Manikrao Kokate Politics: सिन्नरच्या भूसंपादन वादात माणिकराव कोकाटे यांची उडी, दिला थेट काम रोखण्याचा इशारा!

Manikrao Kokate warns to stop land acquisition work Nashik: सुरत- चेन्नई महामार्ग भूसंपादनात सिन्नरचे शेतकरी वाढीव मोबदल्यासाठी आक्रमक.
Manikrao Kokate Sinnar land acquisition dispute
Manikrao Kokate Sinnar land acquisition disputeSarkarnama
Published on
Updated on

Sinnar Land Row: कुंभमेळ्याच्या रिंग रोड साठी भूसंपादनाचा वाद चिघळला आहे. त्यात आता सुरत चेन्नई महामार्गाच्या भूसंपादनाच्या वादाची भर पडली आहे. या प्रश्नावर शेतकरी चांगलेच आक्रमक झाले आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कुंभमेळ्याच्या कामांना प्राधान्य देण्याचे आदेश दिले आहेत. नाशिक तालुक्यातील रिंग रोड साठी प्रशासनाने सक्तीने भूसंपादन सुरू केले आहे. सुरत चेन्नई महामार्गाचा वादही असाच पुढे आला आहे.

सुरत चेन्नई महामार्गासाठी सिन्नरच्या शेतकऱ्यांच्या जमिनी संपादित करण्यात आलेल्या आहेत. त्याला अतिशय कमी मोबदला मिळाला. समृद्धी आणि अन्य प्रकल्पाच्या तुलनेत योग्य मोबदला नसल्याने शेतकरी संंतप्त झाले आहेत. माजी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी याबाबत बैठक घेतली.

Manikrao Kokate Sinnar land acquisition dispute
Ambadas Danve News : नितेश राणे, महेश लांडगे आता कुठे गेले? अशोक खरातने अत्याचार केलेल्या महिला हिंदू भगिनी नाहीत का? अंबादास दानवेंनी सुनावले!

या प्रश्नावर गेले तीन महिने शेतकरी विविध स्तरावर आंदोलन करीत आहेत. आता या प्रश्नात माजी मंत्री व आमदार माणिकराव कोकाटे यांनी उडी घेतली आहे. या संदर्भात त्यांनी प्रशासनाला इशारा दिला.

Manikrao Kokate Sinnar land acquisition dispute
Nanded Politics: एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचा अशोक चव्हाणांच्या बालेकिल्ल्यात मोठा धमाका, ताकदवान नेता 'या' दिवशी हाती घेणार धनुष्यबाण

सिन्नर येथील नगरपालिकेच्या सभागृहात आमदार कोकाटे यांच्या उपस्थितीत शेतकऱ्यांची बैठक झाली. यावेळी तहसीलदार सुरेंद्र देशमुख, उपविभागीय अधिकारी डॉ शशिकांत मंगरुळे, नगराध्यक्ष विठ्ठल राजे उगले, आपत्ती श्रीकृष्ण घुमरे यांसह विविध पदाधिकारी ही उपस्थित होते. यावेळी शेतकऱ्यांनी शासनाकडून सुरत चेन्नई महामार्गासाठी जमिनी घेताना दुजाभाव केल्याचा आरोप केला.

यावेळी आमदार कोकाटे यांनी या महामार्गासाठी सिन्नरच्या जमिनी संपादित केल्या जाणार आहेत. त्याला योग्य मोबदला मिळवून देणे ही माझी जबाबदारी आहे. त्यामुळे शासनाने शेतकऱ्यांवर अन्याय केल्यास महामार्गाचे काम बंद पाडू, असा इशारा त्यांनी दिला.

यावेळी कोकाटे यांनी ज्या शेतकऱ्यांना जमिनीतील फळझाडे विहिरी बोरवेल आणि बांधकामांचे मूल्यांकन कमी झाले असे वाटत असेल त्यांनी फेर मूल्यांकन करून घ्यावे. महसूल कृषी आणि वन विभागाने संयुक्तपणे त्यासाठी मोजणी करावी. शेतकऱ्यांनी दावा दाखवून ठेवत जमीन शासनाला हस्तांतरित करावे, असे सांगितले.

कुंभमेळ्याच्या भूसंपादनाला शेतकऱ्यांनी यापूर्वीच विरोध केला आहे. त्याबाबत स्थानिक आमदारांनी शासनाकडे बाजू मांडण्याचे आश्वासन दिले होते. सिन्नरच्या भूसंपादनात थेट माजी मंत्री कोकाटे यांनीच शासनाला इशारा दिल्याने हे प्रकरण चांगलेच तापण्याची चिन्हे आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com