Nanded Politics: एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचा अशोक चव्हाणांच्या बालेकिल्ल्यात मोठा धमाका, ताकदवान नेता 'या' दिवशी हाती घेणार धनुष्यबाण

Shivsena BJP Political News: आगामी काळात शेतकऱ्याचे हित आणि निर्णय घेण्याची क्षमता असलेले, सर्वसामान्य माणसाच्या बाबतीत धाडसीपणाने धोरण राबवणारे नेते म्हणून आम्ही सगळ्यांनी विचार करून एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात भविष्यामध्ये त्यांच्यासोबत राजकीय दृष्ट्या आणि सामाजिक दृष्ट्या सर्व बाबतीत त्यांच्यासोबत त्यांच्या प्रवास सोबत काम करण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे.
Eknath Shinde Ashok Chavan .jpg
Eknath Shinde Ashok Chavan .jpgSarkarnama
Published on
Updated on

Nanded Politics : नांदेड जिल्ह्यातील शेतकरी नेते म्हणून ओळख असलेले माजी आमदार शंकरअण्णा धोंडगे यांनी आपल्या पुढील राजकीय प्रवासासाठी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेची निवड केली आहे. गेल्या काही दिवसांपासून धोंडगे यांच्या शिवसेना प्रवेशाच्या चर्चा सुरू होत्या. एकनाथ शिंदे यांची मुंबईत जाऊन काही दिवसांपूर्वी भेट घेत त्यांनी चर्चाही केली होती. अखेर येत्या 19 मार्च रोजी नांदेडमध्ये आयोजित शेतकरी अधिवेशनातून धोंडगे यांच्यासह त्यांचे हजारो समर्थक शिवसेनेचा धनुष्यबाण हाती घेणार आहेत.

नांदेडमध्ये या प्रवेशानंतर शिवसेनेची ताकद वाढणार आहे. 29 मार्च रविवारी सायंकाळी सहा वाजता उपमुख्यमंत्री तथा शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनात हे राज्यस्तरीय शेतकरी अधिवेशन होणार आहे. या अधिवेशनाला राज्यभरातून 40 हजारावर प्रतिनिधी सहभागी होतील. या अधिवेशनाला दुसरा जोडून कार्यक्रम पक्षप्रवेश सोहळ्याचा असेल, असे शंकरअण्णा धोंडगे यांनी सांगीतले.

16 तारखेला फक्त आमच्या राज्याच्या कार्यकारणीतील सदस्यांचा मुंबईमध्ये एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत प्रवेश झाला होता. पण अनेक जिल्ह्यातले आपले पदाधिकारी जे अनेक चळवळींमध्ये आमच्या सोबत अनेक वर्षापासून काम करतात त्या सर्व पदाधिकाऱ्यांचा पक्षप्रवेश हा एकत्रितरित्या व्हावा, या उद्देशाने पक्षप्रेवश सोहळ्याचा कार्यक्रम शेतकरी अधिवेशनाला जोडून होत आहे.

आगामी काळात शेतकऱ्याचे हित आणि निर्णय घेण्याची क्षमता असलेले, सर्वसामान्य माणसाच्या बाबतीत धाडसीपणाने धोरण राबवणारे नेते म्हणून आम्ही सगळ्यांनी विचार करून एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात भविष्यामध्ये त्यांच्यासोबत राजकीय दृष्ट्या आणि सामाजिक दृष्ट्या सर्व बाबतीत त्यांच्यासोबत त्यांच्या प्रवास सोबत काम करण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे. म्हणून त्यांना आम्ही 29 तारखेला आमंत्रित केले आहे.

Eknath Shinde Ashok Chavan .jpg
Maharashtra Politics: शिंदेंच्या मोदींसोबतच्या 'मेगा बैठकी'नंतर महाराष्ट्रात सर्वात मोठी घडामोड; बडा नेता अधिवेशन अर्धवट सोडून तातडीनं दिल्लीला रवाना

आम्हाला आशा आहे की, या महाराष्ट्रामध्ये अडचणीत असलेल्या बळीराजाला सरकार जरी काही मदत करीत असले तरी शेतकऱ्याच्या काही समस्या कायम आहेत. या शेतकऱ्याच्या अडचणी आणि समस्या भविष्यात दूर करण्याचे सामर्थ्य आणि इच्छाशक्ती असलेले नेते म्हणून आम्हाला एकनाथ शिंदे दिसतात आणि म्हणूनच आम्ही हा निर्णय सगळ्यांनी घेतलेला आहे. एक मताने घेतलेला आहे, निश्चितपणे या अधिवेशनाचा फायदा या पुढच्या काळात आम्हाला होईल.

आमचा शेतकरी आत्महत्या मुक्त व्हावा ही आमची अपेक्षा आहे. याबाबतीत सकारात्मक इच्छाशक्ती असलेले नेते म्हणून आम्ही एकनाथ शिंदे यांच्याकडे पाहतो, याचा पुनरुच्चार शंकर अण्णा धोंडगे यांनी केला. निश्चितच पक्ष सरकारमध्ये आहे, त्यामुळे या मतदारसंघातले जे काही विकास कामं किंवा अडचणी असतील त्या निश्चितपणे आम्ही सगळे सहकारी मिळून त्यांना निवेदन देऊन मांडू आणि ते सोडवण्याचा प्रयत्न करतील, अशी खात्रीही धोंडगे यांनी व्यक्त केली.

Eknath Shinde Ashok Chavan .jpg
BJP District President : भाजप जिल्हाध्यक्षांची भरसभेत महिला पदाधिकाऱ्यांसमोर जीभ घसरली; ‘कशाला आई XXX...’

राष्ट्रवादी, बीआरएस अन् आता शिवसेना..

राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार आणि मराठवाड्यातील प्रखर शेतकरी नेते म्हणून शंकर अण्णा धोंडगे ओळखले जातात. लोहा-कंधार विधानसभा मतदारसंघाचे त्यांनी प्रतिनिधित्व केले आहे. शंकरअण्णा धोंडगे यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात शेतकरी चळवळीतून केली. शेतकरी नेते शरद जोशी यांचे निकटवर्तीय म्हणून त्यांची ओळख होती. त्यांच्या मार्गदर्शनाखाली तब्बल चाळीस वर्षे ते शेतकरी आंदोलनात सक्रिय सहभागी होते.

शेतकरी चळवळीतल्या त्यांच्या प्रभावी कार्याची दखल घेत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी त्यांना पक्षात घेतले. त्यानंतर राष्ट्रवादी किसान सभेचे प्रदेशाध्यक्ष म्हणून जबाबदारी दिली. लोहा–कंधार मतदारसंघातून आमदार म्हणून ते निवडून आले. धोंडगे हे शरद पवार यांचे विश्वासू समर्थक म्हणून ओळखले जात होते.

शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर राज्यव्यापी आंदोलन, शेतकरी संघटनांचे जाळे उभारणे, सरकारविरोधात तीव्र भूमिका घेऊन प्रश्न मार्गी लावणे यासह सीमाभागातील शेतकऱ्यांशी त्यांचा चांगला संपर्क आहे. 2023 मध्ये त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस आणि किसान सभेच्या पदांचा राजीनामा देत राजकीय वर्तुळात खळबळ उडवून दिली होती.

Eknath Shinde Ashok Chavan .jpg
Kolhapur ZP Inside Story: शेवटपर्यंत कोरे तटून राहिले,अखेर CM फडणवीसांनाच कोल्हापूर 'झेडपी'च्या अध्यक्षपदासाठी मध्यरात्री फोन फिरवावा लागला

यानंतर ते काही काळ विविध पर्यायांच्या शोधात होते. भारत राष्ट्र समिती अर्थात बीआरएस पक्षात प्रवेश करत त्यांनी काही काळ मराठवाड्यात गुलाबी वादळही निर्माण केले. पण हे वादळ ज्या वेगाने आले, त्याच वेगाने थंडावले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com