Manikrao Kokate Politics: सर्वत्र टिकेनंतर कृषिमंत्री माणिकराव कोकाटे गेले काळारामाला शरण!

Manikrao Kokate; After Tike, Agriculture Minister Kokate on the ground, surender himself to GOD Kalaram-कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांच्यावर राज्यभरातून टीका झाल्याने ते दोन पावले मागे आल्याचे चित्र आहे.
Manikrao Kokate
Manikrao KokateSarkarnama
Published on
Updated on

Manikrao Kokate News: कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनी शेतकरी कर्जमाफी वरून केलेल्या विधाने वादंग निर्माण झाले होते. संदर्भात भाजपच्या प्रदेशाध्यक्षांनी माफी मागितली होती. पार्श्वभूमीवर कृषिमंत्री कोकाटे सध्या चर्चेत आहेत.

कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनी कर्जमाफी विषयी विधान केले होते. त्यामुळे विरोधी पक्षांना आयतीच संधी मिळाली. यांच्या वक्तव्यावरून विविध शेतकरी संघटना आणि विरोधकांनी महायुती सरकारला घेरले. त्यामुळे सरकार बॅक फुटवर गेल्याचे चित्र आहे.

Manikrao Kokate
Satyajeet Tambe Politics: आपला आमदार कसा वागतो, विधीमंडळात काय करतो, यावर मतदारांचे लक्ष पाहिजे!

या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे नेते आणि मंत्री माणिकराव कोकाटे यांनी आज रामनवमीच्या निमित्ताने काळाराम मंदिरात जाऊन दर्शन घेतले. राज्यातील शेतकऱ्यांच्या समृद्धीसाठी मी आज प्रार्थना केली. सर्व शेतकऱ्यांच्या अडचणी दूर करण्यासाठी शासन कटिबद्ध आहे असे त्यांनी यावेळी सांगितले.

Manikrao Kokate
Nashik News : राज ठाकरे, जितेंद्र आव्हाडांना आवर घालण्यासाठी नाशिकचे साधू-महंत एकवटले, केली मोठी मागणी

एकंदरच राज्यभरातून कृषिमंत्र्यांवर टीका करण्यात आली होती. या टिके मुळे आधीच अडचणीत असलेले उपमुख्यमंत्री अजित पवार देखील अस्वस्थ झाल्याचे बोलले जाते. या पार्श्वभूमीवर वरिष्ठानकडून कृषिमंत्र्यांना काय सूचना मिळाल्या याची सगळ्यांनाच उत्सुकता आहे.

स्वतः कृषिमंत्री मात्र आता जमिनीवर आले आहेत. त्यांनी अनावधानाने आणि मस्करीत कुस्ती झाल्याने हे घडले असे सांगितले. शेतकऱ्यांचा मानसन्मान आणि भावना दुखावल्या असतील तर मी पुन्हा एकदा दिलगिरी व्यक्त करतो असे ते म्हणाले.

गेल्या आठ दिवसात राज्यात सगळीकडे अवकाळी पाऊस झाला आहे. त्याचा मोठा फटका शेतकऱ्यांना बसला आहे. राज्य शासनाकडून तातडीने पंचनामे करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. राज्य शासनाकडून शेतकऱ्यांना निश्चित भरपाई देईल. मात्र नैसर्गिक आपत्तीमुळे होणारे नुकसान कमी व्हावे यासाठी आज मी जाणीवपूर्वक श्री काळाराम मंदिरात जाऊन दर्शन घेतल्याचे त्यांनी सांगितले. शेतकरी समृद्ध व्हावेत, सुखी व्हावेत अशी प्रार्थना केल्याचे कृषिमंत्री कोकाटे यांनी सांगितले.

आपल्या राजकीय कारकिर्दीत एकंदरच कोणत्याही विषयावर बिनधास्त आणि परखड वक्तव्य करण्यासाठी प्रसिद्ध आहेत. मंत्री झाल्यानंतर त्यांच्याकडे राज्याचा कारभार आला आहे. राज्याचे मंत्री असले तरी त्यांचा मूळ स्वभाव हा परखड असल्याने हे राजकीय मोहोळ उठल्याचे त्यांचे समर्थक सांगतात.

-----

२५ वर्षे पूर्ण करणारा ई-सकाळ आता कॉमस्कोअरमध्ये Number One डिजिटल माध्यमांच्या क्षेत्रातील नवी झेप

-----

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com