी एकनाथ खडसे यांचा उल्लेख करणे टाळले. मात्र यापुढे काय करायचे, अशी विचारना करीत खडसे यांचे कट्टर विरोधक आमदार चव्हाण यांना घेरण्याचे संकेत दिले. त्यामुळे आगामी काही दिवसात जळगाव जिल्हा दूध संघ पुन्हा एकदा राजकीय आखाडा होतो की काय, अशी स्थिती आहे.

---

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com