Manikrao kokate : माणिकराव कोकाटे यांचा सस्पेन्स कायम?

आमदार कोकाटे यांनी पाठींब्याच्या पत्रावर सही आहे काय? याचे उत्तर टाळले
Manikrao Kokate
Manikrao KokateSarkarnama
Published on
Updated on

NCP Rebel News : सिन्नरचे आमदार माणिकराव कोकाटे यांची प्रत्येक बंडखोरीच्या वेळी चर्चा होते. यंदाही तसेच काहीसे झाले आहे. आमदार कोकाटे बंडखोरांबरोबर आहे की नाही, याबाबत त्यांनी एकंदर घटनेबाबत अनभिज्ञता व्यक्त केली. (MLA Manikrao Kokate was unaware of the NCP party rebellion)

यावेळी आमदार कोकाटे (Manikrao Kokate) यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने (NCP) शिंदे-भाजप (BJP) सरकारला पाठींबा दिला. त्या पत्रावर आपली सही आहे का? यावर उत्तर देण्याचे मात्र त्यांनी टाळले.

Manikrao Kokate
NCP Politics: अजित पवारांच्या शपथविधीने मुख्यमंत्री एकनाथ एकनाथ शिंदेंची कोंडी?

आज राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी पक्षाविरोधात बंडखोरी करीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भाजपच्या सरकारला पाठींबा दिला. त्यानंतर त्यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ देखील घेतली. त्यांच्यासोबत नऊ मंत्र्यांनी देखील शपथ घेतली.

यासंदर्भात आमदार कोकाटे यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी आपण नाशिकमध्येच आहे. आपण शहरातच असल्याचे सांगून त्यांनी, मुंबईत काय घटना, घडामोडी घडल्यात याबाबत आपल्याला सविस्तर काहीच माहिती नाही. त्याबाबत आपण अनभिज्ञ आहोत. त्याबाबत संपूर्ण माहिती घेतल्यावरच प्रतिक्रीया देईन असे ते म्हणाले.

Manikrao Kokate
Parbhani Ncp News : परभणीत शिंदेसेनेचा राष्ट्रवादीला पुन्हा दणका..

पक्षाकडून सध्याच्या शिंदे-फडणवीस सरकारला पाठीब्याच्या पत्रावर आपली सही आहे काय?. कोण कोणत्या आमदारांच्या सह्या आहेत, याबाबत त्यांना विचारले. त्यावर मात्र त्यांनी उत्तर देण्याचे टाळले. श्री. कोकाटे सध्या अजित पवार यांचे समर्थक मानले जातात. त्यामुळे त्यांनी सहीबाबत उत्तर देण्याचे टाळत ससपेन्स कायम ठेवला आहे. तो चर्चेचा विषय आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com