Manikrao Kokate politics: कृषिमंत्री कोकाटे आक्रमक, "पैसे बुडवणाऱ्या व्यापाऱ्यांना दिला कडक इशारा"

Manikrao Kokate; agriculture minister Kokate aggressive on grape traders fraud to farmers-शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या व्यापारी आणि अधिकाऱ्यांनाही कृषिमंत्र्यांचा कारवाईचा इशारा.
Manikrao Kokate
Manikrao KokateSarkarnama
Published on
Updated on

Farmers politics: कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनी अद्याप आपला पदभार स्वीकारलेलं नाही. मात्र त्याआधीच त्यांच्याकडे समस्याग्रस्त शेतकऱ्यांची रांग लागली आहे. कृषिमंत्री कोकाटे यांनीही द्राक्षउत्पादकांच्या प्रश्नांवर आक्रमक झाल्याचे संकेत दिले आहेत.

कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांचा काल लासलगाव येथे सत्कार झाला. यावेळी राज्य द्राक्ष बागायतदार संघाचे अध्यक्ष कैलास भोसले यांनी शेतकऱ्यांची ६८ कोटी रुपयांची फसवणूक झाल्याची माहिती दिली. यासंदर्भात द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्याची विनंती त्यांनी केली होती.

Manikrao Kokate
NCP Politics: राष्ट्रवादीच्या आमदाराने दिला थेट राजीनाम्याचा इशारा... काय आहे प्रकरण?

त्याची तातडीने दखल घेत कृषी मंत्री कोकाटे यांनी आज सहाय्यक पोलीस महासंचालकांच्या कार्यालयात बैठक घेतली. यावेळी त्यांनी पोलीस अधिकाऱ्यांनाही उपस्थित राहण्याच्या सूचना दिल्या होत्या. यावेळी द्राक्ष बागायतदार संघाचे पदाधिकारी शेतकरी आणि पोलीस यांच्यात चर्चा झाली.

Manikrao Kokate
Girish Mahajan Politics: खानदेशच्या राजकारणात भाजप आणि गिरीश महाजन यांचेच वर्चस्व!

यावेळी कृषिमंत्री कोकाटे यांनी यासंदर्भात पणन विभागाच्या अधिकाऱ्यांचीही चर्चा केल्याचे सांगितले. शेतकरी अधिक संकटात आहे शेतमालाला भाव मिळत नाही. अशा अनेक अडचणी असताना व्यापारी शेतकऱ्यांचे पैसे बुडवत असतील, तर ती गंभीर बाब आहे.

याबाबत पोलिसांनी स्वतः कारवाई केली पाहिजे. त्यासाठी जिल्हा पोलीस उपअधीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांमार्फत कारवाई करावी, अशी सूचना त्यांनी यावेळी केली. द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांचे पैसे बुडाले त्याबाबत कायद्याने काय कारवाई करता येईल. याची तातडीने माहिती घेतली.

केवळ पारंपारिक कायदाच नव्हे तर प्रसंगी अशा व्यापारी आणि अधिकाऱ्यांवर देखील कारवाई केली जाईल, असे त्यांनी सांगितले. या संदर्भात लवकरच विधिमंडळात देखील चर्चा करण्यात येईल शासनाकडे हा विषय मांडला जाईल. गरज पडल्यास शेतकऱ्यांना त्रास देणाऱ्या आणि पैसे बुडवणाऱ्या व्यापाऱ्यांना मोक्का लावण्याची सुद्धा तयारी करावी असे त्यांनी पोलिसांना सांगितले.

यापूर्वी दाखल झालेल्या प्रकरणांबाबत तत्कालीन पोलीस उपमा निरीक्षक आणि वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची देखील या प्रकरणात कारवाईसाठी मदत घेण्यात येईल. ज्या व्यापाऱ्यांकडे मालमत्ता नाही त्यांच्याकडून पैसे कसे वसूल करायचे ही गंभीर अडचण आहे. त्यावर देखील विचार करून पोलिसांनी निश्चित धोरण ठरवावे.

आक्रमक झालेले कृषी मंत्री कोकाटे म्हणाले माझ्या कामाची पद्धत वेगळी आहे. कायदेशीर आणि कागदपत्रांचा प्रकार टाळून संबंधितांना लगेच रिलीफ कशी मिळेल, असा माझा प्रयत्न असेल. त्यामुळे या संदर्भात लवकरच मंत्रिमंडळाच्या बैठकीत देखील हा विषय उपस्थित केला जाईल.

कायद्यात पळवटा आणि संदीग्धता आहे. त्यामुळे याबाबत विचार करून निर्णय घेतला जाईल. व्यापारीच नाही तर अधिकारी देखील चौकशीत दोष आढळल्यास त्यांच्यावर कारवाई करणार असा इशारा त्यांनी दिला.

------

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com